आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे माजी सैनिक संघटनेने मानले आभार ;लोहा उपजिल्हा रुग्णालयास शहीद कदम यांचे नाव देण्याची मुख्यमंत्र्यांना केले निवेदनाद्वारे मागणी

कंधार लोहा मतदार संघाचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब यांनी दि २२ नोव्हेंबर रोजी माजी सैनिक संघटनेची मागणीतील शहीद संभाजी कदम यांचे लोहा येथिल उपजिल्हा रुग्णालयास नाव देण्यात यावे असे मागणी केली त्याची होती.या प्रमुख मागणीची आमदार श्यामसुंदरजी शिंदे यांनी तात्काळ दख्खल घेवून राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब व जिल्हाचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांना लेखी निवेदन पाठवले आहे.

जानापुरी येथील भुमिपुत्र असलेले शहीद जवान संभाजी कदम हे नगरोट्टा(जम्मुव कश्मीर) येथे आंतकवादी हमल्यात आपले कर्तृत्व बजावत असताना विर मरण पत्कारले. शहीद संभाजी कदम या जवानाने त्या हमल्यात काही आंतकवाद्यांना कंठस्नात घातले म्हणून तालूक्यातील शहीद संभाजी कदम यांची विरता, बलिदान, शौर्य हे व्यर्थ न जाऊ देता यांचे बलिदान कायमस्वरुपी आठवणी राहतील व सामान्य जनता कायम स्वरुपी आठवण ठेवेल व असेच शहीद संभाजी कदम यांच्या बहाद्दरीचा आदर्श वसा घेवून आमच्या लोहा तालुक्यात भुमिपुत्र पुढे पण तयार होतील .

तरी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी, आपण या शहीदाच्या बलिदानाचा विचार करून शहीदाचे बलिदान व्यर्थन
जाऊ न देता नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील होत असलेल्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास शहीद संभाजी कदम असे नाव देवून शहीदाच्या बलिदानाचा मान सन्मान वाढवावा अशी लेखी मागणी केली आहे.

आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या या निवेदनामुळे शहीद संभाजी कदम यांचे नाव देण्याच्या मागणीला निश्चितपणे गती मिळणार आहे.त्यामुळे माजी सैनिक जिल्हा संघटणा नांदेड जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड व समस्त अधिकारी, पदाधीकारी व सदस्य यांनी आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *