(नांदेड,प्रतिनिधी)
कार्तिक पौर्णिमेनिमित्त सोमवार दि.30 नोव्हेम्बर रोजी नगिनाघाट नांदेड येथे हजारो भाविकांच्या हस्ते होणारा गोदावरी गंगा पूजनाचा कार्यक्रम यावर्षी कोरोना संक्रमणामुळे रद्द करण्यात आला असून त्याऐवजी नांदेड शहरातील चौकाचौकात मास्क व सॅनिटायझर चे मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर व प्रोजेक्ट चेअरमन योगेश जैस्वाल यांनी दिली आहे.
अमरनाथ यात्री संघ,भाजप नांदेड महानगर,लॉयंस क्लब नांदेड सेंट्रल आणि लॉयंस क्लब नांदेड मिड टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने
हरीद्वार-वाराणशी च्या धर्तीवर नांदेड येथील धार्मिक उत्सवाचे हे एकोणिसावे वर्ष होते.
परीवारातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी कार्तिक पौर्णिमेला शेकडो महिला आरती करतात. यावेळी उत्कृष्ट पुजेची थाळी सजविणा-या 21 महिलांना आकर्षक पारितोषिके देण्यात येतात.शेकडो महिलांनी एकाच वेळी गोदावरीची आरती करताना आणि नदीपात्रात हजारो दिवे सोडतांना दिसणारे नयनमनोहर दृष्य पाहण्यासाठी नांदेडकर मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
उपस्थित राहणाऱ्या सर्व महिलांना प्रतिष्ठित व्यापारी योगेश जैस्वाल यांच्या तर्फे मोफत दिवे, द्रौण,व फुले देण्यात येतात. यावर्षी हा सोहळा रद्द झाल्यामुळे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मास्क व सैनीटायझर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती लॉयंस क्लब नांदेड सेंट्रल आणि लॉयंस क्लब नांदेड मिड टाऊन तर्फे करण्यात आले आहे.