पुन्हा कोरोनाची मोठी लाट आल्याची चिन्ह दिसत आहेत. नागपूरचा विचार केला तर कोरोनामुळे मरणारांचा आकडा नुकताच तीन पर्यंत खाली गेलेला होता. तोच आकडा तिन दिवसात पुन्हा २० वर पोचला अशी बातमी वाचली. हे भयंकर आहे. अस्वस्थ करणारं आहे.
पण त्याहीपेक्षा भयंकर आहे, फडणवीस आणि भाजपा मधील त्यांच्या टोळीचे प्रताप आहेत. हातातून सत्ता गेली याचा एवढा मानसिक धक्का बसला, की हे लोक सभ्यता आणि माणुसकी पार विसरून गेले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा विरोध करण्याचा त्यांना जरुर अधिकार आहे. पण महामारीच्या काळातही लोकांच्या भोळे पणाचा फायदा घेत, देवा धर्माच्या नावानं या लोकांनी जो नंगा नाच सुरू केला तो कमालीचा संतापजनक आहे. वास्तविक सरकारनं मंदिर, मशीद, चर्च, गुरूद्वारा ही सारीच प्रार्थनास्थळं बंद केली होती. दीक्षाभूमी येथील कार्यक्रमावर देखील बंदी होती. शिवाय कोणत्याही धर्माचा देव किंवा कोणताही मंत्र कोरोनाच्या काळात मदतीला येवू शकत नाही, हेही सिद्ध झालेच आहे. तरीही भाजपमधील या लोकांचा एवढा नीचपणा कशासाठी ? एवढा निर्लज्जपणा यांच्यामध्ये कुठून येतो ? लोक मेले तरी चालतील, समाज उध्वस्त झाला तरी चालेल, प्रेतांचे सडे पडले तरी चालतील, पण मुख्यमंत्री ठाकरे यांना बदनाम करा.. आघाडी सरकारला बदनाम करा.. काय वाटेल ते हलकट आरोप करा.. धादांत खोट्या बातम्या पेरा.. पण सरकार बदनाम झालं पाहिजे, हाच यांना रोग जडला आहे !
वर्षा सोडावी लागल्यापासून फडणवीस यांच्या किचनमधून तर जळल्याचा एवढा वास येतो, की त्याच्या तुलनेत नागपूरच्या नाग नदीची दुर्गंधी देखील अत्तर वाटावी ! अगदी सुमार बुद्धीच्या लोकांनी आपल्या अकलेचे किती तारे तोडवेत, याचा जागतिक उच्चांकच नागपुरातून या निमित्तानं प्रस्थापित झाला आहे. रिकामी भांडी जास्त आवाज करतात, अशी एक म्हण आहे. पण खरकटी भांडी त्याहून जास्त आवाज करतात, हे नवं वास्तव देखील नागपुरातूनच अधोरेखित झालं आहे.
कंगना नावाचं गटार तिकडे आहेच. अर्णव नावाचं मोठं गटार दिल्लीची घाण घेवून फुटल्यासारखं सुसाट वाहते आहे. नागपुरातही त्यांच्या शाखा एकाचवेळी उघडल्या असल्याचा प्रत्यय अलीकडे पुन्हा पुन्हा येतोय. हे सारंच किळसवाणं आहे. वैताग आणणारं आहे. तिकडे पश्चिम महाराष्ट्रात तर यांच्याकडे एकापेक्षा एक नमुने आहेत. असल्या उठवळ प्रवृत्तीला आवर घालणारा, अधिकारवाणीने बोलणारा कुणीही नेता महाराष्ट्र भाजपमध्ये आता शिल्लक राहिला नाही, हे बघून वाईट वाटते. ‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल’ हे नागपूर महानगर पालिका कचरा गाडीवर वाजणारं झकास गाणं, या लोकांसाठीच लिहिलं गेलं की काय, अशी शंका येते !
मला खात्री आहे, भाजपचे अनेक नेते, कार्यकर्ते, फार काय संघाचे देखील अनेक लोक या गटारामुळे त्रस्त झालेले असतील. पण त्यांचा नाईलाज आहे. काही म्हणा, वैचारिक मतभेद काहीही असू द्या, पण महाराष्ट्र भाजपा मध्ये इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण यापूर्वी कधीही झालेलं नाही ! महाजन, मुंडे, गडकरी, शिवणकर, अडसूळ, गुडधे असे अंतर्गत वाद, गटबाजी तेव्हाही होती. एकमेकांची राजकीय कत्तल देखील चालायची. तशी स्पर्धा प्रत्येक पक्षातच असते. पण तेव्हाचे भाजपाचे नेते जनतेला वेठीस नव्हते धरत नव्हते !
जाता जाता हात जोडून विनंती कराविशी वाटते,
की फडणवीस साहेब, आपल्या नागपूरमध्ये तीनाचे वीस मेलेत हो, मला सांगा.. यात तुमचं पाप किती ? लोकप्रिय पालिका आयुक्त मुंडे यांची नागपुरातून बदली व्हावी यासाठी जीवाचा आटापिटा करणारे नागपूरचे महापौर आणि तुमचे पदवीधर मतदार संघाचे ग्रेट उमेदवार.. संदीप जोशी यांचा त्या पापात नेमका वाटा किती ? पंढरपूरच्या वारीसाठी तुम्ही आकांडतांडव केलं होतं, फटक्यावरील बंदीमुळे तुमचा जीव कासावीस झाला होता, त्याचे हे परिणाम समोर येत आहेत ! तुम्हा लोकांच्या अशा राजकारणामुळे आणखी किती लोकांचे जीव जाणार आहेत ? किती संसार उघडे पडणार आहेत ? किती मुलं अनाथ होणार आहेत ? जनतेच्या जीवावर का उठलात ? तुम्हा लोकांना जराही काही वाटत नाही का ? की मरणारी ही माणसं तुमच्या नात्यातली नाहीत, तुमच्या वस्तीतली नाहीत म्हणून तुम्हाला त्यांच्या मरणाचं दुखः नाही ? ही माणसं गरीब आहेत, वंचित आहेत, दलित, पीडित, शोषित आहेत, तुमच्या वर्ण व्यवस्थेनुसार खालच्या दर्जाची आहेत, मागासवर्गीय आहेत, म्हणून ती अशीच मारायला हवी आहेत का ? तुमच्या सत्तेच्या यज्ञासाठी बहुजन आहुती देण्याचा नवा पायंडा कोरोनाच्या निमित्तानं तुम्ही सुरू केला आहे का ?
प्लीज, आतातरी हा नरसंहार थांबवा ! तुमच्या संदीप जोशींना सांगा ! अजूनही वेळ गेलेली नाही.. स्वार्थासाठी अख्ख्या महाराष्ट्राला स्मशानभूमी मध्ये बदलण्याचं पाप पुन्हा पुन्हा करू नका ! प्लिज..!!
तूर्तास एवढंच..
–
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान
•••
संपर्क –
लोकजागर अभियान
• 9004397917
• 9545025189
• 9422154759
• 9773436385
• 8806385704
• 9960014116