हरहुनरी दत्तात्रय एमेकर यांनी दिल्या काव्यात्मक सदिच्छा
कंधार ; प्रतिनिधी
मन्याड खोर्यातील लाल खंदारी कृष्ण-सुदामा हे विशेषण तंतोतंत खरे ठरणारे माजी खासदार भाई केशवराव धोंडगे व माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांचे मित्र प्रेम प्रसिद्ध आहे.वयाच्या शंभराव्या वर्षी भाई केशवरावांनी मित्र भाई गुरुनाथराव यांच्या 90 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर हरहुनरी कलाशिक्षक दत्तात्रय एमेकर यांनी काव्यात्मक सदिच्छा दिल्या.
दि.28 डिसेंबर रोजी माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरुडे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने बहाद्दरपूरा येथे छोटेखानी अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
वाढदिवसाच्या निमित्त्याने दत्तात्रय एमेकर यांनी “काव्यात्मक सदिच्छा” त्यांच्या प्रतिभेतून निर्माण केले.ज्या दोन दिग्गजांवर काव्य लिहिलेली काव्य
माजी खासदार व आमदार डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या हस्ते मन्याड खोर्यातील कलामहर्षि माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या 90 व्या वाढदिवसा निमित्त सदगुरु आदिवासी आश्रम शाळेत अभिष्टचिंतन कार्यक्रमात प्रदान केले.
यावेळी डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांनी एमेकर यांच्या काव्यात्मक सदिच्छा निर्मिती बद्दल गौरवोद्गार काढुन लाल खंदारी कृष्ण-सुदामा या वाक्याबद्दल आणि गोपाळसुत या टोपणनावावर समाधान व्यक्त केले.मी मुक्ताईसुत आणि हे गोपाळसुत छान आहे.मला ज्या दोन प्रेरणास्त्रोतां बद्दल लिहिले,त्या दोघांच्या उपस्थितीने मला समाधान वाटले असल्याचे माहीती दत्तात्रय एमेकर यांनी दिली.
या काव्यात्मक सदिच्छा फ्रेम साठी शिवाजी विद्यालय बारुळचे शिक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी लोहा येथून तयार करुन आणले तसेच कंधार शहरातील जयक्रांतिचे पाईक पेंटर मैनुद्दीन शेख यांचे चिरंजीव कलाशिक्षक चित्रकार पेंटर मगदूम शेख सर यांनी अभिष्टचिंतनमुर्ती भाई कुरुडे यांना प्रदान केली.त्यांचे सुपुत्र श्री शिवाजी हायस्कूल नांदेड शाखेचे उपमुख्याध्यापक सुधीर कुरुडे यांच्या लाॅकडाउन या पुस्तकाचे प्रकाशन भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
ग्राम पंचायत बहाद्दरपुरा निवडणुकीत शे.का.पक्षाचे 11 उमेदवारासहीत माजी सरपंच, उपसरपंच, गावातील प्रतिष्ठितांची उपस्थिती होती. विचार गंगाराम रुमाले, बालाजी गं.पेठकर ,परसराम धोंडगे गुरुजी हैदरसाब शेख,मुस्तफा शेख आदींनी व्यक्त केले.
या प्रसंगी पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे,
राजाराम हायस्कूल टेळकीचे मुख्याध्यापक चौडेकर , माणिक विद्यालय हाडोळीचे मुख्याध्यापक तय्यब शेख ,सदगुरु आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक ,श्री शि. एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेतील मुख्याध्यापक कर्मचारी उपस्थिती होते.