कंधार नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून ज्ञानेश्वर ठोंबरे रुजू
कंधार : सय्यद हबिब
कंधार नगरपरिषदेला नगर विकास विभागाने अखेर कंधार नगर परिषदेचे मुख्याधिकारी पदाच्या रिक्त जागेवर ज्ञानेश्वर ठोंबरे यांची नियुक्ती केली आहे सध्या ते नायगाव येथे नियुक्त होते. दिनांक 3 ऑगस्ट रोजी पदाचा कार्यभार स्वीकारावा असे आदेशित केले आहे त्यामुळे अखेर कंधार नगरपालिके तला प्रभारी राज संपून पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाला त्यामुळे कोरोनाची वाढती समस्या लक्षात घेता शासनाच्या निर्देशाप्रमाणे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कसे नियोजन करतात? हा उत्सुकतेचा विषय असेल परंतु आजच्या परिस्थितीत नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी लाभले हे महत्त्वाचे आहे
कंधार पालिकेत तीन वर्षाहून अधिक काळापासून प्रभारी मुख्याधिका-यांची नेमणूक करण्यात येत आहे प्रभारी अधिकारी पालिका कारभारात जास्तीचे लक्ष देऊ शकत नसल्याने प्रशासकीय कारभार खोळंबून तर जातच आहे शिवाय कर्मचाऱ्यावर ही जास्तीची वचक राहत नाही त्यामुळे पूर्णवेळ मुख्याधिकारी देण्याची मागणी या निमित्ताने पुढे येत होती चार दिवसांपूर्वी तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्याकडे पालिकेचे प्रभारी कार्यभार सोपवला होता नको हो म्हणत दि. 29 जुलै रोजी पालिकेचे मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार घेतला होता एक आठवडाही संपला नसताना नगर परिषदेचे मुख्याधिकारी पदाच्या प्रभारी जागेवर ज्ञानेश्वर ठोंबरे यांची नियुक्ती झाल्याने आखेर प्रभारी राज संपला कंधार नगर परिषदेला पूर्णवेळ तरुण मुख्याधिकारी मिळाला असल्याने शहराच्या विकासासाठी हातभार लागेल अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत