जिल्ह्यातील सोयाबीन शेंगामधील बियाण्यांची उगवण समस्या व उपायाबाबत कृषि सल्ला


नांदेड; दिगांबर वाघमारे

जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि बदलेले हवामान याचा विपरीत परिणाम काही ठिकाणी सोयाबीन पिकावर दिसून आला आहे. सोयाबिनची पेरणी साधारणता 15 ते 30 जून दरम्यान झालेली असून आता हे पिक सध्या पकवतेच्या अर्थात सोयाबीनच्या शेंगा भरलेल्या अवस्थेत आहेत. या शेंगा वाळण्यासाठी व बियाणांमधील ओलावा कमी होण्यासाठी तापमान हे 30 ते 35 डिग्री सेल्सिअस प्रर्यंत असावे लागते.

अर्दता ही 50 टक्यांपेक्षा कमी असावी लागते. याचबरोबर प्रखर सुर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश असावे लागते. सद्यस्थितीत तापमान 20 ते 25 डिग्री असून अद्रता ही 90 टक्यापेक्षा जास्त आहे. वातावरणही सतत ढगाळ आहे.सदर स्थिती व वातावरण लक्षात घेता सोयाबिनच्या उभ्या पिकात शेंगामधील बियाणांची उगवण झालेली आहे.

हे त्या बियाणाचे शारीरीक व्यंग असून सतत पडणाऱ्या पावसामुळे असा परिणाम झाला आहे. यावर कृषि आयुक्तालयाने उपाय सुचविले असून ते पुढील प्रमाणे आहेत. शेतामध्ये चर काढून पाण्याचा निचरा करावा व शेतामध्ये हवा खेळती ठेवावी. पाऊस थांबताच सोयाबिन पिकाची काढणी करुन काडाचे छोटे-छोटे ढिग करुन प्रखर सुर्यप्रकाशामध्ये शेतामध्येच वाळवावे.

त्यानंतर प्रादुर्भाव/उगवण झालेल्या शेंगा बाजुला काढून मळणी करावी असे कृषि आयुक्तालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे. #Nanded #नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *