“माझे कुटुंब माझी जबाबदारी “मोहिमेत कंधारकरांनी सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे — संजय भोसीकर


कंधार दि 27 सप्टेंबर(प्रतिनिधी)

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना विषाणु चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीम अंतर्गत शहरातील व ग्रामीण भागातील सर्व नागरिकांच्या आरोग्य तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपली व आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची तपासणी करून शासनास सहकार्य करावे असे आवाहन नांदेड जिल्हा काँग्रेस समितीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी आज दिनांक 27 रोजी कंधार येथे आपली व आपल्या कुटुंबीयांची आरोग्य कर्मचाऱ्या मार्फत तपासणी करून घेत आवाहन केले.

भारत देशामध्ये, महाराष्ट्र मध्ये,व आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये शहरी व ग्रामीण भागामध्ये विशेष करून ग्रामीण भागामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असून या विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर आता ग्रामीण भागांमध्ये देखील होऊ लागले आहे यामध्ये हजारो लोक बाधित होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.महाराष्ट्र शासनाच्या वतीने व नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने अत्यंत चांगल्या प्रकारच्या उपाययोजना याठिकाणी करण्यात येत असून कंधार लोहा तालुक्यातील यंत्रणादेखील अत्यंत सक्षम पद्धतीने या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामाला लागलेले आहे.
याच उपाय योजनेचा भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरुवात केली असून या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रत्येक नागरिकांच्या कुटुंबीयांची आरोग्य विभागामार्फत तपासणी केल्या जाणार आहे तरी या मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवून आपली व आपल्या कुटुंबीयांची तपासणी करून घ्यावी व शासनास सहकार्य करावे.
आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर,सौ.वर्षाताई भोसीकर यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या आरोग्याच्या सर्व तपासण्या करून घेतल्या याप्रसंगी त्यांनी कंधार व लोहा तालुक्यातील नागरिकांना असे आवाहन केले कोरोना विषाणू महामारीच्या काळामध्ये नागरिकांनी अत्यंत सावधपणे वागून या संकटाला न घाबरता याचा मुकाबला केला पाहिजे यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे,वारवार हात धुने,सामाजिक आंतर बाळगने,अत्यावश्यक असेल तर घराच्या बाहेर पडणे प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून या संकटात आपला व आपल्या कुटुंबियांना बचाव करावा असे अहवाल संजय भोसीकर व सौ.वर्षाताई भोसीकर यांनी कंधार लोहा तालुक्यातील नागरिकांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *