लॉ ऑफ सोइंग अँन्ड रिपिंग

लॉ ऑफ सोइंग अँन्ड रिपिंग


माणसं अशी कां वागतात.? या शिर्षकाची खालील कविता आपल्या वाचण्यात आली असेलचएकाची निंदा दुसऱ्यापाशी करतात,नको तेंव्हा नको तिथे नको ते ते बोलतात,गोड-धोड दिसलं की नको तेवढं खातात,माणसं अशी का वागतात.?आवडली मुलगी म्हणून लग्न करतात,थोडे दिवस गेले की कुरापती काढतात,जमत नाही घरी म्हणून घटस्फोट मागतात,माणसं अशी कां वागतात.?काल्पनिक विचारांनी नकारात्मक होतात,सोन्या सारख्या संसाराचे वाटोळे करतात,पत्नी असली सुंदर समजदार तरीही मारहाण करतात,माणसं अशी का वागतात.?थोरांच्या पुण्याईने भले झाले म्हणतात,आई वडील घरात असले की रागराग करतात,मृत्यूनंतर त्यांच्या मात्र सोपस्कार सारे करतात,माणसं अशी का वागतात.?नातेवाईकांची अधी-मधी विचारपूस करतात,चांगले चालले असले की मनातून जळतात,मात्र ‘ऐकून बरे वाटले’ असे वर वर म्हणतात,माणसं अशी का वागतात.?पाहुणा कोणी आला की ‘या बसा’ म्हणतात,’काय काम काढलं.?’ म्हणून हळूच विचारतात,येण्याच्या आनंदापेक्षा जाण्याची वाट पहातात,माणसं अशी का वागतात ?दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करतात,इतरांच्या कामी यावे हे जगाला सांगतात,कुणी काही मागितलं की हसून नाही म्हणतात,माणसं अशी का वागतात.?कुठलाही माल उधारीने मागतात,चार दिवसांत ‘पैसे आणून देतो’ म्हणतात,एकदा घेऊन गेले की तिकडंच तोंड काळे करतात,माणसं अशी का वागतात.?गयावया करून पैसे उसने मागतात,वेळेवर परत देण्याचा वायदा करतात,एकदा काम झाले की विसरून जातात,माणसं अशी कां वागतात.?माणूस कोणी मेला की गळा काढून रडतात,गोडवे त्याच्या मोठेपणाचे तोंड भरून गातात,त्याच्या हयातीत मात्र नेहमी शिव्याच घालतात,माणसं अशी का वागतात.?
लॉ ऑफ सोइंग अँन्ड रिपिंग तीन बाबी अधोरेखित करतो १) जे पेरतो तेच उगवतं. २) जेवढे पेरतो त्यापेक्षा कितीतरी पट अधिक उगवतं ३) पेरलेलं कधी ना कधी नक्कीच उगवतं. आता हा नियम काही फक्त शेतीत किंवा जीवशास्त्रातच लागू होतो असं नाही. जगात हा नियम सर्वत्र लागू होतो, विशेषतः नातेसंबंधांच्या बाबतीत तर जे पेरतो तेच आणि पेरलेल्याच्या कैकपटीने उगवतं हा नियम हमखासच लागू होतो. जगाला दिलेल्या प्रेमाची परतफेड जगाकडुन प्रेमानेच होते अन् द्वेषाची द्वेषाने. आपण इतरांना मान दिला तर आपला कैकपटीने अधिक सन्मान होतो. अपमान अशी फिक्स गुंतवणूक आहे की त्याची परतफेड चक्रवाढ व्याजासकट कधी न् कधी नक्कीच होते. त्यामुळे कुणाचाही अपमान करतांना किमान शंभर वेळा विचार करावा आणि इगो दुखावणे टाळावेच. धारदार शस्त्राचे व्रण कालौघात औषधोपचाराने कधीतरी मिटतीलही पण जीभेने केलेल्या शब्दांचे घाव कधीही भरून निघत नाहीत उलट मनामध्ये खोलवर सातत्याने चिघळणारी जखम करतात. सामान्य माणसांसाठी अपमान सहसा कधीही न विसरल्या जाणारी बाब आहे. 
