समाजासाठी मी जनगणना करणार


🙏 मित्रहो,
परत आपण भेटतो आहोत.विषय तोच आमची जनगणना आम्हीच करणार. हे काम लोकजागर च्या नेतृत्वात आपणास सातत्य ठेऊन एक एक ओबीसी सुचिबध्द होत नाही तो पर्यंत करायचे आहे. आपल्या कुटुंबातील सभासदांची ओळख गावातला व्यक्ती येऊन सांगतो काय? नाही.मग ओबीसी हे जर आपलं कुटुंब आहे तर मग या कुटुंबात किती सभासद आहेत हे कुणाला माहीती पाहीजे.

अर्थात कुटुंब प्रमुखाला.ओबीसी प्रवर्गातील प्रत्येक जात हे एक कुटुंब आहे.आणि या कुटुंबाचा प्रमुख/सभासद म्हणुन माझी जनगणना मला करायची आहे ही खुणगाठा मनात बांधुन घ्या. कोणतीही गोष्ट मानसिक स्तरावर स्विकारली ना तर ती नक्कीच पूर्ण होते.कारण तसं मानसिक पाठबळ आपल्या सोबत असते.


ओबीसी हा एक समाज आहे.जातप्रमाणपत्रासाठी ओबीसींप्रवर्गाची ३४२ जातीची यादी आहे. समाजाची टक्केवारी ५२% आहे. एवढा मोठा समाज आज एकसंघ कां नाही ? याचं उत्तर नव्या पिढीचा पाईक म्हणुन आपल्यालाच शोधायचे आहे.*नवी पीढी उत्तरे शोधु लागली की हक्क आणी अधिकाराचा मार्ग आपोआपच तयार होत जाईल.


प्राणिगणना,कृषीगणना,ज़गल गणना, सारीच गणना होते की,मग ओबीसी या सजिव प्राण्याची जनगणना कां नाही? मुख्य प्रश्र्न हा आहे.हा कोणताही राजकिय प्रश्र्न नाही. इतर समाजाची जशी गणना होते .तो किती प्रमाणात आहे त्याची संख्या जाहीर होते, तशीच ओबीसी समाजाची संख्या माहीती होणे एक ओबीसी समाजाचा घटक म्हणुन आपली प्रत्येकाची आहे.१९३१ ला जी जनगणना झाली त्यानुसार ओबीसींची संख्या ५२% आहे.आज ९० वर्षांचा काळ झाला जनावरांपासुन सर्वांचीच संख्या वाढली मात्र ९० वर्षांनंतरही ओबीसी ५२% टक्केच? स्वत:च्या अंतर्मनाला विचारण्यासारखा प्रश्र्न आहे बंधुंनो.


म्हणुन *आमची जनगणना आम्हीच करणार* आम्हीच आमची संख्या निश्चीत करणार आणि त्या संख्येनुसार आमचे अधिकार आम्हीच मागणार.
हा सामाजीक कार्यक्रम आहे.याला कोणतेही राजकिय लेबल लावु नका.तुम्ही कोणती विचारधारा जोपासता हे तुमचे स्वातंत्र आहे. ओबीसी हा आपला स्वाभीमान आहे.त्याला प्रथम जपणे हे आपले कौटुंबीक कर्तव्य आहे.घर मजबुत झाले की गाव आपोआप मजबुत होईल.


१८.१०.२० पासून लोकजागर अभियानाच्या आवाहना नुसार ओबीसी जनगणनेचे शिवधनुष्य आपणास उचलायचे आहे.नक्कीच आपण त्यात यशस्वी होऊ.
आजपासुन गावागावात ओबीसी जनगणनेचा सुरुवात करा.फारच सोपा फार्म आहे.
१.फार्ममध्ये ओबीसी कुटुंबाची माहीती भरा. एका फार्म मध्ये १५ नावे येतील .एका गावात १०० कुटुंब सरासरी ५ सभासद धरले तर एकुण ५०० सभासद यासाठी एका फार्मवर १५ नावानुसार ३३ फार्म लागतील.याचा झेराक्स खर्च फक्त ६६ रु.हा खर्च चार गावसमन्वयकात विभागा.प्रती समन्वयक १६.५०रू.खर्च.समाजासाठी आपण हे नक्कीच करु शकतो.त्यामुळे फार्मचा पुरवठा होईल मग मी जनगणना करणार ही सबब आता बाजुला ठेवा.सबबीमुळेच ५२% समाजाला राजकिय व्यवस्थेने लाचार करुन ठेवलं याला दोषी आपणच आहोत .


२. ओबीसी जनगणनेची आवश्यकता कां.हे समजावुन सांगा.
उठा ,जागे व्हा… स्वप्नाच्या जंगातुन बाहेर या…. येणा-या पिढीसाठी नवा मार्ग तयार करा….
आमची जनगणना आम्हीच करणार
५२% ओबीसी ५२% आरक्षण
ओबीसी मुख्यमंत्री ,बहुजन सरकार
या तिन सुत्रीवर समस्त समाजाला जागे करा.हे तुम्हीच करु शकता.
काम ईतनी शांतीसे करो की, सफलता शोर मचाये!
जनगणनेच्या ऐतिहासीक शुभारंभाच्या हार्दीक शूभेच्छा !!


जय ओबीसी
प्रभाकर कुबडे
गडचिरोली जिल्हा समन्वयक
लोकजागर अभियान
७६२०५९५३६९/९४२२१५४७५९
अठरादहाविसविस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *