वाढदिवसाच्या अनाठायी खर्च टाळून मुलींच्या वसतिगृहास २१ हजारांची मदत

नांदेड –

नांदेड – वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक विनय पाटील गिरडे यांनी त्यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठा मुलींच्या वसतिगृहासाठी २१००० रूपये मदत म्हणून दिली आहे. कोरोनाकाळात वाढदिवस साजरा न करता मराठा समाजातील शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलींच्या वसतिगृहासाठी मदत देण्यात आल्यामुळे विनय पाटील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. 

     शहरातील नवामोंढा परिसरात मराठा सेवा संघ तथा इतर सहयोगी संघटनांच्या परिश्रमातून किमान शंभर मुलींसाठी वसतिगृहाची देखणी इमारत उभी राहत आहे. सोमवारी ता. २ नोव्हेंबर रोजी मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून वसतिगृहासाठी एकवीस हजार रुपये देणगी दिली आहे. ही मदत मराठा सेवा संघाचे तेलंगणा प्रभारी डॉ प्रा गणेश शिंदे यांनी स्विकारली.

यावेळी कृषी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ सोपानराव क्षिरसागर मामा,  मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर,  इंजि.तानजी हुस्सेकर,युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, संभाजी ब्रिगेडचे लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव अँड सतिश कुमार जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष उद्धव सुर्यवंशी,  दक्षिण जिल्हा सचिव रमेश पवार,  संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, जिल्हा उपाध्यक्ष राम आनकाडे, कांकाडीचे ‌सरपंच सुदिन पाटील बागल, युवक काँग्रेसचे सतिश पाटील बस्वदे,राजु लांडगे, अंकुश पाटील शिखरे , शाहीर गौतम पवार व मित्र परिवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *