कंधार ; दिगांबर वाघमारे
सहाय्य योजनेतील लाभार्थी खात्यावर पैसे वर्ग होत नसल्याने दि.१८ डिसेंबर पासुन पोस्ट IPPB बॅकेचे खाते काढण्यासाठी व खाते पडताळणी करुन संकलीत करण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले असल्याने सदरील कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे.
तालुक्यातील विशेष सहाय्य योजनेतील संजय गांधी निराधार अनुदान योजना,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदीरागांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ/विधवा/दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे वाटप या कार्यालयाकडून दरमहा आय.सी.आय.सी.आय. बॅकेमार्फत केले जात होते. परंतु माहे जुन 2020 पासून संपुर्ण नांदेड जिल्हयात आय.सी.आय.सी.आय. बॅकेमार्फत अनुदान वाटप करणे बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे सध्या लाभार्थीच्या त्यांनी सादर केलेल्या बॅकेच्या /पोस्टाच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे.परंतु काही तांत्रिक चुकीमुळे लाभार्थी खात्यावर पैसे वर्ग होत नसल्याने दि.१८ डिसेंबर पासुन पोस्ट IPPB बॅकेचे खाते काढण्यासाठी व खाते पडताळणी करुन संकलीत करण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आली आहे.
कंधार,बहाद्दरपुरा, कुरुळा, फुलवळ, पेठवडज, बारुळ, उस्माननगर, दिग्रस बु. आदी डाक कार्यालयात दि.१८ डिसेंबर रोजी पासून कॅम्प प्रमुख अधिकारी सहाय्यक पोस्ट IPPB खाते काढणे मदतनीस यांच्या उपस्थितीत खालील प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.
1 कंधार बहाद्दरपुरा पोस्ट ऑफीस
18/12/2020 शुक्रवार
सकाळी 09 ते दुपारी 03 वाजेपर्यत मंडळ अधिकारी कंधार संबंधीत मंडळातील सर्व तलाठी/ग्रामसेवक पोस्ट मास्तर कंधार,बहाद्दरपुरा, कुरुळा, फुलवळ, पेठवडज, बारुळ, उस्माननगर, दिग्रस बु. व सर्व संबंधीत पोस्टमेन संबंधीत मंडळातील सर्व कोतवाल/ पोलीसपाटील/ ग्रामपंचायत सेवक
2 कुरुळा कुरुळा पोस्ट ऑफीस मंडळ अधिकारी कुरुळा
3 फुलवळ फुलवळ पोस्ट ऑफीस मंडळ अधिकारी फुलवळ
4 पेठवडज पेठवडज पोस्ट ऑफीस मंडळ अधिकारी पेठवडज
5 बारुळ बारुळ पोस्ट ऑफीस मंडळ अधिकारी बारुळ
6 उस्माननगर उस्माननगर पोस्ट ऑफीस मंडळ अधिकारी उस्माननगर
7 दिग्रस ब्रु. दिग्रस ब्रु. पोस्ट ऑफीस मंडळ अधिकारी दिग्रस ब्रु.
कंधार तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना याद्वारे कळविण्यात येते की, विशेष सहाय्य योजनेतील (संजय गांधी निराधार अनुदान योजना,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदीरागांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ/विधवा/दिव्यांग योजना) लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे वाटप या कार्यालयाकडून दरमहा आय.सी.आय.सी.आय. बॅकेमार्फत केले जात होते. परंतु माहे जुन 2020 पासून संपुर्ण नांदेड जिल्हयात आय.सी.आय.सी.आय. बॅकेमार्फत अनुदान वाटप करणे बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे सध्या लाभार्थीच्या त्यांनी सादर केलेल्या बॅकेच्या /पोस्टाच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे.काही लाभार्थीनी पोस्टाचे खाते सादर केलेले आहे परंतु सदर खाते नंबर चुकीचे असणे नावात तफावत असणे इ. बाबी निदर्शनास आलेल्या आहेत तसेच अनेक लाभार्थ्यांना याबाबत माहीती मिळाली नसल्याचेही दिसून येत आहे त्यामुळे ज्या लाभार्थ्याना मागील चार महिन्यापासून अनुदानाचे पैसे मिळालेले नाही अशा लाभार्थ्यासाठी व ज्यांनी तहसील मध्ये पोस्टाचे खाते सादर करुनही पैसे मिळालेले नाही अशा लाभार्थ्यासाठी नवीन खाते काढणे व काढलेल्या पोस्टाच्या खात्याची पडताळणी करण्यासाठी या विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे कंधार मंडळाचा कॅम्प हा बहादृदरपुरा येथील पोस्ट ऑफीसमध्ये व बाकी इतर मंडळातील मुख्यालयी असलेल्या पोस्ट ऑफीसमध्ये या विशेष कॅम्पचे आयोजन केलेले आहे या कॅम्पचे प्रमुख मंडळ अधिकारी असणार आहेत व या कॅम्पमध्ये सर्व लाभार्थीचे खाते काढण्यासाठी पोस्ट मॅन व संबंधीत तलाठी,ग्रामसेवक,कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सेवक हे मदतीसाठी उपस्थीत राहणार आहेत.तरी सर्व लाभार्थीनी आपले पोस्टाचे खाते याठिकाणी काढून घ्यावे व ज्यांनी या अगोदर खाते काढलेले असतील त्यांनी त्याची पडताळणी करुन घ्यावी असे आवाहन तहसीलदार कंधार श्री व्यंकटेश मुंडे यांनी केलेले आहे.
या कॅम्पमध्ये खाते न काढलेल्या लाभार्थीचे खाते काढणे व संकलीत करणे व यापुर्वीच खाते काढलेल्या लाभार्थीचे खाते पडताळणी करणे व संकलीत केले जाणार आहेततरी लाभार्थीनी येतांना आधार कार्ड घेऊन उपस्थीत रहावे असे आवाहन केले आहे.