लोहा येथिल उपजिल्हा ग्रामीण शासकीय रुग्णालयास शहीद संभाजी कदम यांचे नाव देण्यात यावे—- माजी सैनिक बालाजी चुकलवाड यांची मुख्यत्र्यांना मागणी
कंधार – शेख शादुल
लोहा येथिल उपजिल्हा ग्रामीण शासकीय रुग्णालयास शहीद संभाजी कदम यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे माजी सैनिक बालाजी रामप्रसाद चुकलवाड यांनी केली आहे.
जानापुरी येथील भूमिपुत्र शहीद जवान संभाजी कदम हे नागरोटॄ (जम्मू कश्मीर) येथे आतंगवादी हामल्यात आपले कर्तव्य बजावत असताना विर मरण पत्कारले. शहीद संभाजी कदम या जवानांनी त्या हामल्यात काही आतंकवाद्यांना कंठस्नान घातले म्हणुन तालुक्यातील शहीद संभाजी कदम यांची विरता,बलीदान, शौर्य हे व्यर्थ न जाऊ देता यांचे बलिदान कायम स्वरूपी आठवणीत राहावे व त्याच्या विरतेचे किस्से सामान्य जनता कायम स्वरुपी आठवत ठेवेल व असेच शहीद संभाजी कदम यांच्या बहादुरीचा आदर्श वसा घेऊन आमच्या कंधार लोहा तालुक्यातील भूमिपुत्र पुढे पण तयार होतील साठी लोहा उपजिल्हा ग्रामीण शासकीय रुग्णालय शहीद जवान संभाजी कदम यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे , पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे कंधार तालुक्याचे भूमिपुत्र माजी सैनिक बालाजी रामप्रसाद चुकलवाड राहणार पातळगंगा यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.