लोहा (प्रतिनिधी) — लोहा तालुक्यातील पार्डी गावात आज दि.६/११/२०२५ रोजी झालेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली.
“हे सरकार जुमलेबाज आहे, दगाबाज आहे. निवडणुकीच्या वेळी गोड गोड बोलून शेतकऱ्यांची आणि जनतेची फसवणूक करते. पण आता या सरकारच्या भूलथापांना बळी पडायचं नाही,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी शेतकरी बांधवांना देत त्यांना धीर दिला.
या वेळी मंचावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, मा. आमदार रोहिदास चव्हाण साहेब , प प्रा डॉ पुरुषोत्तम धोंडगे ,तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाकरे यांच्या भाषणाने उपस्थित शेतकरी बांधवांत नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात जनतेच्या प्रश्नांसाठी लढा आणखी तीव्र करण्यात येईल, असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
#शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे

