नांदेड ; दिगांबर वाघमारे
भाजपा महिला मोर्चा प्रदेश आध्यक्षा उमाताई खापरे यांच्या आदेशानुसार भजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ. चित्राताई गोरे यांच्या मार्गदर्शनखाली दि. २२/०९/२०२० ला भाजपा महिला मोर्चा नांदेड ने जिल्ह्यभरात दिलेल्या Covid-19 सेटंर मधील महिला सुरक्षा व त्यांच्या स्वतंत्र महिला स्टाफ़ नेमन्या साठी केलेल्या निवेदनाची माननीय जिल्हाधीकारी डॉ .विपीन इटनकर यांनी दखल घेऊन जिल्हातील प्रत्येक कोव्हिड सेंटर मध्ये महिलांसाठी वेगळी व्यवस्था करुन त्यांच्या सुरक्षेसाठी नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहीती सौ.चित्ररेखा गोरे यांनी दिली.
कोविड सेंटर मध्ये महिला रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी महिलापोलिसांची नेमणूक करा भाजपा महिला मोर्चा तर्फे चित्ररेखा गोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हात ठिकठिकाणी तहसिलदाराना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना माहामारीची परिस्थिती अतिश्य गंभीर होत चाललेली असल्त्यायाचे नमुद करण्तयात आले होते .तसेच संपूर्ण महाराष्ट्रमध्ये कोविड सेंटरमध्ये महिला अत्याचाराच्या अनेक घटनाघडल्या आहेत. त्यामुळे महिला असूरक्षित आहे.त्यामुळे नांदेड जिल्हातील सर्वच कोविड सेंटरमध्ये महीला रुग्णांच्या सूरक्षिततेसाठी महीला पोलीसांची नेमणूक करण्याची मागणी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.चित्ररेखा गोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती.
व तसेच सदरील वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करावा .कोव्हीड सेंटर मध्ये महिला दक्षता समिती नेमावी ,24 तासमहिला कोविड सेंटर मध्ये लेडिज कॉन्सटेबल व बेलची व्यवस्था करावी असे निवेदनात भाजपा महिला मोर्चा नांदेड ग्रामीणच्या वतीने करण्यात येवून यांची प्रशासनाने दखल नाही घेतल्यास महीला मोर्चाच्या वतीने आंदोलनचा इशारा देण्यात आला होता.
त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी या गंभीर बाबीची दखल घेवून नांदेड जिल्हातील प्रत्येक कोव्हीड सेंटरमध्ये महीला पोलीस व महिलासाठी वेगळे कोव्हीड सेंटरसाठी प्रशासनाला आदेश दिले आहे त .याबाबत दि.२५ सप्टेंबर रोजी संबंधित आरोग्य यंत्रणा व प्रशासनाला देण्यात आल्याचे पत्र प्राप्त झाल्याची माहीती सौ.चित्ररेखा गोरे यांनी दिली.
#BJP Mahila Morcha Maharashtra,#Devendra FadnavisPratap Patil Chikhalikar – प्रताप पाटील चिखलीकर ,Chandrakant PatilMahila Morcha BJPBharatiya Janata Party #(BJP)
****************