कंधार तालुक्यात बीटस्तरीय शिक्षक संवाद कार्यशाळा संपन्न; गटशिक्षणअधिकारी रविंद्र सोनटक्के यांचे नियोजनात शाळा बंद..पण शिक्षण चालू


कंधार ;

दि.23/09/2020, बुधवारला *गटसाधन केंद्र -कंधार, डाएट – नांदेड आयोजीत* KOVID-19 कालावधी दरम्यान, “शाळा बंद, पण शिक्षण आहे,,,,” *ऑनलाईन बीटस्तरिय शिक्षक संवाद कार्यशाळा* घेण्यात आली. सकाळी ठिक 11:00 वा. कुरुळा या बीटातील कुरुळा ,बोळका, दिग्रस या केंद्रातील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य उपस्थित होते. एकुण शिक्षक उपस्थित संख्या 190
✒️ यावेळी कार्यशाळेची रूपरेषा प्रास्ताविक *कुरुळा बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री सतीश व्यवहारे साहेब*  यांनी यावेळी उपस्थित डाएट नांदेड चे प्राचार्य *डॉ. रविंद्र अंबेकर साहेब,* *मा.श्री रविंद्र सोनटक्के साहेब*, *तालुका संपर्क प्रमुख,अधिव्याख्याता मा. सौ धुतमल मॅडम* व इतर सर्व मान्यवरांचे स्वागत केले… यानंतर सदर कार्यशाळा आयोजित करण्यामागचा हेतू, उद्देश स्पष्ट केला. शाळा बंद शिक्षण चालू अंतर्गत शिक्षण संवाद कार्यशाळा संपन्न होत आहे या कार्यशाळेचे चांगले परिणाम संपूर्ण जिल्हाभर दिसत आहेत.कुरूळा  बिटाअंतर्गत विविध उपक्रम चालू आहेत.

या शिक्षण संवाद कार्यशाळेमुळे सर्व शिक्षकांना राज्यस्तरीय कार्यक्रम , दीक्षा ॲप ,अभ्यासमाला,टिली मिली,25टक्के कमी झालेला अभ्यासक्रम उपक्रमाचे माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून मिळणार आहे. जिल्हाभर बालरक्षक चळवळी,ऑनलाइन वर्ग, व्हर्च्युअल क्लासरूम ,शिक्षक मित्र, आपल्या शाळेमध्ये कसे राबवायचे याचे मार्गदर्शन या कार्यशाळांमधून मिळणार आहे .बरेच शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षण चांगल्या प्रकारे दिले आहे.ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण चालू आहे.मी स्वतः बोळका दिग्रस या केंद्राची ऑनलाईन बैठक घेऊन आढावा घेतला आहे.

कुरूळा बिटमध्ये काही शिक्षक उपक्रमशील आहेत.मी कुरुळा बिटअंतर्गत ऑनलाईन शिक्षणाचा आढावा घेतला असता ऑनलाइन शिक्षणाचे आउटपुट  50 टक्के पर्यंत मिळाला आहे. आपण जे साहित्य  निवडले आहे ते नियोजन बद्ध आहे की नाही  हे तपासून घ्यावे  आपण एनसीईआरटी यांनी दिलेल्या  शैक्षणिक दिनदर्शिका चा उपयोग करून  अध्यापन करावे या कार्यशाळेच्या माध्यमातून  आपल्याला जे काही मार्गदर्शन मिळेल ते आपण शाळा स्तरावर  उपयोग करावा.
✒📚 यानंतर या *शिक्षण संवाद कार्यशाळेचे निर्माते, प्रणेते, आणि प्रेरणास्थान, सर्वांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे डाएट नांदेड चे प्राचार्य डॉ. रवींद्र अंबेकर साहेब यांनी* आपल्या ओजस्वी वाणीने उपस्थितांना प्रश्न उत्तर माध्यमातून संबोधित केले. 

   प्रश्न उत्तर  माध्यमातून  शिक्षकांना संवाद साधला. उदा.1. व्हर्च्युअल क्लासेस चा विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल ? 2व्हर्च्युअल क्लासमध्ये घटक कसे निवडतात? 3.टीलि मिले कार्यक्रमाचे शिक्षकांनी कसे नियोजन  केले ?4. मुलाच्या शिक्षणामध्ये पालकांचा सहभाग कसे घेतात?5. शिक्षक पालकांशी संवाद साधतात का?6. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी ठेवतात का?7. कुरळा बीट अंतर्गत पालक मित्र तयार केलेत का ?8.शिक्षक मित्र उपक्रमांमध्ये

  लोकप्रतिनिधीचा सहभाग घेतला आहे का?9. गावामध्ये शिक्षक मित्र उपक्रम चालू आहे का?10. शिक्षक मित्रा किती वेळ क्लास घेतात?11. शाळेमध्ये व्हर्च्युअल क्लास घेता का?  12.व्हर्च्युअल क्लास मध्ये किती विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात? अशा अनेक प्रश्न उत्तरच्या माध्यमातून  शिक्षकांशी संवाद साधला.   मुदखेड तालुक्यामधील  मा. श्री सुधीर गुट्टे  शिक्षण विस्ताराधिकारी  यांनी आपल्या बीटमधील  एकूण 142 पैकी  84 शिक्षक  व्हर्च्युअल क्लासरूम द्वारे अध्यापन करतात. त्याच प्रमाणे कंधार तालुक्यामध्ये 100% शिक्षकांनी व्हर्च्युअल क्लासेसद्वारे अध्यापन करावे. 

प्राचार्य डॉ. रवींद्र अंबेकर साहेब


✒📚 यानंतर कार्यशाळा *कंधार तालुक्याचे कर्तव्यदक्ष, उपक्रमशील,      गटशिक्षणाधिकारी सन्माननीय *श्री रविंद्र सोनटक्के साहेब* म्हणाले की, *आपल्या जिल्ह्याचे डायट प्राचार्य माननीय रवींद्र आंबेकर साहेब यांनी यांनी आज कार्यशाळेमध्ये प्रश्न उत्तर त्याच्या माध्यमातून संवाद साधला आहे माननीय श्री सुधीर गुट्टे शिक्षण विस्तार अधिकारी मुदखेड यांनी व्हर्च्युअल क्लासरूम बाबत सविस्तर माहिती सांगितली आहे कंधार तालुक्यातील सर्व शिक्षकांनी वर्चुअल क्लासरूमचे द्वारे अध्यापन चालू करावे कुरळा बीट मध्ये शैक्षणिक वातावरण चांगले आहे .

कंधार तालुक्यामध्ये  मोठ्या प्रमाणात शिक्षक मित्र तयार करावयाचे आहेत शिक्षक मित्र बनवण्यासाठी आपण सर्वांनी गावातील सरपंच, पोलीस पाटील, शालेय व्यवस्थापन समिती ,सुशिक्षित नागरिक व युवक यांच्याशी चर्चा करून शिक्षक मित्र तयार करावेत. कोरोना महामारीत शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरूच आहे. मग ते ऑनलाईन असो की ऑफलाईन. मार्ग कोणताही असो, शिक्षण झाले पाहिजे. आणि हे कार्य तालुक्यातील बहुतांश शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्याद्वारे होत आहे ही गौरवाची बाब आहे. यासाठीच ही शिक्षण संवाद कार्यशाळा आहे. 
✒📚 यावेळी कार्यशाळेची रूपरेषा प्रास्ताविक डाएट नांदेड चे कंधार *तालुका संपर्क प्रमुख, मनमिळावू आणि कार्यतत्पर अधिव्याख्याता मा. सौ धुतमल मॅडम* शिक्षण संवाद कार्य मुळे सर्व शिक्षकास कार्यक्षेत्रामध्ये चांगला फायदा होईल . व विविध विषयावर सविस्तर माहिती सांगितले.
✒📚 *मा. श्री.वसंत मेटकर साहेब* शिविआ उस्माननगर         

     यांनी  उस्माननगर बिटाअंतर्गत कोरोना काळामध्ये सर्व शालेय अभ्यासक्रमात सोबत शिष्यवृत्ती अभ्यासक्रम कसा चालू राहील असा प्रश्न पडला होता. त्या प्रश्न उत्तर शोधत असताना माझ्या मनात मिशन शिष्यवृत्ती हा उपक्रम आला आणि मी माझ्या बिटातील केंद्रप्रमुख  ,मुख्याध्यापक , शिक्षकासोबत चर्चा करून मिशन शिष्यवृत्ती हा उपक्रम राबविण्याचे ठरवले त्यामध्ये मी सर्वप्रथम माझ्या बिटातील इ. पाचवी व आठवी या विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार केलेले व त्या ग्रुपमध्ये एकूण 13 तज्ञ शिक्षक ऍड केले व त्यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती सांगितली.
✒📚 *मा.श्री सुधीर गुटे साहेब शिक्षण विस्ताराधिकारी मुदखेड*   

   माझ्या बिटअंतर्गत एकूण 144 पैकी 84 शिक्षक व्हर्च्युअल क्लासरूम द्वारे शिक्षण देत आहेत. आज बारड शाळेतील उदाहरण देतो शाळेतील शिक्षक यांनी दुसर्‍या शाळेमधील विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल क्लास रूम द्वारे अध्यापन केले. व्हर्च्युअल क्लासरूम बाबत सविस्तर माहिती दिली.
✒📚मा *. कैलास होनधरणे साहेब शिक्षण विस्ताराधिकारी  पेठवडज ,बारूळ*  

  आज या कार्यशाळेमध्ये माननीय प्राचार्य साहेबांनी प्रश्नउत्तर माध्यमातून संवाद साधला कुरूळा बिटअंतर्गत उपक्रमशील शिक्षक आहेत ऑनलाईन शिक्षणासाठी चांगल्या हॅन्डसेट मोबाईलचे गरज आहे आणि ऑफलाईन शिक्षणासाठी चांगले माईंड सेट असावे लागते असे मनोगत व्यक्त केले.
✒📚 

*  विषय साधणव्यक्ती गशिअ कार्यालय , कंधार यांनी बालरक्षक चळवळ या विषयावर उत्तम मार्गदर्शन केले .
✒📚 *ओमप्रकाश येरमे सर*  ग शि अ कार्यालय कंधार यानी शै दिनदर्शिका ,शाळा बंद शिक्षण चालु अभ्यासमाला, २५% अभ्यासक्रम याविषयी उत्तम व सविस्तार मार्गदर्शन केले .
✒📚 *शिवकुमार कनोजवार सर* साधनव्यक्ती ग.शि.अ. कार्यालय कंधार यांनी टीलीमिली कार्यक्रम २०/०७/२० पासुन सुरुवात झाली आहे . महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्रालयचे वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली MkCl द्वारे प्रसारित होत आहे . SCERT महाराष्ट्र ही शिक्षण संस्था मदतीचे कार्य करत आहे . शाळा बंद पण शिक्षण चालू आहे . सर्वदुर अभ्यास चालु आहे . सह्याद्री वाहिणीवर ही मालिका सुरु आहे . प्रयोगशिल कार्य केलेल्या शिक्षकामार्फत ज्ञानरचनावादी अध्यापन करणे चालु आहे ग्राममंगल मार्फत शै. साहित्याद्वारे अध्य्यापन करुन शिकवत आहेत . दिड कोटी विद्यार्थ्याना याचा लाभ होत आहे . पालक व विद्यार्थ्यानी या मालिकांचा लाभ घ्यावा . मा बीईओ यांच्या संकल्पनेतुन गटसाधन कंधार अंतर्गत जे पर्यवेक्षीय यंत्रणा आहे त्यामर्फत आपणाला सर्व्हेक्षण करणे शक्य होत आहेत . ग्रामीण भाग , तांडे , वाड्या ., शहरी भाग सगळेजण सहभाग नोंदवत आहेत. ४८० भाग दाखवण्यात येत आहेत . २६/०९/२० पर्यंत ही मालिका राहणार आहे . कृतीनिष्ट अभ्यास माला चालु आहे . राज्यस्तरापासुन शाळास्तर सर्वानी पहावा व पोहोचवावा यासाठी प्रयत्न करत आहात त्याबदल धन्यवाद . टीलीमिली कार्यक्रमाचा लाभ घ्यावा .ही विनंती .

✒📚  *सिध्देश्वर मलगीरवार* सर  विशेष शिक्षण तज्ञ गशिअ कार्यालय , कंधार यांनी महाकॅरिअर व दिक्षा App या विषयावर उत्तम मार्गदर्शन केले .
✒📚 *श्री ज्ञानेश्वर चाटे विशेष शिक्षक प.सं कंधार**  कुरुळा बिटअंतर्गत सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना सामान्य विज्ञान विद्यार्थ्याप्रमाणे शिक्षण देणे खूप महत्वाचे आहे त्यामुळे या कार्यक्रम मधील सर्व उपस्थित शिक्षकांनी सामान्य शिक्षक विद्यार्थ्याप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांना पण अध्यापन करावे व काही अडचण असल्यास मला संपर्क साधावा.  ✒📚   *कुरुळा बीटाअंतर्गत खालील उपक्रमशिल शिक्षकांनी त्यांनी आपल्या उपक्रमाचे  उत्कृष्ट सादरीकरण केले .* 
1) *श्री नवनाथ बोळकेकर सर मुख्याध्यापक जि प प्रा शा परांडा*        माननीय सतीश व्यवहारे साहेब यांनी 31 ऑगस्ट 2020 रोजी हासुळ येथे ते आढावा बैठकीमध्ये मार्गदर्शन केले होते शैक्षणिक कॅलेंडरच्या माध्यमातून सप्टेंबर 2020नुसार मधील लिंकचा वापर करून अध्यापन करत आहोत विद्यार्थ्यांना चित्र दाखवून विद्यार्थ्याकडून पाच शब्द लिहिणे. विद्यार्थ्याकडून निसर्गाची कृती करून घेणे.शैक्षणिक कॅलेंडर 25% कमी अभ्यासक्रम यांची सांगड घालून दैनिक पाठाचे नियोजन केले आहे विद्यार्थ्यांचा व्हाट्सअप द्वारे फॉलोअप घेतला आहे   

