कंधार ; प्रतिनिधी
गेल्या १५-१६ दिवसांपासून
देशाची राजधानी दिल्ली येथे लाखो शेतकऱ्यांचा ठिय्या सुरू असून अदानी आणि आंबानी यांच्या मर्जीनुसार शेतकरी विरोधी व देश विरोधी हे तीन काळे कायदेकरून खरेदी करतांना शेतकऱ्यांना लुटून व विक्री करतांना देशातील संबंध ग्राहकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात लूटण्याचा जो सरकारने घाट घातला आहे.
तो हानून पाडण्यासाठी शेतकरी महाअंदोलनाच्या वतीने केंद्रीय मंत्र्यांना घेराव, जीओ रिलायन्स अंबानी ग्रुपच्या सर्व सेवेचा धिक्कार जिओ मोबाईल पोर्ट करणे व जयपूर दिल्ली जोडणारा हायवे चक्काजाम करणे व देशभरातील जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयावर १४ डिसेंबर २०२० ला धरणे अंदोलन करणे असे शेतकरी महाअंदोलना आंदोलनात तर्फे आदेश आहे त्यामुळे आम्ही आपल्या कार्यालयासमोर धरणे करत असल्याचे निवेदन देण्यात आली आहे .
यावेळी बापूसाहेब गोंड, बाबूराव केंद्रे, मोहम्मद तनवीरोद्दीन ,किशन डांगे, महादेव विभूते,व्यंकटी इटकापले,विठ्ठल मदड यासह भारतीय किसान युनियन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.