धर्मापुरी ( प्रतिनिधी) ग्रंथालय, क्रीडांगण आणि कॅन्टीन हे महाविद्यालयाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. यापैकी ग्रंथालय हा पहिला आधारस्तंभ आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांनी केले.
मंगळावर दि १२ आॅगस्ट २५ रोजी आयोजित ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ एस रंगनाथन यांच्या जयंती निमित्त आयोजित ग्रंथपाल दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी ग्रंथ पीठावर ग्रंथपाल दराडे जी एस उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की अलिकडे ग्रंथ देवघेव कमी झाली आहे. पण खरं तर ग्रंथ हेच विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असतात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ एस रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन प्रा डॉ देशमुख पी डी यांनी केले.

