#नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. जिल्ह्यातील #बिलोली, #मुखेड, #कंधार, #नायगाव, #लोहा या तालुक्यातील १७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. #धर्माबाद, #बिलोली, #देगलूर या गावातील नदीकाठच्या गावातील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी-नाल्यांना पूर आला असून बहुतांश गावांचा संपर्क तुटला आहे. #मुखेड शहरातील काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. #लोहा तालुक्यातील उमरा गावामध्येही पाणी शिरले आहे. लेंडी प्रकल्प क्षेत्रातील बाधित असलेल्या हसनाळ, बोरगाव ही गावे पुन्हा पाण्यात बुडाली आहेत.
विष्णुपुरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच उर्ध्व मानार धरणाचे ७ दरवाजे उघडले आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या #हैदराबाद विभागात काही ठिकाणी रेल्वे मार्गावर पाणी वाहत असल्यामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल, रद्दीकरण व आंशिक रद्दीकरण करण्यात आले आहे.

