माझ्या प्रिय पालक मित्रांनो…..
सस्नेह जयक्रांति.!
कंधार तालूका हा डोंगर दर्यांनी व्यापलेलला अन् मन्याड नदीच्या खोर्यांत वसलेले शहर,या शहराला राष्ट्रकुट कालीन इतिहास लाभला आहे.राजकिय,सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक,भौगोलिक,ऐतिहासिक परंपरा आहे.नुकतेच माझ्या भारत देशाला गोर्यां इंग्रजांच्या जुलमी गुलामगीरीतून 15 ऑगष्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले.त्या नंतर निजामाच्या अत्याचारातून 17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद संस्थानातील मराठवाडा स्वातंत्र्य झाला.पण निजाम कालिन शिक्षण उर्दु भाषेतले त्या कालखंडात माझ्या संस्थापक-संचालक साहेब यांना खुप हालापेस्टा सहन करावी लागली.
शिक्षण घेतांना खुप त्रास झाला.तो माझ्या मन्याड खोर्यांतील सुग्या-मुग्यांच्या लेकरांना होवू नये म्हणुन भाईंची मातोश्री मुक्ताईनीं आपल्या भुर्याला सुचित केले.बापु तुला जो त्रास शिक्षण घेण्यासाठी झाला.तो दीन-दुबळ्यांच्या लेकरा-बाळांना दुरडीतली भाकर खाऊन शिक्षण घेता यावे या साठी 1948 रोजी आपल्या लाडल्याला शैक्षणिक संस्था श्री शिवाजी मोफत एज्यूकेन सोसायटीची स्थापणा पार्वती खोर्यातील श्रीक्षेत्र गउळ(अंबुलगा( ता.कंधार या मुक्ताईचे माहेर व संस्थापक व संचालक डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांचे आजुळात संस्थेची मुहुर्तमेढ भाई माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे,भाई माणिकराव पा.गीरे,भाई नारायणराव मामा तेलंग,यांचेसह आपल्या निवडक सहकार्यांच्या मदतीने रोवली.
या संस्थेची मी मातृशाखा ही शाळा गवंडीचापार येथे जयराम वरटी यांच्या वाड्यात सुरु केली.त्या शिक्षक म्हणुन भाई राजेश्वरराव आंबटवाड सर,भाई बापुराव वाडीकर सर,भाई शिवाजीराव बोधगीरे सर,भाई गुरुनाथराव कुरुडे सर,स्वतः डाॅ.भाई केशवराव धोंडगे सर यांनी ज्ञानदानाचे कार्य शिक्षक म्हणुन काम केले.त्यानंतर मी हतईपुरा येथे बाळसे धरु लागलो.त्यानंतर मला हु.माणिकराव काळे रोडवर माझी रवानगी झाली.
ती जागा निर्मनुष्यच होती.दिवसा ढवळ्या रातकीड्यांचा आवाज माझ्या पुर्व दिशेला कब्रस्थान,पश्चिमेम दिशेस आवाळे साहेबांची शेती,दक्षिणेस दर्गा तर उत्तर दिशेस हात्ती नाला,अग्नेय दिशेला कब्रस्थानच,नैऋत्य दिशेला ए.एस.सी.बी.33केव्ही केंद्र,वायव्य दिशेला दाट झाडी होती,तर इशान्य दिशेला जगतुंग सागरात पाणी वाहून नेणार्या हत्तीनाल्याचे प्रवाहमुख अशा ठिकाणी मी स्थिर वास्तव्यास आल्या नंतर माझे प्रस्त वाढले.पण कांही वर्ष आनंदात गेल्या नंतर एक माझ्या दृष्टीने एक दु:खाची घटना म्हणजे माझी शैक्षणिक सहल 27 डिसेंबर 1982 रोजी मुंबईसह महाराष्ट्रातल्या पर्यटन क्षेत्रास भेट देण्यासाठी क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथुन आरंभली.
जवळपास सहल मुंबई पाहून दि.3 जानेवारी 1983 रोजी सोडत असतांना खंडाळ्या घाटातील लोणावळा येथे हायवेवर सायंकाळी आली आसता साडेपाच सहाची वेळ असावी.ही वेळ माझ्यासाठी कायम दु:खाची ठरली.आजही ही घटना आठवताच मन सुन्न होते.लघुशंकेसाठी आमच्या बस त्या हायवेर थांबली.ती घटना काळच ठरली.कारण संस्थासचिव भाई आज माझे वैभव कंधार तालूक्यातच काय नांदेड जिल्ह्यात नावा रुपास आली आहे,माझ्यात 35-40 वर्गखोल्या आहेत.एक सुंदर कार्यालय आहे.मातोश्री मुक्ताई धोंडगे संस्कृतिक कला मंडप आकर्षनाचे केंद्र आहे.आज पर्य॔त अनेक मुख्याध्यापक व अध्यक्ष झाले.
पण अध्यक्षांची धुरा संस्था सचिव व शाळेचे
अध्यक्ष अॅड.मुक्तेश्वररावजी धोंडगे साहेब झाल्या पासून शाळेनी जणुकांही कात टाकून यशस्वी गरुडझेप घेतली आहे.सखारामजी कलंबरकर सर.अनंतराव धर्मापुरीकर,वि.भा.देशपांडे सर.शिवलिंगजी दुल्लेवाड सर,सौ.ज्योत्सना पुरी मॅडम,मठपती सर,कृष्णाजी जाधव सर, विरेंद्रजी आऊलवार.शेषरावजी गोधणे सर सर सूर्यकांतजी पुणे सर, सर,वरपडे सर,पुरुषोत्तम संगेवार सर असे एका पेक्षा एक सरस प्रधानाध्यापक म्हणुन लाभले होते. आणि कोरोना काळात आलेले सदाशिवराव आंबटवाड सर यांचा कार्यकाळ सुरुवात आहे. सर्व प्राध्यापक ,गुरुवर्य आणि कार्यालयीन कर्मचारी यांनी सर्व मुख्यापकांच्या काळात उत्तमोत्तम सेवा बजावली आहे.मठपती साहेबांच्या काळात ज्युनिअर विभाग सुरु झाला. प्राध्यापक,शिक्षक.शिक्षकेत्तर सहकारी बांधवांची संख्या झपाट्याने वाढली आहे.मु.अ .शिवलिंगरावजी दुलेवाड सरांच्या काळात उज्वल निकालाची परंपरा सुरु झाली.
मातोश्री मुक्ताई धोंडगे सांस्कृतिक कला मंडपात अॅड.डाॅ.प्रकाशजी डोम्पले सर व दत्तात्रय एमेकर गुरुजी यांनी घडवलेली दोन महानायकांची अर्धपुतळे आहेत.त्यातला म.बसवेश्वर महाराजांचा पुतळ्याची तर,संस्थापक-संचालक डाॅ.भाई धोंडगे साहेबांचे ज्येष्ट जावाई माजी नगराध्यक्ष दिवंगत दिगंबरराव पा.लुंगारे साहेबांचे दि.१७ एप्रिल२००७ रोजी निधन झाले.त्यावेळी क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथील शिवजयंती,म.बसवेश्वर जयंती व व्दादशभुजादेवी यात्रा महोत्सव सुरु होता तो रद्द करण्यात आला.१८ एप्रिल रोजी त्यांचा अंत्यविधी पार पडताच १ ते २ तास होतात न होतात तोच क्रांतिसूर्य म.बसवेश्वर महाराजांचा अर्ध पुतळा माझ्या येथील गुराखीपिठावर प्राणप्रतिष्ठीत करण्यात आला.ही घटना मनाला सुन्न करणारी होती.
माझ्याकडे दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण, 26 जुन रोजी छ.शाहु महाराजांची जयंती, 26 जुलै रोजी मातोश्री मुक्ताई धोंडगे यांचा स्मृतीदिनव कारगिल विजयी दिन सर्व शहराती संस्था शाखा एकत्र साजरा करतात.1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी,15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहन,दि.1 सप्टेंबर रोजी शाळेचे अध्यक्ष व संस्था सहसचिव अॅड.मुक्तेश्वर भाऊ धोंडगे यांचा वाढदिवस साजरा होतो.13 सप्टेंबर रोजी हैद्राबाद मुक्ती संग्रामात धारातिर्थी पडलेल्या हुतात्म्याच्या तीर्थक्षेत्राची दर्शन महायात्रात सहभागी,17 सप्टेंबर रोजी सर्व शहरातील शाखांचा एकत्रित कार्यक्रम करण्या आधी ध्वजारोहण केले जाते.नंतर हुतात्म्यांच्या नातेवाईका सहित स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या नातेवाईकांचा सत्कार केला जातो.त्या वेळी माझे मन भावना विवश होते.
देशभक्तीने मला स्फुरणच चढते.मग विद्यार्थ्यांना प्रथम सत्राचे वेध लागतात.नवरात्र आरंभ होताच एमेकर सर नवरात्राच्या औचित्याने “ज्ञान नवरात्र महोत्सव”घेतला जातो.नऊ दिवस वेगवेगळ्या नऊ विषयांचा आभ्यास करुन घेतांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन प्रत्येक विषयाचे एम.सी.क्यूच्या धरतीवर घेतली जाते.त्या नंतर त्यांचा विशेषांक तयार केला जातो.नऊ दिवस चप्पल सोडणार्यां विद्यार्थ्यांना अंधश्रध्दा न करता या नवरात्राचा उपयोग केला जातो. दरवर्षी दहावी अन् बारावीचा निकाल तालुक्यात ठळक असतो.ही गोष्ट माझ्यासाठी भुषणाची आहे.दर वर्षी पहिला क्रमाकावर माझा विद्यार्थी येतो.याचे सर्व श्रेय माझ्या गुरुजनांना जाते.
संस्थेतील गुणी विद्यार्थ्यांची “शर्करातुला” व दि.25 जुन रोजी आणीबाणीच्या निषेध दिनी क्रांतिभुवन बहाद्दरपुरा ता.कंधार येथील श्रीव्दादशभुजा देवी सर्वलोकाश्रय मंडपात आणीबाणीचा विरोध करतांना 13-14 महिने नाशिक सेंट्रल जेल भोगलेल्या वीर सत्याग्रहींचा सत्कार संस्थापक-संचालक,ज्येष्ठ स्वातंत्रता सेनानी डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या संकल्पनेतून संस्थेतील सर्व शाखांतील गुणी जणांचा सत्कार केला जातो.या प्रसंगी सचिव,माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे,सहसचिव अॅड.मुक्तेश्वरराव धोंडगे,डाॅ.प्रा.पुरुषोत्तमजी धोंडगे यांचेसह सर्व शाखांचे मुख्याध्यापक,गुरुजन,शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठीतांची उपस्थिती असते. पण ही सर्व कार्यक्रमाची मालीका सुरु असते पण या वर्षी कोरोना महामरीच्या काळात हे सर्व ठप्प
माझ्या यातना कोरोना संकटात,
दिवसा गणिक वाढत आहे!
विद्यार्थी माझ्या कडे येत नसल्याने,
माझे मन हुंदके देत आहे!
फळा अन् बाकडे विद्यार्थी विना.
धायमोकलून रडत आहे!
माझे मैदान आणि पाण्याचा हौद,
विद्यार्थी दर्शनास अतूर आहे!
सध्या सर्व जगभर कोरोना विषाणुचा कहर झाला आहे.त्या अनुशंगाने संपुर्ण जग एक-दोन महिने लाॅक डाउन होते.आता अनलाॅक 4 चालु आहे.जवळपास 22 मार्च 2020 पासून माझ्या विद्यार्थी येणे बंद झाले.12 वीच्या जवळपास संपल्या होत्या,तर दहावीचा एक पेपर शिल्लक होता.तेंहा पासून माझी कुचंबना होत आहे.दररोज होणारी प्रार्थना म्हणजे माझ्या प्रसन्नतेचा आत्माच होय…ती बंद झाली माझ्या स्थापने पासून असा प्रसंग मी तर कधी पाहिलाच नाही.एवढेच काय मैदान खिन्न नजरेने पाहत आहे…माझी लेकरे येतील केंव्हा या विवंचनेत आहे.माझ्या कॅम्पस मधील वृक्ष तर हिरवीगार दिसून सुध्दा कोमेजलेल्या भावनेने क्षीण नजरेने प्रवेशव्दारा कडे एकटक केविलवाणे पाहत आहेत.पाण्याच्या हौदाचा घसा पाणी असून कोरडा पडला आहे.
मी भरण्या आधी पासून कंधार पंचक्रोशितून येणारे चिमुकले विद्यार्थी अन् शहरातील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेत नळाला आलेले पाणी हिरमुसले होवून घेत नाही.आमच्या येथे येणारी मध्यान्ह भोजनाची खिचडी वाटपाचा ओटा अगदी सुना-सुना वाटतो आहे.त्या ठिकाणी होणारी लेकरांची गर्दी….त्या ओट्याला हवीहवीशी वाटते.मावशीचे छोटे दुकान त्या दुकानावर बच्चे कंपनी खवय्ये घेण्यात उडी पडत असे….ती दिसत नसल्याने ओट्याने तर अंथरूनच धरले आहे.वर्ग खोल्यात तर स्मशान शांतता फक्त पक्ष्यांचा चिवचिवाटच कानी पडतो…वातवरणतर खिन्न आहे.
ब्लॅकबोर्ड तर नुसता घोराने आहे त्यापेक्षा काळाकुट्टच दिसतो आहे.खडूची अन् त्यांची जणुकांही फारकत झालेली दिसते.खडु ऑफिसात डब्ब्यात पडून पार ठिसुळ होवून शेवटची घटका मोजतो आहे.त्यांच्या समोरील बाकड्यांची अवस्था फाच दयनिय आहे,त्यावर एक इंच धुळीने माखला गेला आहे.त्यास वाटत आहे.माझे अडगळीचे एकलकोंडे पण कधी संपणार आहे?या प्रश्नांनी मला तंग करुन सोडले आहे.बच्चे कंपनी म्हणजे माझा जणु आत्माच आहे.गुरुजी विना माझे अस्तित्व अगदी नगण्य वाटते.मला कोरोना काळात आमचे ग्रंथपाल दत्तात्रय एमेकर गुरुजींनी मला बोलकं केल्याने मला माझे शल्य तुमच्या पुढे मांडता आले.
लवकरच मी पुर्वपदी येवून कांही दिवसात सुरळीत होईल अशी आशा आहे.सर्वांना काळजी घेण्याची विनंती करुन मी माझ्या बोलक्या शल्यास पुर्ण विराम देतो.जयक्रांति….!…जय महाराष्ट्र….!!…..जयहिंद….!