2) *श्री.शिवसाब गणाचार्य जि प प्रा शा हिप्परगा शहा*     मी माझे स्वतःचे यूट्यूब चैनल वर ब्लॉग तयार केला आहे मी माझ्या शाळेमध्ये ऑनलाईन क्लासेस घेत आहे कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन ऑफलाइन शिक्षणा साठी मी एक ब्लॉग तयार केला आहे एक ध्यास गुणवत्ता या नावाने ब्लॉग्स सुरू केला आहे त्या ब्लॉक मध्ये पीडीएफ व्हिडीओ कविता दिले आहेत या ब्लॉगद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देणे चालू आहे.       

 3) *श्री. देवानंद वळसे सर जि प प्रा शा गुंटूर*      आम्ही सर्वप्रथम आमच्या शाळेमध्ये वर्गनिहाय व्हाट्सअप ग्रुप तयार केले व त्या ग्रुप वर दररोज अभ्यास दिला जातो आमच्या गावा मध्ये ई सेवा केंद्र आहे त्या ई सेवा केंद्रावर आम्ही दररोजचा अभ्यास सेंड करतो त्या ई-सेवाकेंद्र वरुन गावातील सर्व शिक्षक विद्यार्थी झेरॉक्स घेऊन जाऊन अभ्यास करतात वते सोडवून शाळेमध्ये आणून देतात.         

 4) *श्री हमित सय्यद सर जि प प्रा शा कारतळा*      आम्ही आमच्या शाळेमध्ये ऑनलाइन टेस्ट हा उपक्रम राबविला जात आहे. पीपीटी च्या माध्यमातून सविस्तर माहिती सांगितली.   

  6) *श्री मारुती तुपकर सर राजीव गांधी विद्यालय बोळका*    आम्ही आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहोत वर्गनिहाय व्हाट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत त्या माध्यमातून शिक्षण चालू आहे     

  7 )  **श्री पठाण सर संत नामदेव विद्यालय मोहिजा*     आम्ही शाळेमधील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देणे चालू आहे व दररोज गृहपाठ तपासला जातो.


8 ) *सौ संध्या वळसंगेकर मॅडम माध्यमिक आश्रम शाळा नेहरूनगर*      आम्ही आमच्या शाळेमध्ये ऑनलाइन ऑफलाइन शिक्षण देणे चालू आहे आमच्या शाळेतील शिक्षकांनी वर्गनिहाय व्हाट्सअप ग्रुप तयार करून शिक्षण देत आहेत गुगल मॅप द्वारे अध्यापन करत आहेत घरी जाऊन गृहपाठ तपासतात.


✒📚 गुगल मिट व होस्ट नियंत्रण तांत्रिक कार्यभार केंद्रप्रमुख श्री गणेश थोटे सर , ग.सा.कें. कंधारचे तंत्रस्नेही विशेष शिक्षक आनंद तपासे , विशेष शिक्षण तज्ञ सिध्देश्वर मलगीरवार सर यांनी केले.


✒📚 तंत्रज्ञान विशेष सहकार्य MKCL कंधार चे प्रमुख श्री गणेश थोटे सर आणि डाएट नांदेड येथून श्री संतोष केंद्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. यांचे विशेष आभार…💐💐
✒📚 या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कुरुळ बीटचे शिक्षणविस्तार अधिकारी मा. श्री सतीश व्यवहारे साहेब, बोळका केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री चव्हाण सर, केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री विश्वंभर मटके सर, कुरुळा केंद्राचे केंद्रप्रमुख तथा कें.मुख्याध्यापक मा श्री. रमाकांत कांदे सर , दिग्रस केंद्राचे केंद्रप्रमुख मा. आनंद थोटे सर ,कें.मु.अ. मा.श्री शिंदे सर यांनी उपस्थिती १००% ठेवुन कार्यशाळा यशस्वितेसाठी मेहनत घेतली…💐💐

✒📚 सर्वात शेवटी कुरूळा बीटाचे शिक्षण विस्ताराधिकारी माननीय श्री सतीश  व्यवहारे  साहेब यांनी उपस्थित सर्व अधिकारी , मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांचे  मन:पूर्वक आभार व्यक्त करून, *पुढील कार्यास शुभेच्छा देत* आजच्या कार्यशाळा सत्राची सांगता केली..
✒📚 सर्वांचे आभार.🙏🏻🙏     

     वृत्तांत लेखन    

        आनंद तपासे   विषय शिक्षक ग.सा. के कंधार 

 विशेष सहाय्य:-       मटके व्हि एस मु अ के प्रा शा बोळका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *