फडणवीस, अर्णव आणि कंगना : ‘हिमो-उन्मादा’चे बळी !


•फडणवीस यांचं अलीकडचं ओंगळवाणं राजकारण पाहिलं, तर ते कधीकाळी सभ्य राजकारणी होते, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. तसाही दुटप्पीपणा हा अलीकडच्या राजकारणाचा सर्वपक्षीय स्थायीभाव झाला आहे. पण तरीही काही पक्षांना स्वातंत्र्याच्या लढाईचा वारसा आहे. काहींना समाजवादी विचारांची पार्श्वभूमी आहे. मात्र भाजपा किंवा त्यांच्या आधीची जी संस्थात्मक पिलावळ आहे, तीच मुळात द्वेषाची पेरणी करणारी आहे.

देशद्रोहाची वाहक आहे. कपट हा त्यांचा आत्मा आहे. दांभिकपणा, खोटारडेपणा, निर्लज्जपणा तर त्यांच्या नसानसात भरलेला आहे. इंग्रजांची दलाली, गांधी हत्या, गोडसे प्रेम हा त्यांच्यासाठी अभिमानाचा विषय आहे. एकीकडे गांधींना प्रत:स्मरणीय म्हणायचं आणि त्याचवेळी मागच्या दारानं गोडसेचा उदोउदो सुद्धा करत राहायचं, हा यांचा खानदानी वारसाच ! संघ, मोदी किंवा भाजपचे नेते यांनी खुल्या मनाने कधीतरी गोडसेचा निषेध केला आहे का ? -महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जप करणे, बुद्धाला नववा अवतार म्हणून हिंदू धर्मात जोडून घेणे, असले त्यांचे कारस्थान लक्षात न आल्यामुळे काही भोळे बहुजन देखील त्यांच्या गळाला लागतात.

धर्म हा देखील त्यांनी ओबीसी, बहुजनांची शिकार करण्यासाठी लावलेला सापळा आहे. संघ भाजपाच्या लोकांना नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांनी सांगितलेला समतावादी हिंदू धर्म, समतावादी वारकरी संप्रदाय त्यांना नको आहे. त्यांना झेपणार देखील नाही.-मात्र पुरोगामी, मागासवर्गीय चळवळ देखील अलीकडे एकांगी आणि आक्रस्ताळी होत गेली होती. त्यातही काही पुस्तकी पंडितांनी गांधी द्वेष आणि ब्राह्मण द्वेष हेच आपले मुख्य हत्यार मानले आहेत.

त्यातूनच मग चळवळ असो कि पक्ष असो, मोठा करायचा असेल, तर कृत्रिम का होईना पण शत्रू निर्माण करावाच लागतो, असले बिनडोक तत्वज्ञान राजरोस मांडले गेले. ते सर्वमान्य देखील झाले. मग स्वतःची डोकी गहाण टाकलेले लोक अलगद त्यात फसत गेले. गांधी द्वेष आणि हिंदू द्वेष एवढा वाढत गेला, की त्याची प्रतिक्रिया म्हणून भाजपसारख्या विषमतावादी, समाज विघातक आणि कुटील पक्षाच्या हातात लोकांनी सत्ता देवून टाकली.

मोदी सारख्या प्रवृत्तीचा लोक गौरव करायला लागले. अमित शहा सारखा धक्कादायक इतिहास असलेला माणूस त्यांच्या जोडीला होताच. ऐनवेळी गडकरींचा गेम केला गेला. आणि मग संघही मोदी पुढे लाचार झाला. मोदींच्या उदयामुळे देशाचं तर नुकसान झालंच, पण संघाचं मात्र कल्पनेच्या पलीकडे नुकसान झालं. एक दूरदर्शी नेता मिळाला तर देश पुन्हा उभा राहू शकतो. पण संघासाठी मात्र आता एवढं सोपं राहिलं नाही. त्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत. नजीकचा काळ त्यांच्यासाठी अतिशय भयानक असणार आहे ! 

