ही प्रलयाची वेळ आहे..झाले तेवढे पुरे झाले !

*-ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष – लोकजागर•••

मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो, की५ ऑक्टोबरला *लोकजागर अभियान* तर्फे आम्ही *ओबीसी जनगणना सत्याग्रह* जाहीर  करणार आहोत. त्या नंतर ओबीसी आंदोलनाला एक वेगळी धार येईल. व्यापकता येईल. लोकमान्यता प्राप्त होईल. महाराष्ट्रातून एका वेगळ्या इतिहासाच्या निर्मितीची सुरुवात होईल, याची मला खात्री आहे..!-आजवर ओबीसी साठी असंख्य संघटनांनी आपापल्या परीनं भरपूर प्रयत्न केलेत. आंदोलनं केली. अनेकांनी आपलं अख्खं आयुष्य त्यासाठी खर्ची घातलं, याची मला जाणीव आहे.

त्यांच्यामुळेच आपण आज इथपर्यंत आलो आहोत. असे लाखो प्रामाणिक, निस्वार्थ कार्यकर्ते आजही आहेत, हे आपण मान्य केलंच पाहिजे. त्या सर्वांप्रती आपण कृतज्ञ असलो पाहिजे. त्यांचे आभार मानले पाहिजे. उपकार मानले पाहिजे. लोकजागर त्यांचे आभार मानते, समाज त्यांच्या सदैव ऋणात राहील, याची आम्हाला जाणीव आहे !-पण त्याचवेळी त्यातली बरीच आंदोलनं दिशाहीन, दूरदृष्टी नसलेली, स्वार्थानं प्रेरित असलेली आणि राजकीय सुपाऱ्या घेतलेली अशी आहेत, हे सत्यही नाकारता येणार नाहीत.

प्रत्येक पक्षाला *ओबीसी सेल* नावाची नेत्यांच्या स्वागता करिता हार तुरे लटकावण्यासाठीची एक खुंटी असते. ह्यातले बहुतेक सेल कंडंम असतात. दुसरीकडे कुठच चालत नाहीत, अशांना भिंतीवरच्या घड्याळात किंवा एखाद्या बारक्या खेळण्यात घुसवून देण्याची बिनपगारी रोजगार हमी योजना, म्हणजे हे ओबीसी सेल ! हे नेमकं काय काम करतात ? त्यांच्या राजकीय पक्षाची खरकटी काढून धुनी भांडी करण्यातच यांचं सारं आयुष्य खर्ची पडते. नेत्यांच्या वरातीत नाचा, त्यांच्यासोबत फोटो काढा, त्यांच्या आरत्या ओवाळा ह्याशिवाय आणखी काही करतात का ? ५२ टक्के समाजाचे आरक्षण ६/७ टक्या पर्यंत आले, तेव्हा हे सारे ओबीसी सेल कोणत्या नेत्याच्या शेतात कोणते धान उपटत होते ? की कोणाच्या झाडाच्या सुपाऱ्या मोजत होते ? -बहुसंख्य सामाजिक चळवळी का फसतात, कामगार चळवळी का फसतात, शेतकरी चळवळी का फसतात ?

…कारण चळवळीच्या नेत्यांना राजकीय आकलन नसते. काही अपवाद सोडले, तर त्यातले बरेच लोक राजकीय दलाल असतात. मात्र.. ज्यांची तळमळ प्रामाणिक असते, ते बिचारे भाबडे असतात. त्यांना राजकीय डावपेच कळत नसतात. ( तसेही.. राजकारण हे सभ्य लोकांचं काम नाही, असला गांजा या बिचाऱ्यांना आधीच पाजून दिला जातो ) नेत्यांची चालबाजी यांना कळत नसते. त्यांच्या गोड बोलण्यावर भाळून जातात. आणि मग चळवळ तिथल्या तिथंच गोल गोल फिरत राहते. -सरकारनं अलीकडे काही खुल्या  घटकांना दिलेल्या आरक्षणाची आकडेवारी आणि ओबीसी संघटनानी केलेल्या मागण्या यांची तुलना केली तरी या चळवळी कशा केविलवाण्या आहेत, किती लाचार आहेत, हे सहज लक्षात येईल.

उदा. ओपन मधील १५ टक्के समाजासाठी १० टक्के आर्थिक मागासवर्गीय आरक्षण, १२/१३ टक्के मराठा समाजासाठी १३ टक्के आरक्षण वगैरे..! आणि त्याचवेळी ५२ टक्के वाल्यांना असलेले ६/७/१९ टक्के आरक्षण काढू नका.. मुलांसाठी हॉस्टेल द्या.. वगैरे !-बरं या संघटनांच्या मागण्या देखील किती पोरकट असतात बघा,• ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा !( आता बघा, एकीकडे समाज ५२ टक्के. अर्थात मतदान देखील ५२ टक्के. म्हणजे, खरं तर ५२ टक्के असलेल्या लोकांचं सरकारच असायला नको का ?

