रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दिवसेंदिवस या प्रकरणावरून एकमेकांवरील आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडतच चालल्या आहेत. त्याचवेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षितता व तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यावरून गृहमंत्री आणि देशमुख यांनी राज्यपालांना गोस्वामीबाबत कोणतीही चिंता करू नका असे सांगत त्यांच्या सुरक्षिततेविषयी आश्वस्त केले होते. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपालांना याच मुद्दयाला अनुसरून जोरदार टोला लगावला आहे.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी शरद पवार हे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, राज्यपालांनी गृहमंत्र्यांना फोन करून अर्णव गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली ते चांगले आहे. पण मला वाटते त्यांनी ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली असते तर ते अधिक चांगले झाले असते, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना टोला लगावला आहे. अन्वय नाईक कुटुंबियांसोबतचा सोशल मीडियावरचा माझा फोटो ५ वर्षांपूर्वीचा आहे, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
पवार म्हणाले,बिहार निवडणुकीत आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही. तेजस्वीला फ्री हँड द्यायचा होता. यातूनच देशातील यंगस्टार्सना प्रेरणा मिळणार आहे. तसेच सुरु असलेल्या बिहार निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपाच्या जास्त जागा दिसत असले तरी पण नितीशकुमार यांचे मोठे नुकसान होईल असे जे वाटले होते तसे काही घडले नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये चमत्कार झाला हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला आहे अशा शब्दात पवारांनी यावेळी फडणवीसांना देखील चिमटा काढला.
पुढे पवार यांनी सांगितले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल घेतलेली भेट ही फक्त मी रयतची देणगी रक्कम देण्यासाठी होती. त्यात विधानपरिषद राजकारणावर कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. अमेरिकेचा निकाल स्वच्छ आहे. तरीही ट्रम्प मीच विजयी झालो असे म्हणत असतील तर ते त्यांच्या वयाला साजेसे नाही.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर केंद्रातील मोदी सरकारची पहिली प्रतिक्रिया आली. मुंबईत पत्रकारितेवर जो हल्ला झाला आहे तो निंदनीय आहे. महाराष्ट्र सरकाची कारवाई आणीबाणीसारखी आहे. आम्ही अर्णववरील कारवाईचा निषेध नोंदवतो, अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी टीका केली आहे.
प्रकाश जावडेकर यांनी अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर ट्विट करुन महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. अर्णव गोस्वामीवर केलेली कारवाई प्रेस-पत्रकारितेवर हल्ला असल्याची टीका त्यांनी केली. अर्णव गोस्वामी यांच्यावरीलर कारवाई आणीबाणीसारखी असल्याची टीका देखील जावडेकर यांनी साधला. महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईची निंदा करतो, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.
५३ वर्षीय इंटीरियर डिझायनरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. मात्र या प्रकरणाला आता राजकीय रंग दिला जात आहे. केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे सांगत ही बदला म्हणून केलेली कारवाई असल्याचे म्हटले आहे. आता गृहमंत्र्यांनीही उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा लज्जास्पद केले.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला आहे. जर एखादा व्यक्ती त्यांच्या सरकारविरोधात बोलत असेल तर याप्रकारे प्रयत्न केले जातात. आणीबाणी याचेच उदाहरण आहे की कशा प्रकारे लोकांचा आवाज दाबला जातो. विरोधात जे लोक बोलतात त्यांना प्रतारणा सहन करावी लागते.
या घटनेबाबत त्यांनी ट्वीट करून लिहिले, काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाजवले आहे. रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामीविरोधात राजकीय शक्तींचा वापर करत व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला आहे. या गोष्टी आणीबाणीची आठवण करून देतात. स्वातंत्र्य पत्रकारितेवरील या हल्ल्याचा विरोध केला गेला पाहिजे.
रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात राजकीय सत्तेचा गैरवापर करत व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हा हल्ला आहे. यामुळे आणीबाणीची आठवण झाली. ते म्हणाले, काँग्रेसची ही सवयच आहे की जे कोणी त्यांच्या अथवा त्यांच्या सरकारविरोधात बोलतात त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते. तसेच आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले असतील. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून कुणावरही सूडबुद्धीने किंवा बदलाच्या भावनेतून कारवाई करण्यात आलेली नाही, असा दावाही राऊतांनी केलाय. अर्णव गोस्वामी यांनी गेल्या काही महिन्यात आपल्या चॅनेलच्या माध्यमातून राज्य सरकारवर अनेक खोटे आरोप केले आहेत. त्या आरोपांबाबत संबंधित चॅनेलची चौकशी करावी, अशी मागणीही राऊतांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. यापूर्वी अर्णव गोस्वामी यांची चौकशी झाली होती, पण कारवाई झाली नव्हती. कलम ३०६ आणि ३४ अंतर्गत अन्वय गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अक्षता नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत २६ मे २०२० रोजी सांगितलं होते की, “आज्ञा नाईक (अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांची मुलगी) यांनी अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकनं पैसे थकवल्यानं वडील आणि आजीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत नाहीत, अशी तक्रार केली. त्यानंतर मी सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.”
वास्तूविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना करण्यात आलेल्या अटकेनंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी याबाबत जोरदार निषेध सुरु केला. त्यात भाजप आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार हे आघाडीवर असल्याचं दिसतं आहे. आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन सरकारवर टीकेचा भडीमार सुरु केलेला आहेच मात्र, याशिवाय त्यांनी पत्रकार परिषद घेऊन देखील शिवसेनेवर निशाणा साधला.
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर ठाकरे सरकारवर टीका करताना आशिष शेलार म्हणाले की, ‘काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस… महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने?’ असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे. यानंतर आशिष शेलार यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी आशिष शेलार असं म्हणाले की, ‘नाईक परिवाराला न्याय मिळायलाच हवा…मात्र घटनाचक्र असे सांगतेय की, आपण केलेल्या कु-कृत्याला झाकण्यासाठी ठाकरे सरकार सुडबुध्दीने अर्नब गोस्वामी यांच्यावर कारवाई करत आहे.
उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची सेना ही अखेर सोनिया सेना झाली! कायदेशीर रित्या बंद झालेल्या केस उघडायच्या झाल्यास ठाण्यातील आत्महत्या केलेल्या बिल्डरची डायरी पण उघडावी लागेल! आझाद काश्मीरचा बोर्ड घेऊन गेट वे आँफ इंडियाला उभा राहणाऱ्या मेहक प्रभूवर कारवाई होत नाही पण त्याबद्दल प्रश्न विचारणाऱ्या माध्यमांचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही, असे संकेत राज्य सरकार देतेय! अर्नब गोस्वामी यांच्यावर झालेली कारवाई आणि त्यापुर्वीचे सगळे घटनाक्रम असे संकेत देतात की, हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आम्हाला अडचणीत आणणारे प्रश्न विचाराल तर ठोकून काढू अशा पद्धतीने ठाकरे सरकार वागत आहे. नाईक परिवाराला न्याय मिळायलाच हवा…मात्र घटनाचक्र असे सांगतेय की, आपण केलेल्या कु-कृत्याला झाकण्यासाठी ठाकरे सरकार सुडबुध्दीने अर्नब गोस्वामी यांच्यावर कारवाई करतेय! इंदिराजी गांधी यांच्या काँग्रेसने लादलेल्या आणिबाणीची शिवसेना त्यावेळी “समर्थक” होती…आज सोनियाजी गांधी आणि राहुल गांधी यांच्या काँग्रेसच्या आणिबाणीची शिवसेना “व्यवस्थापक” झाली आहे.
यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. राज्याचे पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करत आहे. देशमुख पुढे म्हणाले, मृत डिझायनरची केस पुन्हा उघडण्यासाठी कोर्टाने सांगितले होते. त्यानंतरच केस पुन्हा उघडण्यात आली. देशमुख म्हणाले, कोर्टाने हे प्रकरण पुन्हा उघडण्यास परवानगी दिली आहे.
