मी चित्रकार व शिल्पकलेचा विद्यार्थी असल्याने बहुतेक भारताच्या दोन-तृतीयांश भारत-भ्रमण केले. असून त्याचा गोड अनुभव घेतलेला आहे .कारण त्याचा शोक मला जडला म्हणाना। त्याच एखाद्याने प्रेरित होऊन गेली अनेक वर्ष राजकारण व सामाजिक शैक्षणिक कार्यात रमात असताना सुद्धा वेळात वेळ काढून भारतातील बहुतेक ठिकाणी मी अवलोकन केली आहे. काही चे वर्णन शब्दबद्ध करून प्रसिद्ध केले आहे. भारताचा दक्षिण भाग असो की उत्तर पूर्व किंवा पश्चिम भागातून मी व माझ्या सहकाऱ्यांसह अनेक स्थळांना भेट दिलेल्या आहेत.
उदा दक्षिण भारतातील धर्मक्षेत्र पाहिले .श्रीशैलम् मल्लिकार्जुन क्षेत्र .तिरुपती बालाजी मंदिर ,मदुराईचे मिनाक्षी मंदिर, रामेश्वरम चे कन्याकुमारी विवेकानंद स्मारक, म्हैसूर श्रीरंग पटनम वृंद्धावन गार्डन ,तिरुअनंतपुरम, श्रवण बेळगोळ चे बाहुबली मंदिर ,तंजावर जिंजीचा किल्ला, तसेच पूर्वेकडील जगन्नाथ पुरी ,भुवनेश्वर ,कोणार्कचे सूर्यमंदिर ,तसेच मध्य भारतातील अजंठा व वेरूळच्या लेण्या नागपूर रामटेक ,काशी सारनाथ अलाहाबाद, बुद्ध गया, हिंदू गया उत्तरेतील दिल्ली, हरिद्वार ऋषिकेश ,आयोध्या खजुराहो, झांसी ,आग्रा, फत्तेपूर शिकारी सांची का स्तूप ,मथुरा वृंदावन गोकुळ भाकरा नांगल धरण कुरुक्षेत्र जयपुर चंदिगड आधी अनेक कला क्षेत्रे तीर्थक्षेत्रे हे दर्शन घेतलेले आहे आणि तिथल्या शिल्पकलेचा ही मनमुराद आनंद लुटला. विदेशातील थायलंड चाही प्रवास परवाच करून आलो .या दौऱ्यातील वाटेत येणारी लहान-मोठी स्थळे सुद्धा सोडली नाही .
.एखादा मोठा लांबीचा आडवा प्रवास करूनही भारतातील सगळी क्षेत्रे पाहण्याचे संपले असे नाही .हे जेव्हा कळेल की वयाच्या संध्याकाळी सर्व गाये खिळखिळी झालेली, गुडघ्याचे सांधेरोपण झाल्यावरही उर्वरित ठिकाणे पाहण्यासाठी मन तडफडत होते .दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या त्यामुळे काही कर्मचाऱ्या ही सहवास राहील हे ठरवून पश्चिम उत्तर भारतात प्रवास करण्याचे ठरवले. आठ दहा दिवसाचा दौऱ्याचा कार्यक्रम ठरविला तरी मी स्वतःच्या गाडीने जाण्याचे माझ्यासोबत माझे बंधू प्र. वैजनाथ कुरूडे डिघोळ चे
मदनराव पारेकर माझे स्वीय सहाय्यक
निलेश अशोकराव गायकवाड (बौध्दाचार्य) गाडीचे सारथी युवराज लुंगारे या पाच जणांसह ठरविले, ही माहिती आमच्या काही कर्मचारी मित्रांना घेऊन नांदेड शाळेचे अधीक्षक सूर्यकांत कावळे यांनी सोबत काही शिक्षक व प्राध्यापक काम सह येण्याचे ठरवून आमच्या सोबत बेत व्यक्त करून संमती दिली.
मी 85 वर्षाचा वृद्ध अनेक व्याधी नि ग्रस्त अपंग त्यामुळे जेवढे सहकारी सोबत असतील तेवढे बरे, असे ठरवून त्यांनी घेतले. तेरा जन एक छोटी ड्रायव्हर गाडी घेऊन आमच्यासोबत निघाले प्रवासाचा नांदेडहून सुरू करण्याचे ठरविले, आमच्या प्रवासाला प्रमुख भाग होता माउंटअबू राजस्थान, त्याच राज्यतील महाराणा प्रताप ची पुण्यभूमी चित्तोडगड व उदयपूर हे ही होते, एवढे लांब जाण्यासाठी सरळ न जाता वाटेने लागणारी काही ठिकाणी तीर्थक्षेत्र पाहण्याचा कार्यक्रम ठरविला त्यात मध्यप्रदेशातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग ओमकारेश्वर उज्जैनचे महाकालेश्वर मंदिराचा समावेश होता .
सकाळी नऊ वाजता नांदेड हुन निघालो ,पहिला मुक्काम शेगाव गजानन महाराज येथे करण्याचे ठरविले परंतु ,दुसऱ्या गाडीला वाटेत वेळ लागल्याने व आम्ही शेगाव यापूर्वी अनेकदा पाहिलेले असल्याने बुर्हानपुर ला मुक्काम केला .दुसरी गाडी मात्र शेगावला थांबली. दुसऱ्या दिवशी आम्ही संपर्क साधून ओंमकारेश्वर ला जाण्याचे ठरवून तेथे गेलो मंदिर नर्मदा नदीच्या पलीकडे असल्याने गाडी अलीकडेच थांबून नावेने ओंमकारेश्वर मंदिरासाठी पलीकडे गेलो. प्रत्यक्ष मंदिर पाच मजली उंच असल्याने तेवढ्या पायर्या चढून जाणे मला तरी शक्य होत नव्हते .म्हणून मी व माझे मेहुणे मदनराव परेकर लाकडी पालखीतून वर गेलो .बाकी लोक आमचे पायर्या चढून आले .मंदिर खूप पुरातन बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असल्याने तो दिवस सोमवारचा असल्याने मंदिरात बरीच भक्तांची गर्दी होती, मंदिराची भव्यता कलाकुसर व स्थापत्य कलेचा आस्वाद घेतला .
विंध्याचल पर्वताच्या वाहणाऱ्या नर्मदा नदी काठावर हे मंदिर अत्यंत सुंदर व नयनरम्य आहे .येथे ब्रह्मदेव व विष्णू निवास केला म्हणून त्या नर्मदेचा किनारा ब्रह्मपुरी विष्णुपुरी व रुद्रा पुरी बनला आहे. मंदिरात अनेक घंट्या पितळेचे झुंबर हे त्या मंदिराचे विशेष वाटले .दर्शन व प्रसाद घेऊन लगेच पुढच्या प्रवासाला प्रस्थान केले. दुसऱ्या गाडीही तेथे आली त्यांचेही दर्शन झाल्यावर मागेपुढे होत आमचा प्रवास उज्जैन कडे सुरु झाला. तेथे जाण्याचा संध्याकाळ झाली होती, मंदिरात लॉज वर मुक्काम केला सामान टाकून दर्शनाला निघालो ,हेही ज्योतिर्लिंग ओंमकारेश्वर पेक्षा कमी नाही , महाकालेश्वर चे मंदिर म्हणजे उत्कृष्ट शिल्पकलेचा एक छान नमुना होय, मंदिराचा परिसर खूप मोठा असून परिसरात अनेक मंदिराचे बगीचे अधीक प्रेक्षणीय ठिकाण आहेत ,सोमवार असल्याने तेथेही भक्तांची गर्दी होती. उज्जैन हे तीर्थ स्थळ प्रमाणे जुने ऐतिहासिक राजधानीचे ठिकाण आहे .क्षिप्रा नदीकाठावर असलेल्या या नगरात जजमेंट सीट ऑफ विक्रमादित्य हे ठिकाण आहे, ही सम्राट विक्रमादित्याची राजधानी होती, म्हणून या नगरीला विशेष महत्त्व आहे .ही नगरी म्हणजे खूप मोठी स्मार्ट सिटी आहे. तेथे मुक्काम केला दुसरे दिवशी सकाळी स्नान आधी करा कार्यक्रम उरकून सर्वांनी पुन्हा महाकाळेश्वर यांचे दर्शन घेऊन राजस्थान राज्यात प्रवासाला सुरुवात केला .राजस्थानात अशी भूमी आहे की ,तेथे स्वतंत्र धर्म व स्वाभिमानासाठी अनेकांनी वीरमरण पत्करले आहे .राजस्थानातील महाराणा प्रतापांचा शौर्याचे प्रेरित चित्त उदयनगर या आहेत .या नगरात प्रवेश केला ,प्रथम चित्तोडगडच्या किल्ल्यात गेलो ,हा किल्ला समुद्रसपाटीच्या 810 उंच फूट उंचीवर अरवली पर्वत रांगा वर आहे.किल्ल्याचा व्याप खूप मोठा असून व जाताना सात दरवाजे ओलांडावे लागतात ते ओलांडून झाल्यावर प्रेक्षणीय ठिकाणे. पाहण्यासाठी गाईड केला ,
