नांदेड ; दिगांबर वाघमारे
देवभूमी,संतभूमी,कर्मभूमी या भारत देशात संतांवर हल्ले होत आहेत,ब्राह्मण पुजाऱ्यांवर हल्ले होत आहेत,याविषयी कोणीही आवाज उठविण्यास तयार नाही,कारण या समाजाचा मतदानावेळी (वोट बँक) म्हणून फायदा होणार नाही.
त्यामुळे कोणीही आवाज उठविण्यास तयार नाही,हाथरस प्रकरणात संपूर्ण देशभरातील राजकीय नेते मंडळी आपापले शक्तिप्रदर्शन करत तिथे पोचलेले होते,पण राजस्थान करौली येथील विषयात ना मतदानाचा फायदा,ना शक्तिप्रदर्शनाचा फायदा,ना सोशल मीडियातील चर्चेचा फायदा,इथे काहीच मिळणार नाही त्यामुळे या घटनेकडे गांभीर्याने पाहण्यास कोणीही तयार नाही,पण संपूर्ण देशभरात जर ब्राह्मण समाजाला त्रास द्याल तर याद राखा,समस्त ब्राह्मण समाज पेटून उठेल त्याचे परिणाम गंभीर होतील,जातीय वादाचा तेढ निर्माण करणाऱ्या षंढ लोकांना वेळीच आवर घालावा नाहीतर आम्हालाही एक पाऊल पुढे टाकावे लागेल,तसेच करौली येथील ब्राह्मण कुटुंबातील सदस्याला सरकारी नौकरी,घरकुल,१० लाख रोख अश्या कुटुंबियांच्यावतीने मांडण्यात आला व राजस्थान सरकारने मान्य केलेल्या सर्व मागण्यांचा लाभ तात्काळ स्वरूपात त्या कुटुंबियांना मिळावा,जर येणाऱ्या २० दिवसात हा लाभ मिळाला नाहीतर संपूर्ण देशभरात ब्राह्मण संघटनांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन उभे केले जाईल,
याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे,आमचा समाज जेवढा शांत बसतो तेवढाच आक्रमक देखील होऊ शकतो,देशभरातील प्रत्येक संघर्षातील क्रांतिकारी लोकांच्या यादीत ब्राह्मण व्यक्तीचे योगदान व बलिदान आहेच इतिहास शोधा, वाचा व आकलन करावा,याविषयी महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजातील खासदार,आमदार यांच्याशी सविस्तर चर्चा करून भारताचे गृहमंत्री व राजस्थानचे मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठीही प्रयत्नात राहू,असे संतप्त मत ब्रह्मशिखर परिषदेचे अध्यक्ष श्री.निखिल लातूरकर यांनी व्यक्त केले….