अटकेवर भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या प्रकरणााची निंदा करताना म्हटले की काँग्रेस नेता सोनिया गांधी आणि राहुल गांधी निर्देशित हे लाजिरवाणे कृत्य आहे. नड्डा यांनी ट्वीट करत म्हटले की प्रत्येक व्यक्ती जो पत्रकारितेचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास ठेवते ते महाराष्ट्र सरकारच्या दादागिरी तसेच या प्रकरणामुळे खूप चिडली आहे. हे लाजिरवाणे आहे.
एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने ने या अचानक अटक प्रकरणाची निंदा केली तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली की या प्रकरणी निष्पक्ष व्यवहार केला जावा तसेच टीका करणाऱ्या रिपोर्टिंगविरोघात सरकारी ताकदीचा वापर केला जाऊ नये. गिल्डने आपल्या विधानात म्हटले की गोस्वामी यांची अटक हीबातमी आश्चर्यचकित करणारी आहे.
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून सरकार तसेच भाजपच्या नेत्यांकडून केली जाणारी निंदा पाहून काँग्रेसने आरोप लावला ककी त्यांचा आक्रोश हा मोजका आणि लाजिरवाणा आहे. पक्षाचे प्रवक्ते सुप्रिया श्रीनेत म्हणाले, या प्रकरणात कायदा आपले काम करत आहे. मी हैराण झालो हे पाहूनकी सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा आक्रोश खूप मोजका आहे. जेव्हा उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये मीठ-चपाती खाण्याच्या बातमीनंतर एका पत्रकाराला महिनाभर जेलमध्ये टाकले जाते, जेव्हा पत्रकारांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली जाते तेव्हा हा आक्रोश का दिसत नाही? काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी दावा केला की भाजप या देशात शेवटचा पक्ष आहे जे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबद्दल बोलू शकतात. त्यांचे वागणे लज्जास्पद आहे. काँग्रेसशासित राज्यांमध्ये कोणासोबत अन्याय होणार नाही आणि कायदा आपले काम करेल.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री इरानी यांनी ट्वीट केलेकी , जर आज स्वातंत्र्य पत्रकारितेचे लोक अर्णब यांच्या समर्थनार्थ उभे राहत नसतील तर तुम्ही राजकीय दृष्ट्या फासीवादाचे समर्थन करता. जरी तुम्ही त्यांना पसंत करत नसाल, ते तुम्हाल मान्य नसती, त्यांची उपस्थिती तुम्ही नजरअंदाज करत असाल मात्र जर तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही याला समर्थन करता.
भाजपचे वरिष्ठ नेता रवीशंकर प्रसाद यांनी अर्णब गोस्वामींना झालेली अटक ही निंदनीय, तसेच हैराणजनक असल्याचे म्हटले आहे. प्रसाद यांनी ट्वीट केले की वरिष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामींना झालेली अटक योग्य नव्हे. आम्ही १९७५ मध्ये आणीबाणीविरोधात लढा देत पत्रकारितेच्या स्वातंत्र्यासाठी लढलो होतो.
राज्यातील महाविकास आघाडीच्या अपयशाबद्दल आणि चुकांबद्दल जाहीर सवाल करणारे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकरवी अटक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला आहे. ठाकरे सरकारची ही कृती आणीबाणीबातील दडपशाहीची आठवण करून देणारी आहे. भारतीय जनता पार्टी या दडपशाहीचा निषेध करते.’ अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर दडपशाही करण्याचा भाजपा निषेध करते. संविधानाच्या मूल्यांवर विश्वास असणाऱ्या सर्वांनी या प्रसंगी ठाकरे सरकारचा निषेध केला पाहिजे व घटनात्मक चौकटीत आणि कायदेशीर मार्गानेच काम करण्याचा आग्रह धरला पाहिजे. भाजपाचे कार्यकर्ते राज्यभर या अत्याचाराचा निषेध करतील. त्याचबरोबर लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्व सुजाण नागरिकांनी आपापल्या पद्धतीने राज्य सरकारचा निषेध करावा. राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन, उपोषण, सरकारी कामकाजात असहयोग, सोशल मीडियावर आवाज उठवणे, मोर्चा काढणे, अशा शक्य त्या मार्गाने निषेध करावा.’ असं थेट आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.
त्यांनी पुढे असंही म्हटलं की, ‘अर्णब गोस्वामी यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे अडचण झालेल्या ठाकरे सरकारने एका वास्तूविशारदाच्या आत्महत्येचे जुने प्रकरण उकरून काढून गोस्वामी यांना अटक केली. खरे तर या प्रकरणाचा तपास २०१८ साली बंद झाला होता. राज्य सरकारला पुन्हा तपास करायचा असेल तरी त्यासाठी घटनेची चौकट आणि कायदेशीर प्रक्रिया यांचे पालन केलेच पाहिजे. तपासाच्या नावाखाली अत्याचार करणे ही केवळ मुस्कटदाबी आहे.’
ते म्हणाले की, ‘पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने जमावाने साधूंची हत्या करणे किंवा सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण अशा प्रकरणात पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी स्पष्टपणे व ठामपणे प्रश्न विचारून ठाकरे सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणले होते. एक निर्भिड आणि रोखठोक पत्रकार म्हणून अर्णब गोस्वामी आपले काम करत असताना ठाकरे सरकारने सूडबुद्धीने अर्णब गोस्वामी यांना अटक केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली त्यावेळी सरकारचे अपयश आणि अत्याचार लपविण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांवर वरवंटा फिरविण्यात आला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली गेली. त्याच पद्धतीने काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेऊन ठाकरे सरकारने महाराष्ट्रात माध्यमांची गळचेपी सुरू केली आहे. पत्रकारांना अटक करून खटले दाखल करण्याचे प्रकार या सरकारने सुरू केले आहेत. त्यासाठी कोणत्याही घटनेचे निमित्त केले जात आहे. मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर शिवसेनेने काँग्रेसची आणीबाणीची हुकुमशाही मानसिकता स्वीकारल्याचे दिसते. पंचेचाळीस वर्षांपूर्वी जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी आणीबाणीच्या विरोधात लढा दिला. आजही आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करू.’ असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्याच्या प्रकरणात विविध प्रतिक्रिया उमटत असताना आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उडी घेतली. अर्णब यांच्या अटकप्रकरणी कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला. कोश्यारी यांनी गृहमंत्र्यांसोबत अर्णब यांच्याबाबत चर्चा केली. अर्णब यांच्या सुरक्षा आणि आरोग्याबाबत कोश्यारी यांनी चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसंच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली.
भाजप आमदार राम कदम अर्णब यांच्या भेटीला
भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम अर्णब गोस्वामी यांना भेटण्यासाठी तळोजा जेलमध्ये दाखल झाले आहेत. अर्णब यांच्याबाबत चौकशी करण्यासाठी आपण तळोजाला जात असल्याचं कदम यांनी सांगितलं. तत्पूर्वी राम कदम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. अर्णबप्रकरणी चर्चा करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना वेळ मागितली होती. पण मुख्यमंत्र्यांनी अद्याप मला वेळ दिली नाही. एका आमदाराला भेटण्यासाठी मुख्यमंत्री का टाळाटाळ करत आहेत, असा प्रश्न राम कदम यांनी विचारला. तसंच राज्य चालवणाऱ्या सरकारला राज्यपालांनी सूचना करावी लागत आहे, हे सरकारचं अपयश आहे, असंही राम कदम म्हणाले.