पण आम्ही काय मागतो, तर स्वतंत्र मंत्रालय द्या ! ज्याला काही बजट नाही.. स्वतंत्र मंत्री नाही. बसायला जागा नाही. फार काय स्वतःचा स्वतंत्र बोर्ड सुद्धा नाही.. असं मंत्रालय ! आहे की नाही लाजीरवाणी परिस्थिती ? ह्या आमच्या संघटना, हे आमचे नेते ! )• ओबीसी विद्यार्थ्यांना हॉस्टेल द्या.• विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाही. स्कॉलरशिप साठी निधी नाही.( मित्रांनो, असल्या मागण्या विद्यार्थी संघटनांनी करायच्या असतात. विरोधातील राजकीय पक्षांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायचं असते.

यावरही ताण म्हणजे, सत्ताधारी पक्षात असलेल्या मंत्र्यावरच जर ह्या मागण्या करायची पाळी आली असेल, तर आपण हसायचं की रडायचं ? पण आमचे सामाजिक नेते त्यावर आनंदाने टाळ्या वाजवतात ! बरं,  मग ओबीसी असलेले हे मंत्री लोक कॅबिनेट मध्ये काय मुख्यमंत्र्याच्या घरच्या पोळ्या लाटायसाठी ठेवलेत का ? की रसाचे आंबे चोळायसाठी ? आणि गम्मत म्हणजे हेच लोक मोठमोठ्या ओबीसी संमेलनात फेटे बांधून मिरवत असतात ! ( कदाचित मनातल्या मनात हसतही असावेत..! ) संघटनांचे नेतेही त्यांना भाऊ भाऊ करून लोणी लावत फिरतात. एवढी लाचारी कशासाठी ? ही वैचारिक दिवाळखोरी नाही का ? आपल्यालाही यांची नाटकं का कळू नयेत ? -असो. आपल्या सर्वामध्येच काहीतरी उणिवा आहेत. त्या दूर करू या ! चूका सर्वांच्याच होतात. त्यातून धडा घेवून, त्या दुरुस्त करत करतच आपल्याला पुढं जावं लागेल. आपापले इगो बाजूला सारावे लागतील. सत्य स्वीकारावे लागेल !

-तेव्हा.. सर्व ओबीसी नेत्यांना माझी नम्र प्रार्थना आहे, की पाणी आता गळ्यापर्यंत आलं आहे ! ओबीसी समाजासाठी ही प्रलयाची वेळ आहे ! अशावेळी तरी पुन्हा फसव्या भूमिका घेवू नका ! पुन्हा पुन्हा समाजाचा वेळ वाया घालवू नका..!*..आजवर झाले तेवढे पुरे झाले..**आता आणखी समाजाची दिशाभूल नको !*-… आणि हो.. युवक आता जागे होत आहेत. यापुढचा इतिहास तेच लिहिणार आहेत. लोकजागर त्यांना योग्य दिशा देईल..! *शंभर युवा, महाराष्ट्र नवा* हा आमचा नारा आहे !

स्वतंत्र बाण्याचे, समर्पित आणि सामाजिक बांधिलकी मानणारे १०० युवा नेते आम्हाला महाराष्ट्रात निर्माण करायचे आहेत. जुन्यांचं मार्गदर्शन आणि नव्यांचा जोश, यातून नव्या महाराष्ट्राच्या बांधणीचा पाया रचायचा आहे. दूरदर्शी, समतावादी, प्रगत महाराष्ट्र उभा करायचा आहे..!-तेव्हा स्वच्छ मनानं लोकजागरच्या सोबत या..! आम्ही आपले स्वागत करू ! *ओबीसी जनगणना सत्याग्रह* म्हणजे नव्या महाराष्ट्राच्या उभारणीची बुलंद सुरुवात आहे, याची खात्री असू द्या. विश्वास असू द्या. निर्धार असू द्या..!


*मी निघालो पुढे, या क्षणापासूनी**जिंकण्याला कुठे तारखा पाहिजे ?*
तूर्तास एवढंच..!-*

( सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा. आपण आपल्या संस्था / संघटनेच्या नावासह सहभागी होऊ शकता. )*-*ज्ञानेश वाकुडकर*अध्यक्ष*महादेव मिरगे*महासचिव*लोकजागर अभियान*9372794271•9004397917(व्हाट्सअप्प)-*ओबीसी जनगणना सत्याग्रह*जिल्हा/विभाग निहाय संपर्क -• मनीष नांदे – प्रदेश संघटक 9545025189• डी. व्ही. पडिले – मराठवाडा  9890585705• मुंबई विभाग – रवींद्र रोकडे  9773436385• कोकण विभाग – समीर देसाई  9004048002• पश्चिम महाराष्ट्र – राजकुमार डोंबे  7378583559 • अमरावती विभाग – प्रभाकर वानखडे  8806385704• नागपूर विभाग – महेंद्र शेंडे  8055502228

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *