मनोगत
‘रुमणपेच’ हा माझा कथासंग्रह आपल्या हाती देताना मला अतिशय
मनस्वी आनंद होत आहे. नित्य घडणाऱ्या समाजातील वाईट घटनांचा माझ्या संवेदनशील मनावर नकळत कुठेतरी खोल असा परिणाम होत गेला.
अंधश्रद्धा,रुढी, परंपरा, जुन्या खुळचट चालीरिती आणि त्यात गुरफटलेला समाज, पापपुण्य, स्वर्ग-नरक, स्पर्श-अस्पृश्य, विटाळ-चांडाळ, गंडादोरी, नवस-सायास,मंत्रतंत्र, बुवाबाजी, भगवी कफनीधारी महाराजगिरी, धर्मवाद, जातीयवाद यांच्या
चक्रव्युहात येथील भटाळलेल्या शेंडी, जाणवेधारी भट भिक्षुक, महाजन, पुरोहित,बडवयांनी सामान्य माणसाला फसवून भांबावून सोडले आहे.
अशा या दलित,पददलित, गरीब, आदिवासी, मागास, इतर मागास व भटक्या समाजाचे दुःख, समस्यांना व प्रश्नांना वेशिवर टांगण्याचे, वाचा फोडण्याचे काहीतरी काम करावे या भावनेने मी हा कथा लेखनांचा प्रपंच केला आहे.
माझी वैचारिक भूमिका माझे आदर्श व प्रेरणास्त्रोत आदरणीय मा.आ.व खासदार स्वातंत्र्यसेनानी श्री केशवरावजी धोंडगे साहेब, व तसेच मा.आ.आदरणीय गुरुनाथरावजी कुरुडे साहेब यांच्या विचारातून आणि सा.जयक्रांतीच्या लिखाणातून जोपासली गेली आहे. याचा मी इथे नम्रतापूर्वक उल्लेख करीत आहे व त्यांचे ऋण व्यक्त करणे माझे कर्तव्य समजतो.
माझ्या या कथा लिखानास पुस्तक रुपाने प्रत्यक्षात आणण्यासाठी मला माझे बंधू श्री अरविंद घाटे व श्री नागनाथ डोंगरे व माझे मित्र प्रा.घोरबांड आर.एन., प्रा.कनशेट्टे एम.आय., प्रा.राठोड बी.डी., प्रा.कुंभारगावे एम.बी.,प्रा.कौशल्ये ए.एस., प्रा.कौसल्ये एस.एस., प्रा.चौथरे टी.एस., प्रा.मामडगे पी.बी.,प्रा.तेलंग, प्रा.नागसेन कांबळे, प्रा.मेहत्रे ए.एस. प्रा.गरूडकर एस.डी. यांचे मोलाचे साह्य लाभले आहे. या सगळ्यांबद्दल माझ्या मनात अत्यंत आदर भावना आहे.या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
पुस्काच्या प्रकाशनासाठी माझे मित्र प्रा.गजानन मोरे सर व आमच्या
भगिनी प्रा.विद्याताई फड यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याचे मनःपूर्वक आभार.माझी मुलगी कु.अर्चना घाटे व सौ.अश्विनी इबितवार, जावाई राजेश्वर इबितवार यांनी रात्रंदिवस मेहनत करून आपल्या सुंदर हस्ताक्षरात हस्तलिखित तयार करून दिले.
तसेच वेळोवेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चा, विचार-विनिमय मला लेखनकार्यात उद्बोधक व मार्गदर्शक ठरल्या आहेत. लेखन कार्यात आमच्या घरातील कु.तेजल, कु.आर्वी व पार्थ या बालकांनी अनेकवेळा फेर लिखानावर रेघोट्या मारल्या तर कधी चहा, पाणी सांडवून लेखन खराब केले. तरीही दुप्पट जोमाने ते काम पूर्ण केले.
आज त्यांचे आभार मानतांना सुखद आनंद होत आहे.माझा मुलगा यशपाल घाटे आणि माझी पत्नी सौ. शोभा घाटे यांनी माझ्या लेखनाचे सतत कौतुक केले व माझ्या लेखनाची धार सतत तेवत ठेवली.या पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करणारे श्री विष्णू थोरे व सुबक व सुरेख टंकलेखन करणारे आदित्य कंप्युटरचे गायकवाड पती-पत्नी यांचे अगदी मनापासून ऋण व्यक्त करतो.
पुस्तकात कांही उणिवा असतील तर त्या माझ्या आहेत. त्या दूर
करण्याची संधी मिळाली तर आवश्य दूर केल्या जातील. सर्व ज्ञात, अज्ञात,चुकून नामोल्लेख राहिलेल्या मित्रपरिवार व नातेवाईक यांचे यथोचित ऋणनिर्देश करून मी कृतज्ञता व्यक्त करतो.
-सु. द. घाटे,
छोटी गल्ली ,हिराई भवन ,कंधार ,
तालुका कंधार जिल्हा नांदेड
9405914617