अन्वय नाईक आत्मत्याप्रकरणात अटकेत असलेल्या अर्णब गोस्वामींबाबत माननीय उच्च न्यायालयाने सुमोटो दाखल करावी, अशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेपासून ते आजपर्यंत राज्य सरकारने गोस्वामी यांना योग्य वागणूक दिली नसल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला आहे. त्यामुळे, यासंदर्भात उच्च न्यायालयाने सुमोटो दाखल करुन माहिती घ्यावी, अशी विनंती फडणवीस यांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते सध्या आमने-सामने आले आहेत. अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भाजपाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाकडेच याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
अर्णब गोस्वामी यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बऱ्याच चर्चा सुरु आहेत. या सगळ्याची न्यायालयाने दखल घ्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून सध्या महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात थेट संघर्ष सुरू आहे. गोस्वामी यांच्या सुटकेसाठी भाजप आक्रमक झाला असताना आता महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी अर्णब यांच्यावर टीका केली आहे. अर्णबने ज्या पद्धतीने इतरांना वागवलं, त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करणारी एकही व्यक्ती नाही. अती तिथे माती होणारच, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी गोस्वामींवर टीका केली.
‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या ‘माझी भिंत’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला अशोक चव्हाण उपस्थित होते. राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतंय. त्यावेळी लोकमतशी बोलताना चव्हाण यांनी अर्णब गोस्वामींवर टीकास्त्र सोडलं. इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली. गोस्वामींसह तिघांनी आपले पैसे थकवल्यानं आपण आत्महत्या करत असल्याचं चिठ्ठीत लिहून नाईक यांनी २०१८ मध्ये आत्महत्या केली. मात्र या प्रकरणाची फाईल फडणवीस सरकारनं बंद केली. यावरही चव्हाण यांनी भाष्य केलं. ‘आधीच्या सरकारनं गोस्वामींना पाठीशी घातलं का, हा चौकशीचा भाग आहे,’ असं चव्हाण म्हणाले.
याच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अमृता फडणवीस यांनी आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार टीक केली. ‘राज्य सरकारनं शहाणं व्हावं. जनतेने त्यांना निवडून दिलेलं नाही. पण तरीही आता खुर्ची मिळाली आहे, तर नीट काम करावं. कुणी काही बोलतंय त्यावर रिऍक्ट करून त्रास देणं बंद करावं,’ असं अमृता म्हणाल्या. जलयुक्त शिवारसारख्या योजनेतही देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मोठा माणूस मोठाच राहतो, अशा शब्दांत त्यांनी खडसावले.
नारायण राणेंनी ट्विट करुन महाविकास आघाडी सरकारवर बाण चालवले आहेत. ‘अर्णब गोस्वामी यांचे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये असूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्यांचा शारीरिक छळ राज्य सरकार व पोलिसांनी चालवलाय. राज्य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्यास, त्याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल.’, असे ट्विट नारायण राणेंनी केलंय.
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची तुलना महात्मा गांधी आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी दिवंगत नेते नेल्सन मंडेला यांच्याशी केली. रिपब्लिक टीव्हीवरील एका चर्चेदरम्यान संबित पात्रा बोलत होते. यावेळी महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्याप्रमाणे अर्णब यांनाही त्रास सहन करावा लागत असून भविष्यात आपल्याला अर्णब अगदी वेगळ्या स्वरुपात दिसतील, असे संबित पात्रा यांनी म्हटले आहे.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अर्णब हे भारतीय प्रसारमाध्यमांचे नेल्सन मंडेला ठरतील आणि ते प्रसारमाध्यमांचे चेहरामोहरा बदलून टाकतील असे मतही संबित पात्रा यांनी व्यक्त केले आहे. याचबरोबर, अर्णब यांना न्याय नक्कीच मिळेल. सगळ्याच गोष्टी टीव्हीवर सांगता येत नाहीत. भारतीय संविधानावर विश्वास ठेवा. मी भाजपावर किंवा सरकारवर विश्वास ठेवा, असे सांगत नाही. कारण या दोन्ही गोष्टीही संविधानानुसारच काम करतात. पहिली गोष्ट म्हणजे अर्णब यांना कोणीच काही नुकसान पोहचवण्याची हिंमत करु शकत नाही, असे संबित पात्रा म्हणाले.
अर्णब यांना सध्या झालेली अटक ही त्यांच्या आयु्ष्याला वेगळी कलाटणी देईल, असे संबित पात्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, “अटकेची घटना अर्णब यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल असा माझा अंदाज आहे. या पुढे मी अर्णब यांना भारतीय प्रसारमाध्यमांचा नेल्सन मंडेला म्हणेल. तो भारतीय प्रसारमाध्यमांना कायमचा बदलून टाकेल असा मला विश्वास आहे. ब्रिटिशांनी गांधींना चालू ट्रेनमधून बाहेर धक्का दिल्यानंतर ते महात्मा गांधी झाले. या घटनेनंततर त्यांनी लढा सुरु केला आणि ते पुढे खूप मोठे नेते झाले. त्यांना जो त्रास व्हायला नको होता तसा त्रास देण्यात आला. तशाच पद्धतीचा त्रास सध्या अर्णब यांना दिला जात आहे. मला सर्व भारतीयांना सांगायचे आहे की, आपल्याला लवकरच पूर्णपणे बदलेले वेगळे अर्णब पहायला मिळतील.”
याचबरोबर, अर्णब यांनी अनेक प्रकरणांबद्दल आवाज उठवल्याने त्यांना त्रास दिला जात असल्याचा दावा संबित पात्रा यांनी केला आहे. संबित पात्रा म्हणाले, “उशिरा दिलेला न्याय हा अन्यायच असतो असं सांगत मी हात जोडून न्यायलयातील मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्व प्रकारे दोषी ठरलेल्या दहशतवाद्यासाठी रात्री न्यायलयाचे कामकाज केलं आहे. याकुब मेननसारख्या व्यक्तीसाठीही न्यायलये रात्री उघडली. अर्णबचा दोष काय होता, तर त्यांनी पालघरमधील साधुंसाठी न्यायाची मागणी केली. त्यांना एका अभिनेत्याला (सुशात सिंह राजपूत) न्याय मिळवून द्यायचा होता, त्यांना अंमलीपदार्थ मुक्त भारत हवा होता. त्यांनी काही राजकारण्यांची नाव घेतली. त्यांच्यावर टीका केली म्हणून त्यांना हे सहन करावं लागत आहे. याबद्दल खेद आहे. मात्र भारत आता जागृक देश आहे आणि भारत कोणासमोरही झुकणार नाही,” असे संबित पात्रा यांनी म्हटले आहे.
रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ भाजपा आमदार राम कदम यांचा पुढाकार कायम आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक केलेल्या पोलिसांवर कारवाई करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. यासाठी मागील आठवड्यात राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं, त्याचसोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली होती.
आमदार राम कदम हुतात्मा चौक ते मंत्रालयापर्यंत पायी जाणार असून त्याठिकाणी गृहमंत्री अनिल देशमुखांची भेट घेणार होते. अर्णब गोस्वामी यांची सुटका करा आणि अटक केलेल्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी राम कदम गृहमंत्र्यांना केली. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते सध्या आमने-सामने असून गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भाजपाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे.
अर्णब गोस्वामी यांना जेलमध्ये कोणालाही भेटता येत नाही असं सांगितलं जात होतं, त्यावर राम कदम यांनी थेट राज्य सरकारला आव्हान दिलं होतं. मी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जात आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा, अर्णब गोस्वामी यांच्या जीविताला धोका आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर त्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना देशातील जनता कधीही माफ करणार नाही. तुम्ही जबरदस्तीने आणीबाणी लादली आहे. आता मी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहाकडे निघालो आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा, असं राम कदम यांनी म्हटलं होतं.
