जि.प.शाळेचे मुख्याध्यापक ठरले कोरोनाचे बळी…!
नांदेड –
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार ग्रामीण भागात कोव्हिड सर्वेक्षणाचे काम अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर यांच्यासह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना देण्यात आले आहे. कंधार तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वहादतांडा येथील कर्तव्यावर असलेले मुख्याध्यापक संजीव मारोती गुट्टे (वय ५१) हे कोरोनाचे दुसरे बळी ठरले आहेत. दि. १ आॅगस्ट रोजी सकाळी ६.०० वाजता येथील शासकीय रुग्णालयात प्राणज्योत मालवली. यापूर्वी ९ जुलै रोजी श्री शिवाजी विद्यालय बारुळ ता. कंधार येथील सहशिक्षक संजय वट्टमवार यांचेही कोरोनासंसर्गाने निधन झाले होते.
संजीव गुट्टे यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्याबरोबरच कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने ते नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. परंतु उपचारास प्रतिसाद न दिल्याने त्यांचे निधन झाले. मात्र त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर काल दि. २ आॅगस्ट रोजी उशिरा त्यांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह प्राप्त झाला. १ आॅगस्ट रोजीच रुग्णालयाच्या वतीने त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी यांचा स्वॅबही तपासणीकरिता घेण्यात आला आहे.Attachments area