-हिटलर आणि मोदी सख्खे मावसभाऊ असावेत, एवढं त्यांच्यात विकृत साम्य आहे. ज्या क्षणी मोदींच्या दादागिरी पुढं संघानं नांगी टाकली, संजय जोशीचा बळी दिला त्या क्षणीच संघाच्या विनाशाला सुरुवात झाली. देशाच्या दुर्दैवानं मोदी पंतप्रधान झाले. शहा सारखा महापराक्रमी माणूस भाजपाचा अध्यक्ष झाला. संघाला त्यांच्यासमोर शेपटी हलविण्याशिवाय पर्याय उरला नाही ( संघ भक्तांना हे पचायला जड जाईल, पण भविष्यात त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही ). आणि या साऱ्याचा नैसर्गिक परिणाम म्हणून मग ‘हिमो-उन्माद’ वाढतच गेला.

राफेल घोटाळा झाला, मोदी उत्तर देणार नाहीत ! ३०० किलो आरडीएक्स कुठून आले, उत्तर देणार नाही ! ४२ सैनिक मारले गेले, त्याची चौकशी नाही, उत्तर देणार नाही ! शहाच्या पोराची प्रॉपर्टी नोट बंदिनंतर रातोरात कशी वाढली, उत्तर देणार नाही ! लाल किल्ल्यासह देशाची एक एक संपत्ती विकली जात आहे, उत्तर देणार नाही ! शेखचिल्ली सारखे अचानक लॉक डाऊन जाहीर का केले, स्थलांतर करतांना किती गरीब मजूर मेले, उत्तर देणार नाही ! संसदेत बोलणार नाही ! पत्रकारांना सांगणार नाही ! हिटलरची मुजोरी आणि मोदींची राजवट ह्यात काही फारसा फरकच उरला नाही. ही परिस्थिती अराजक माजवणारीच आहे.

या ‘हिमो-उन्मादा’ची अशी असंख्य उदाहरणं देता येतील.-या माजाची लागण मग झपाट्यानं होत गेली. सत्ता गेल्यामुळे संतुलन बिघडलेल्या नेत्याच्या बायकोनं तर चक्क ‘मेरा क्या उखाड लोगे’ अशी भाषा थेट मुख्यमंत्र्याच्या बाबतीत जाहीरपणे वापरली ! एखादी गांजाखस नटी देखील झेड सिक्युरिटी मध्ये ऐटीत वावरायला लागली. मुख्यमंत्र्यांना अरे, तुरे करायची हिम्मत दाखवू लागली..!-अर्णव गोस्वामी हे ‘हिमो-उन्मादा’चं सर्वात ठसठशीत उदाहरण आहे ! कोण आहे हे माणूस ? पत्रकारितेच्या नावावर राजकीय भडवेगीरी करणारा दलाल ! हीच त्याची ओळख, हाच त्याचा धंदा, तीच त्याची लायकी ! मोदी – शहा यांच्या उदयानंतर ही प्रवृत्ती राजरोस धंदा करायला लागली होती. असल्या बाजारू लोकामुळे ‘हिमो-उन्माद’ जास्तच फसफस करत होता. कसलेही तारतम्य, विधिनिषेध या लोकांनी ठेवला नव्हता.

पण मुंबई, सेना आणि पवार हे कॉकटेल किती भयंकर परिणाम दाखवू शकते, याचा अंदाज भाजपाच्या बांडगुळांना आला नाही. आणि वाटेल तसा नंगा नाच करत सुटले. अर्णव सारख्या संशयित खून्याची बाजू घेतांना तर थेट शहा वगैरे धावून आलेत. यावरूनच यांची सांस्कृतिक लायकी लक्षात येते. -देवेंद्र फडणवीस देखील असेच अलगद सापळ्यात अडकलेत. त्यांची भाषा आणि व्यवहार सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा ओलांडणारीच होती. फुग्यातली हवा पुरती निघून गेली तरी ते अजूनही जमिनीवर आल्याचे लक्षण दिसत नाही.

-फडणवीस हे ‘हिमो-उन्मादा’चे पहिले बळी होते, अर्णव हा दुसरा बळी आहे आणि कंगणा बाई.. ही तिसरी बळी असणार आहे !-समझनेवालोंको इशारा काफी है.. तेव्हा.. शहाणे असतील त्यांनी वेळीच सावध व्हावे.. अजून वेळ गेलेली नाही !
तूर्तास एवढंच..

ज्ञानेश वाकुडकर
ज्ञानेश वाकुडकर

-*ज्ञानेश वाकुडकर*

अध्यक्षलोकजागर अभियान•

••संपर्क – *लोकजागर अभियान*

• 9004397917• 9545025189•

9422154759• 9773436385•

8806385704• 9960014116

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *