अहमदपूर ( प्रतिनिधी)
येथील थोडगा रोडवरील ज्योतिबा सावित्री अकॅडमी तर्फे दि 9 ऑगस्ट 25 रोजी सहकारी मित्र श्री सुनील प्रल्हाद राठोड यांची महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जूनियर लेक्चरपदी निवड झाल्याबद्दल यशवंत माध्यमिक विद्यालय अहमदपूर
च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी यशवंत माध्यमिक विद्यालय अहमदपूरचे प्राचार्य श्री शिंदे , पर्यवेक्षक श्री शिवाजी सूर्यवंशी तसेच इतर सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते .

