कंधार ; दत्तात्रय एमेकर
कंधार शहर व परिसर म्हणजे ऐतिहासिक शिल्पकलेचा जणु खजीनाच…राष्ट्रकुट कालिन कंधार नगरीत कालप्रयनाथांची 12 मंदिरांचा ऐतिहासिक ठेवा होता.काळाच्या ओघात त्या मंदिरा पैकी कांही मंदिरे काळाच्या गर्तेत लोप पावले.पण त्यांची अवशेष आपल्याला पिंडिच्या रुपाने आज शांतिघाट बहाद्दरपुरा येथे मन्याड नदीच्या राजीव सागरात आज प्राणप्रतिष्ठापणा होवून मंदिर प्रगती पथावर आहे.
या मंदिराचे संयोजक व संकल्पक डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे असून त्यांना सहकार्य माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे व शांतिघाट विकास समितीचे तत्कालिन अध्यक्ष दिवंगत भाई विठ्ठलराव पा.पेठकर यांचे व त्यांच्या सहकार्याचे लाभले.
डाॅ.भाई केशवराव धोंडगे हे पहिल्यांदा आमदार म्हणुन 1957 सालच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडल्या नंतर,बरोबर 20 जानेवारी 1959 या दिवशी तत्कालिन आमदार भाई केशवराव धोंडगे यांनी छोटी दर्गा व मोठी दर्गातून सात शिवलिंग स्वतःच्या हातात खुस्सा घेवून त्या पिंडी हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी नांदेड येथील शासनाच्या पुरातत्व खात्याकडे सुपुर्द करुन दिल्या.तेंव्हा पासून नांदेड नंदीग्राम नगरीत कलामंदिर परिसरात जवळपास चाळीस वर्षाचा वनवास भोगत होत्या.
डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांनी सलग 40 वर्षाचा पाठपुरावा अखंड सुरु ठेवला.या प्रयत्नाला यश मिळाले ते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री, पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिन व माजी पंतप्रधान याह्यासूरमर्दिनी प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनी म्हणजे 31 आक्टोबर 2008 रोजी क्रांतिभुवन बहाद्दरपुरा नगरीतील शांतीघाट विकास समितीकडे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या कडे सपुर्द करण्यात आल्या. त्यांच्या 40 वर्षाच्या प्रयत्नांना यश आल्याने कंधार शहरात न नेता बहाद्दरपुरा नगरीत नेण्याची शासनाच्या पुरातत्व खात्याने परवानगी देत, सुपुर्द करण्यात आल्या.
श्री कालप्रियनाथांच्या शिवलिंग पिंडीची मिरवणुक कलामंदिर नांदेड येथुन ट्रॅक्टर मध्ये मिरवणुक निघतांना पिंडीचे जागोजागी स्वागत करण्यात येत होते. सोबत शंख निनादाचा गजर होतांना वातावरण शिवभक्तीमय होत होते. जानापुरी,सोनखेड,लोहा,गुराखीगड,कंधार येथे स्वागत झाल्या नंतर कंधारच्या प्रमुख रस्त्याने बस स्थानक महाराणा प्रताप चौक,डा.आंबेडकर चौक,ऐतिहासिक शिवाजी चौक,बौध्द व्दार , सराफा लाईन.गांधी चौक,रंगार गल्ली,चांभार बेस,श्री शिवाजी विधी महाविद्यालय,वीर नागोजी नाईक चौक,चर्मकार गल्ली क्रांति टावर,छ.शिवाजी महाराज पुतळा मार्गे श्री व्दादशभुजा देवी म॔दिर,सर्वलोकाश्रय मंडपात स्थानापन्न करण्यात आले.त्या ठिकाणी पोहंचताच ग्रामिण लेखिका,डाॅ.भाई धोंडगे साहेबांच्या अधिश्वरी सौ.चंद्रप्रभावतीबाई केशवराव धोंडगे माय यांच्या व त्यांच्या स्नुषा सौ.संध्याताई मुक्तेश्वरराव धोंडगे आणि सौ.मनिषाताई पुरुषोत्तमराव धोंडगे यांच्या समर्थ हस्ते पुजन करुन आरती करण्यात आली.
या प्रसंगी अॅड मुक्तेश्वरराव भाऊ धोंडगे,प्रा.पुरुषोत्तम भाऊ धोंडगे,प्राचार्य डाॅ अशोकराव गवते,प्रा.डाॅ.सुभाषराव नागपुर्णे सर,सरपंच बाबुराव ऐनवाड,शांतीघाट विकास समितीचे सचिव माणिकराव कळणे,सूर्यकांत कावळे,पंडितराव पेठकर, माधवराव पेठकर, उप सरपंच मनोहर पेठकर,सुभाषराव मोरे,सुभाषराव मामा केरवाडीकर,कलमे गुरुजी, प्रभाकर पेठकर,प्रल्हाद पेठकर,संजय शेकापुरे,गणपतराव पेठकर,बाबुराव धोंडीबा पेठकर,रामु जाधव,रुमाले गुरुजी, श्री कालप्रियनाथ मंदिर व नियोजित साळंखपिंडीची प्रतिकृती साकारणारे कलावंत दत्तात्रय एमेकर गुरुजी व अॅड.प्रकाश डोम्पले,व्हीडीओ ग्राफर बालाजी एमेकर,डाॅ.प्रा.गंगाधर तोगरे,बालाजी परोडवाड,राजु शेकापुरे,दत्तात्रय विठ्टलराव पेठकर,व्ही.जी.चव्हाण सर,घोरबांड सर,जंगम गंगाधर महाराज स्वामी आदी जण साक्षीला होते.