देगलूर बिलोली मतदार संघातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्या आ.रावसाहेब अंतापूरकर यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कङे मागणी

देगलुर ; प्रतिनिधी

देगलूर बिलोली मतदार संघातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्या आ.रावसाहेब अंतापूरकर यांची उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांच्या कङे मागणी केली आहे.

देगलूर बिलोली मतदार संघामध्ये झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना इफको टोकियो पिक विमा कंपनी फक्त ऑनलाईन केलेल्या देगलूर येथील 11 हजार 9 शेतकऱ्यांना व बिलोली येथील 4 हजार 721 इतक्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ दिला असून वंचित असलेल्या देगलूर येथील 56 हजार 203 व बिलोली येथील 45 हजार 933 शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग न करता सरसकट पिक विमा देण्याचे आदेश द्यावे अशी विनंती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page