लोहा ;
लोहा तालुक्यात दिनांक 25 सप्टेंबर व 26 सप्टेंबर 2020 रोजी ढगफुटी होऊन मुसळधार पाऊस पडून आडगाव , बोरगाव, धानोरा, पांगरी, भाद्रा शिवणी,सोनमांजरी आदी पिकाचे प्रचंड नुकसान झाले या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी शिवसेना प्रणित किसानसेनेच्या वतीने किसान सेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील क्षीरसागर आडगावकर यांनी केली.
नुकसानग्रस्त शेत पिकाची पाहणी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेना प्रणित किसान सेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील क्षीरसागर आडगावकर म्हणाले की लोहा तालुक्यातील आडगाव , बोरगाव , पांगरी, धानोरा आदी भागात मुसळधार पाऊस पडून नदी नाल्याला पूर आला या पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरून कापूस ज्वारी सोयाबीन तूर आदी पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे त्यांनी पेरलेल्या पिकांचे पैसेही निघेणात या अतिवृष्टीमुळे उभे पिके आडवी झाली.
तेव्हा या अस्मानी संकटात शेतकऱ्याला सावरण्यासाठी आम्ही किसान सेनेच्या वतीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार असून राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे उत्कृष्टपणे काम करीत आहेत.
शिवसेना ही नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असून शेतकऱ्याला मदत मिळण्यासाठी किसान सेनेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र पाठवून या अतिवृष्टी ग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहोत.व शिवसेना ,किसान सेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे असे किसान सेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील क्षीरसागर आडगावकर म्हणाले.