महाराष्ट्र सरकारनं पुकारलेल्या अघोषित आणीबाणीविरोधात लाक्षणिक उपोषणाला बसलो आहे असं सांगत राम कदम यांनी मागील आठवड्यात मंत्रालयाच्या गेटसमोर आंदोलन केले होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं आहे त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, ज्या पद्धतीने अर्णब गोस्वामींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या घटकाविरोधात अघोषित आणीबाणी पुकारता येणार नाही. त्यामुळे सरकारविरोधात हे लाक्षणिक उपोषण आहे असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला होता. अर्णब गोस्वामींसोबत संपूर्ण देश उभा आहे हे दाखवण्यासाठी आम्ही इथं आंदोलन करतोय असं त्यांनी सांगितले.
तसेच ज्या पोलिसांनी अर्णब गोस्वामींना मारहाण केली त्यांना निलंबित करावं आणि चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही भेट घेतली, पोलिसांचा आदर करतो, पण कायद्यानुसार अशाप्रकारे अर्णब गोस्वामींसारख्या पत्रकाराला मारहाण करणं योग्य नाही, त्यामुळे या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी केली, मात्र हे सरकार धुतराष्ट्राचं सरकार आहे, आंधळे आणि बहिरे सरकार असल्याने त्याची किंमत मोजावी लागेल. या सरकारला वठणीवर आणण्याचं काम जनता करेल अशी टीका राम कदम यांनी केली.
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक केल्याच्या निषेधार्थ भाजपा आमदार राम कदम यांनी लाक्षणिक उपोषण केले आहे. शुक्रवारी सकाळी आमदार राम कदम हे मंत्रालयाच्या गेटसमोर फुटपाथवर आंदोलनाला बसले, यावेळी त्यांनी डोक्याला काळी पट्टी बांधून अर्णब गोस्वामींच्या अटकेचा निषेध करत महाराष्ट्र सरकारवर दडपशाहीचा आरोप केला. त्यानंतर काही वेळांनी पोलिसांनी आमदार राम कदम यांना ताब्यात घेतले.
याबाबत आमदार राम कदम म्हणाले की, महाराष्ट्र सरकारनं पुकारलेल्या अघोषित आणीबाणीविरोधात लाक्षणिक उपोषणाला बसलो आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं आहे त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, ज्या पद्धतीने अर्णब गोस्वामींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या घटकाविरोधात अघोषित आणीबाणी पुकारता येणार नाही. त्यामुळे सरकारविरोधात हे लाक्षणिक उपोषण आहे.
दरम्यान, हे लाक्षणिक उपोषण अर्णब गोस्वामींवर प्रेम करणाऱ्या कोट्यवधी लोकांचे प्रतिनिधित्व म्हणून करत आहोत, महाविकास आघाडी सरकारची जुलमी हिटलरशाही चालणार नाही, त्यांना अर्णब गोस्वामींसह सर्व पत्रकारांची माफी मागावी लागेल. मी विधानसभेचा सदस्य आहे, जर रस्त्यावर मी आंदोलन करत असेल तर सरकारने मला बोलावून माझं म्हणणं ऐकलं पाहिजे, नाहीतर हे सरकार कोणत्या कातडीचे आहे कळेल असा टोलाही राम कदम यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी यांना वरळी येथील घरातून रायगड पोलिसांनी अटक केली, या अटकेवेळी नियमांचे उल्लंघन करून पोलिसांनी अर्णब गोस्वामींना मारहाण केली. आम्ही पोलिसांच्या वर्दीचा सन्मान, आदर करतो परंतु ज्या ९ पोलिसांनी अशाप्रकारे पत्रकाराला मारहाण केली, ते देशातील समाज सहन करणार नाही. या ९ पोलिसांना निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच लोकशाहीत पत्रकारिता चौथा स्तंभ आहे, पत्रकारितेवर हल्ला करणारे आणि महाराष्ट्राला आणीबाणीच्या दिशेने नेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह देशाची माफी मागितली पाहिजे आणि तात्काळ अर्णब गोस्वामींची सुटका करायला हवी. गणवेशाचा वापर करून अर्णब गोस्वामींना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली नाही तर आम्हाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जावं लागेल असं म्हटलं होतं
अर्णब यांच्या घरी पोलीस पोहोचल्यानंतर जबरदस्त गोंधळ झाला. अर्णब घरातून निघण्यास तयार नव्हते. तर पोलीस त्यांना नेण्यासाठी अडले होते. यावेळी अर्णब यांची पत्नी आणि मुलं मोबाईलच्या सहाय्याने संपूर्ण घटनेचे शूटिंग करत होते. यादरम्यान, अर्णब यांच्या घरातील ‘नजारा’ही जनतेने पाहिला. अर्णब यांचे घर पाहून तर वरिष्ठ पत्रकाररवीश कुमार (Ravish Kumar) अवाक झाले. याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या एका फेसबुक पोस्टमध्ये केला आहे.
अर्णब गोस्वामी प्रकरणात रविश म्हणाले, ‘ जुने प्रकरण पुन्हा का ओपन करण्यात आले? हे पोलिसांनी स्पष्ट करायला हवे. जेणेकरून, अर्णब यांना कायद्याच्या चौकटीत राहूनच अटक करण्यात आली, हे लोकांना कळू शकेल.’ रवीश कुमार म्हणाले, प्रत्येकजण अर्णबच्या बाजूने उभे आहे. मात्र, अर्णब यांनी असे कधीच केले नाही.
रवीश म्हणाले, ‘अर्णब यांची पत्रकारीता ‘रेडियो रवांडा’चे उदाहरण आहे. ज्याच्या ‘उद्घोषकाने’ जनतेला चिथावणी दिली आणि लाखो लोक मारले गेले. अर्णब यांनी कधीच मॉबच्या हिंसाचारात मारल्या गेलेल्या लोकांची बाजू घेतली नाही. गेल्या चार महिन्यांपासून ते जे करत आहेत, त्यावर न्यायालयांनीही भाष्य केले आहे. तेव्हा कोणताही मंत्री, न्यायालय अभिव्यक्ती स्वतंत्र्यावर हल्ला करत आहे, असे का म्हणाला नाही? असा सवालही रविश यांनी केला.
रवीश कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये अर्णब यांच्या घराचा उल्लेख करत लिहिले आहे, “अर्णब यांचे घर पाहून मी अवाक झालो. रोज सहा हजार शब्द टाईप करून मी गाझियाबादच्या त्या घरात राहतो, ज्यात खुर्ची लावण्यासाठीही बालकनी नाही. अर्णब यांचे घर किती सुंदर आहे. अर्णब यांच्या सुंदर घराच्या व्हिजुअलसमोर, मी असंघटित क्षेत्रातील एका मजुराप्रमाणे चुपचाप उभा राहिलो.
अर्णब गोस्वामी जेव्हा कारागृहातून घरी येतील, सर्वप्रथम तर पोलिसांनी त्यांना लवकरात लवकर सोडावे. मी तर असेच म्हणेल, की काही दिवसांची सुट्टी घेऊन त्यांनी आपल्या या सुंदर घराचा आनंद घ्यावा. जर ते या घराचा आनंद घेऊ शकत नसतील, तर त्यांनी पाहुना म्हणून मला आमंत्रण द्यावे. मी काही दिवस तेथे थांबेन. सकाळी त्यांच्या घरची कॉफी घेईन. तसे तर माझ्या घरी मी चहाच पितो. पण, आपण जेव्हा श्रीमंताच्या घरी जाता तेव्हा आपली टेस्ट बदलावी. त्यांच्या घराच्या बालकनीत बसून अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्याला सलाम पाठवीन आणि बॉर्डर चित्रपाटाचे गाणे फुल व्हॉल्यूममध्ये ऐकायला आवडेल. “ऐ जाते हुए लम्हों, जरा ठहरो, जरा ठहरो…. मैं भी चलता हूं… जरा उनसे मिलता हूं… जो इक बात दिल में है उनसे कहूं तो चलूं तो चलूं….
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
११.११. २०२०
——————————————— ———————————————** शुभेच्छा जाहीरात**—————————–