पिक विम्या संदर्भात सकारात्मक चर्चा :आशाताई शिंदे
प्रतिनिधी : नांदेड
लोहा -कंधार मतदार संघातील प्रलंबित पिक विमा शेतकऱ्यांना वेळेत मिळावा व अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी व लोहा-कंधार मतदारसंघातील विविध विषयावर सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी शुक्रवारी नांदेड दौऱ्यावर आलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्याशी आयटीएम कॉलेज नांदेड येथे भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली,
यावेळी राज्याचे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, मंत्री अब्दुल सत्तार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, माजी मंत्री अर्जुन खोतकर, खा. हेमंत पाटील, आ. अमरनाथ राजूरकर, आ. शामसुंदर शिंदे ,आ. मोहन हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर, आमदार विक्रम काळे ,माजी आ. वसंत चव्हाण, माजी मंत्री डी. पी. सावंत सह प्रमुख मान्यवर उपस्थित होते ,यावेळी आ. शामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत लोहा, कंधार मतदार संघातील विविध विषयावर सखोल चर्चा केली.