कुटुंबाशी, समाजाशी, उपकारकर्त्यांशी, राष्ट्राशी, किमानपक्षी स्वतःशी जरी प्रामाणिक राहिले की आपल्याला सुध्दा प्रामाणिक लोकंच पावलोपावली भेटतात. उपकारकर्त्यांशी सुध्दा गद्दारी करणारे बरेच भेटतात. जे उपकारकर्त्यांशी लबाडी करु शकतात त्यांच्यावर भरवसा ठेवणे म्हणजे आत्मघातच होय ना.? समगुणी, समव्यसनी, समवयी, समविचारी – काहीतरी समानता असल्याशिवाय माणसे एकत्र येत नाहीत. विभिन्न स्वभावगुणांची माणसे चुकुन एकत्र आलीच तरी दिर्घकाळ एकत्र टिकू शकत नाहीत, हे जगातील सगळ्यात मोठे व त्रिकालाबाधित वास्तव आहे. स्वाभिमानी, इमानदारी, सत्यवचनी व्यक्ती चोर लबाडांची कंपनी फार वेळ सहन करुच शकत नाही. अ मँन इज नोन बाय हिज कंपनी – आपण लबाडांशी जवळीक केली तर लोक आपल्याला सुध्दा लबाड समजायला लागतात, आपण चोराच्या सानिध्यात जास्त वेळ घालवू लागलो तर आपल्यावरही चोरटा हा शिक्का बसू शकतो. लाचारांशी केलेली मैत्री आपली प्रतिमा सुध्दा लाचार माणूस अशीच जगापुढे आणणार. त्यामुळे माणसं जवळ करताना फार काळजीपुर्वक निवडावीत. काही लोक लबाडी, चोरी, बेईमानी झाकण्यासाठी केलेल्या लाळघोट्या लाचारीला नम्रता समजण्याचा नादानपणा करुन स्वतःच वारंवार फसविले जातात आणि मग आयुष्यभर माझं मीठच आळणी आहे अशी ओरड करत बसतात. आयुष्यात बाकी काही नाही शिकता आले तरी चालेल, माणसं ओळखायला मात्र शिकलेच पाहिजे. जहाँ झुठे फरेबी तरक्की करे और इमानदार अपमानित किया जाता हो वहाँ विनाश अटल है, हे कायम लक्षात ठेवावे. चोरांचा उदोउदो आणि प्रामाणिकांचा अपमान स्वप्नात सुध्दा होऊ देऊ नये. खऱ्यांचा अपमान सदैव विनाशाकडेच नेणारा असतो, फिर चाहे आप भलेही कितने भी शातीर खिलाडी क्यो न हो..? जो इतरांना संपविण्याची तयारी करतो, तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे.! माणसाला दुसऱ्याची वाट लावता-लावता स्वतःची वाट केव्हा लागते, हे कळत सुध्दा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागावे. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करावे.
माणसाचा दर्जा हा वय, पद, पैसा, जात किंवा मिळकती वरून न ठरवता विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना. कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही.! लक्षात ठेवा – चोरी, लबाडी, गद्दारी, बेईमानी, लाचारी, इत्यादी अवगुण कितीही लपूनछपून केले तरी कधी न् कधी उघडे पडतातच.! लबाडी, बेईमानी, चोरी अशी आखुड चादर आहे की पाय झाकले तर डोके उघडे पडते अन् डोके झाकले तर पाय उघडे पडतात. हर नजर मे मुमकीन नही बेगुनाह रहना, चलो कोशिश करे खुद की नजर में बेदाग रहे. सबका मंगल हो.! 


इंजि. शिवाजीराजे सुनिता भिमराव पाटील, नांदेडमास्टर कोच – जवाहरलाल नेहरु लिडरशिप इंन्स्टिट्युट, नवी दिल्ली[email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *