कंधार येथिल संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कुल सोबत आता माझा कसलाही संबध नाही — प्रा.डॉ.शिवराज मंगनाळे
स्वामी रामानंद तीर्थ पब्लिक स्कुल बाळंतवाडी येथिल युनिट कार्यान्वित
कंधार ; ता.प्र.
कोरोना काळात पालकांची आर्थिक परिस्थिती पाहता चालु व पेन्डींग वर्षाची अंदाजे १२ लाखा रुपयाची विविध स्वरुपाची असलेली फिस माफ करण्याचा निर्णय घेतला.स्वामी रामानंद तीर्थ पब्लिक स्कुल बाळंतवाडी येथिल युनिट कार्यान्वित केले असून संत ज्ञानेश्वर इंग्लीश स्कुल कंधार या युनिट सोबत आता कसलाच संबध नसून कंधार शहर तालुक्यातील पालकांनी कोणताही व्यवहार करताना शहानिषा करुनच व्यवहार करावे असे आवाहन प्रा.डॉ.शिवराज मंगनाळे यांनी कंधार येथे केले.
जय जवान जय किसान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित स्वामी रामानंद तीर्थ पब्लिक स्कुल बाळंतवाडी कंधार येथे दि.५ अॉगस्ट रोजी पत्रकार परीषदेचे आयोजन प्रा.डॉ.शिवराज मंगनाळे यांनी केले होते.संत ज्ञानेश्वर इंग्लीश स्कुल कंधार येथे प्रायोगिक तत्वावर पाच वर्षासाठी चालवण्यासाठी घेण्यात आली होती .जुन २०१५ ते मे २०२० या कालावधीत डॉ.भगवानराव जाधव व प्रा.डॉ.शिवराज मंगनाळे मिळून करार केला होता तो करार संपला असून मे २०२० पासून स्वामी रामानंद तीर्थ पब्लिक स्कुल बाळंतवाडी कंधार येथिल युनिट डॉ.भगवानराव जाधव व शिवराज मंगनाळे मिळून यापुढे चालवणार आहेत.हे केवळ शिक्षणक्षेत्रात काहीतरी करण्याची सेवावृत्ती ,धडपड म्हणून कार्य करत असल्याची माहीती पत्रकार परीषदेत प्रा.डॉ.शिवराज मंगनाळे यांनी दिली असून तसेच यापुढे आमचे कंधार येथिल पुर्वीच्या संत ज्ञानेश्वर इंग्रजी स्कुल सोबत आमच्या युनिटचे कसलाही संबध नसून कंधार व तालुक्यातील सुजान पालकांनी खात्री करुनच पुढील व्यवहार करावा असे आवाहन करण्यात आले.यावेळी खान आय.जी,रुपेश कांबळे ,शिवा बोरगावे ,शिवाजी वाघमारे , राजकुमार केकाटे ,आनंदा पाटील कल्याणकर ,संतोष गायकवाड ,मगदुम शेख ,मगदुम कुरेशी ,शेख सलिम मारोती मामा गायकवाड यांच्यासह पालकांची उपस्थिती होती.