त्यांनी प्रथम प्रसिद्ध असा विजयस्तम्भ दाखवला, मोगलांच्या तावडीतून चित्तोडगड सोडविल्या वर मिळालेल्या विजयाचे स्मारक म्हणून भव्य असे विजयस्तंभ उभारला आहे ,या स्तंभाची उंची 132 फूट असून राजस्थानी दगडात बांधलेल्या या स्तंभाचे वैशिष्ट्य असे आहे .की त्यात नऊ मजले आहेत विजय स्तंभा चा आकार तळाला जेवढा आहे ,तेवढा वरचाही आहे परंतु मध्येच हा स्तंभ कमी आकाराचा आहे ,राजस्थानी पक्या दगडांनी बांधलेला या स्तंभावर उत्तम अशा कलाकृतीची शिल्पांनी नटलेली आहे .हा विजय स्तंभ अत्यंत देखणे आहे अनेक वर्षे झाली तरी, अजून जसाच्या तसा ताजा तवाना वाटतो,मनात प्रसंन्न होते, पाहण्यासाठी येथे बरेच परदेशी पर्यटक महिला पुरुषांनी गर्दी केली होती ,अनेकांनी फोटो घेतले गाईड करून सविस्तर माहिती घेतली.
पद्मावती महाल याच किल्ल्यात इतिहास प्रसिद्ध पद्मावती राणीचा महाल असून मोगल राजा अल्लाउद्दीन खिलजी याच्या महाराजाने पद्मावतीचा दर्शन आरशाद्वारे देण्यात आले, तो महाल पाहिला ज्या आरशातून पाहण्याचा कार्यक्रम झाला .तो असा पण पाहिला रतनसिंग राजा यांनी यांची राणी पद्मावती अत्यंत रूपवान सुंदर होते तिच्या घशातुन पान खाल्ले ला जाताना दिसत असे ,अशी अख्यायिका आहे ,अशा राणी ची माहिती सम्राट अल्लाउद्दीन खिलजी याला मिळाली व तो तिथे तिला पाहण्यासाठी अतुर झाला होता. तिला हस्तगत करण्याचा इरादा असला तरी ,राजपुत्र काही कमी नव्हते, नम्रतेने किमान तिला पाहावे असे त्यांना वाटले व तसे प्रमाण केले राजपूत राजांनी पण त्यांची इच्छा प्रत्यक्ष भेट वर पुरी करताना, दुरून आरशातून तिला पाहण्याची परवानगी दिली
.खालच्या मजल्यावर दरवाजा जवळ मोठा आरसा ठेवला व त्यापुढे राणी पद्मावती ला बसविण्यात आले वरच्या माळ्याच्या दारातून या आरशात राणीचे प्रतिबिंब फक्त पहावे असे ठरवले, तो पाहण्याचा कार्यक्रम फार झाला. व खीलजी अक्षरशः पागल झाला. अल्लाउद्दीन खिलजी म्हणजे व धर्माचा अर्क त्याने राणीला कोणत्याही परिस्थितीत हस्तगत करण्याचा विडा उचलून प्रचंड सैन्यासह चितोडगडावर प्रचंड हल्ला केला. युद्ध झाले यात राजा रतन चा मृत्यू झाला .नवऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी पद्मावती राणी समजताच तिने राजस्थानी पद्धतीने सती जाण्यासाठी स्वतःला जाळून जोहार केला .अल्लाउद्दीन ला रिकाम्या हाताने जावे लागले ,घटना राजस्थानाच्या संपूर्ण इतिहासात अत्यंत उल्लेखनीय आणि महत्त्वाची घटना समजली जाते माळवा प्रांतातील निर्मिती बाप्पा रावळ यांनी केली .
