कंधार ; दिगांबर वाघमारे
कंधार तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीसाठी सुमारे 279 मतदान केंद्रावरून 1320 कर्मचारी EVM मशीन व साहीत्य घेवून नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर दि.14 रोजी रवाना झाले असून दि.15 रोजी होणारी मतदान निवडणूक प्रक्रिया सुरुळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली.
तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरळीत व्हावी म्हणून अनेक दिवसापासून उमेदवारी फॉर्म दाखल करणे पासून ते मतदान आणि निकालापर्यंत सर्व कामकाज कंधार येथील श्री शिवाजी हायस्कूल मैदानावर चालू आहे.
निवडणूकसाठी एकूण 98 ग्रामपंचायती पैकी केवळ 82 ग्रामपंचायती निवडणुकीच्या प्रत्यक्ष रिंगणात आहेत. त्यासाठी तहसीलच्या निवडणूक विभागाच्या वतीने आवश्यक त्या कर्मचाऱ्यांना दोन प्रशिक्षण व मतदान यंत्रे कामकाज आदी बाबत सखोल असे मार्गदर्शन केले आहे.
आज दिनांक 14 जानेवारी रोजी प्रत्यक्ष तालुक्यातील 279 मतदान केंद्रावर सुमारे 1320 कर्मचारी मतदान केंद्राला आवश्यक असणारे साहित्य घेवून रवाना करण्यात आले आहे.
त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष ,मतदान अधिकारी 1, मतदान अधिकारी 2, मतदान अधिकारी 3 ,व राखीव असे कर्मचाऱ्यांचा समावेश असून बंदोबस्तासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर 279 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यासाठी क्षेत्रीय अधिकारी – 19 कामकाज पाहत असून 28 बसेस, 28 -जीप, 2 – मिनी बस व झोनल अधिकाऱ्यासांठी 19 – जीप अशा वाहनाची सोय करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार वेंकटेश मुंडे यांनी दिली आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे ,नायब तहसीलदार नयना कुलकर्णी ,नायब तहसीलदार विजय चव्हाण,नायब तहसिलदार ताडेवार यांच्या नियोजनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.
तहसील कार्यालयातील कर्मचारी उत्तम जोशी, लखमावार ,मन्मत थोटे, अथर सर्वरी, नईन बेग सह कर्मचारी परिश्रम घेत आहेत.