त्यांच्यानंतर एकूण दहा राजे होऊन गेले नवा राजा उदय सिंग यांनी चित्तोडगढ चा किल्ला घेतलेला आज होता त्याने विजय तीर्थ वरील विजय स्तंभाचे ऐतिहासिक बांधकाम केले त्यानंतर उदय नगर नावाचे अत्यंत सुंदर मोहक असे सरोवराचे शहर व सोडून तेथे राजस्थानी त्यांचे चिरंजीव महाराणा प्रताप सिंह यांचा मोगलांनी पराभव केल्याने तेव्हापासून राणाजी राजवाड्यात न राहता हलदी घाट या अरवली पर्वताच्या प्रचंड डोंगरात अनेक वर्ष वनवास पत्करून सम्राट अकबराचा बदला घेण्याची जोरदार तयारी केली काही काळानंतर अकबराने हलदी घाटावरच प्रचंड सैन्य घालून महाराणा प्रतापांचा पाडावर करण्याचा करा कष्ट चा प्रयत्न केला परंतु महाराजांची ही तयारी भक्कम असल्याने अकबराच्या सैन्याला पळवून लावून प्रचंड विजय प्राप्त केले गमिनी काव्याने हा प्रचंड विजय भव्य अशा मोगली सम्राट अकबराला पराभव पत्कारावा लागला 18जुन पंधराशे 76 राजस्थानच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिलेलं हे पान आहे याच गमीनी काव्याचा आधार पुढे आपले स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी पण मोगली व मुस्लीम राज्यांना पराभव करून स्वराज्याची स्थापना केली त्यामुळेच या महाराणा प्रतापांची तुलना छत्रपती शिवरायांसोबत केली जाते.
याच हलदी घाटी या ऐतिहासिक जंगलाच्या भूमीत सध्या महाराणा प्रतापांचे भव्य असे स्मारक उभारले आहे महाराणा प्रतापांचा चिन्हाच्या यशस्वी घोडा चेतक याचेही येथे स्मारक आहे बऱ्याच ऐतिहासिक घटनांच्या प्रतिमा उभ्या करून प्रेक्षणीय स्थळ चित्रनगरी येथे निर्माण करण्यात आली आहे ते पाहण्यात आले महाराणा प्रताप यांच्या हृदय आठवणी त्यामुळे जाण्यास जागा झाल्या या महा महापराक्रमी राजा ची माहिती आम्ही वाचलेली असली तरी ती पवित्र युद्धभूमी समक्ष पाहून डोळ्याचे पारणे फिटले त्यानंतर उदयपूर ला मुक्कामाला गेलो उदयपूर या शहराला झीलोक कि शिट्टी सरोवरांचे नगर संबोधण्यात येते अरवली पर्वताच्या रांगा व मध्ये वसलेले हे शहर मोठमोठ्या सर्व वरांनी अर्धे व्यापलेले आहे त्या स्वप्नांना सजवले नटवले आहे एका मोठ्या सरोवरात राजाचा एक सुंदर असा महाल बांधण्यात आलेला आहे असून तेथे नावे ने जावे लागते आम्ही दुरूनच ते पाहिले त्याच दिवशी भारताच्या पंतप्रधानांनी पाचशे (500)व हजारच्या नोटा(1000) रद्द केल्याचे जाहीर करून त्या बदलून घेण्यासाठी काही मुदत जाहीर केली .लांबचा प्रवास आम्ही सर्वांनीच पाचशे हजाराच्या नोटा सोबत नेलेल्या असल्याने आवाकाच झालोत, दुसऱ्या दिवशी उदयपूर शहरात प्रमुख सिटी पॅलेस राजवाडा पाहण्यासाठी गेलो, परंतु तेथे या बाद झालेल्या नोटा स्वीकार करण्यास बुकिंग कार्यालय तयार नव्हते शेवटी या राजवाड्याच्या प्रमुखांना भेटण्यासाठी आम्ही एक नंबर गेटवर गेलो व त्यांना भेटून आमची अडचण सांगून कसेही करून आमची राजवाडा पाहण्याची सोय करण्याची विनंती केली.
त्यांनीही आमच्याकडे एटीएम कार्ड असल्यास सोय होईल असे सांगितले आमच्याकडे एटीएम कार्ड द्वारे तिकिटाचे पैसे भरून राजवाडा पाहण्याची परवानगी घेतली हा मार्ग आम्हाला पुढील खर्चासाठी सापडला व बरीच सोय झाली डिझेल तर जुन्या नोटांवर मिळतच होते फक्त राहण्या-खाण्याची व काही खरेदी करण्यास ची सोय एटीएम कार्ड मुळे झाली बरे झाले। पुढचा प्रवास सुरू झाला।
क्रमशः।