करूणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात असा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे.
माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, २०१९ पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणु शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याबाबत आणि धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता असा आरोप धनंजय मुंडेंनी केला आहे.
या बाबत 12 नोव्हेंबर 2020 रोजी मे 2019 पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर (सोशल मीडिया) माझी बदनामी करण्याच्या हेतूने आणि मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे असंही त्यांनी सांगितले आहे.
या सर्व तक्रारी खोट्या आहेत, करुणा शर्मा, त्यांची बहीण रेणू शर्मा व त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा यांच्या मला ब्लॅकमेल करणे व माझ्याकडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे. माझ्याकडे रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईलवरून मला ब्लॅंकमेलिंग करत कोट्यवधी रुपये मागितल्याचे एसएसमसरुपी पुरावे आहेत. तसेच मी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये करुणा शर्मा यांच्या सोयीने प्रकरण सेटल करावे या साठीच्या दबाव तंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो असंही धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर खालील प्रमाणे पोस्ट केली आहे.
#समाजमाध्यमांमध्येमाझ्याविरुध्दहोणारेआरोप #पूर्णपणेखोटेबदनामीआणिब्लॅकमेलकरणारेआहेत
कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो . हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे.
करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.
सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे.
मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सदभावनेने केलेल्या आहेत.
मात्र 2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता.
या बाबत दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजी मे 2019 पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे.
नोव्हेंबर 2020 मध्ये श्रीमती करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर माझी बदनामी करण्याच्या हेतुने व मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी मा. उच्च न्यायालयात श्रीमती करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे.
सदर याचिकेत मा. उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी मा. उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. आणि त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट/ समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संदर्भात श्रीमती करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी मा. उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही. माझी या संदर्भात प्रसार माध्यमांना देखील विनंती आहे की या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होईल म्हणून अधिक भाष्य टाळावे अशी विनंती आहे.
तथापि कालपासून रेणू शर्मा ज्या या करुणा शर्मा यांच्या भगिनी आहेत यांनी माझ्या विरुद्ध खोटे आणि बदनामीकारक व माझ्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केल्याची पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे तसेच त्यांनी या संदर्भात विविध प्राधिका-यांकडे केलेल्या तक्रारीच्या प्रति देखील समाज माध्यमातून प्रसारित केल्या आहेत. या सर्व तक्रारी खोट्या आहेत, व श्रीमती करुणा शर्मा, त्यांची बहीण रेणू शर्मा व त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा यांच्या मला ब्लॅकमेल करणे व माझ्या कडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे.
माझ्याकडे श्रीमती रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईल वरून मला ब्लॅंकमेलिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये मागितल्याचे sms रुपी पुरावे आहेत. तसेच मी मा. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये श्रीमती करुणा शर्मा यांच्या सोयीने प्रकरण सेटल करावे या साठीच्या दबाव तंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो.
मला खात्री आहे की या सर्व प्रकरणाची संबंधीतांकडून सुयोग्य चौकशी केली जाईल तथापी माझी आपल्याला विनंती आहे की सदर प्रकरणी वृत्त प्रसिद्ध करताना वरील वस्तुस्थिती लक्षात घ्यावी कारण सदर प्रकरणी श्रीमती करूना शर्मा यांच्या विरोधात दावा प्रलंबित आहे. तसेच या प्रकरणी 2 अज्ञान बालकांचा सुद्धा समावेश आहे.
हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे व बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आलेले आहे, त्यामुळे यात अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये ही विनंती.
सोशल मीडियावर धनुभाऊबद्दल अनेक विशेष प्रतिक्रिया आल्या… त्यापैकी काही निवडक अशा…
एक:
5 मुले असलेल्या माणसाला.. आमदार आणि मंत्रीमंडळात रहाण्याचा लायकी नाही..
खोटे शपथपत्र भरले.. खोटारडा
दोन:
राजकारणात राहुन आणि तेही मंत्री पदावर असताना असं सर्व सांगायला मर्दाचं काळीज लागतं. मी नाही त्यातली हा प्रकार नाही केला धनुभाऊंनी..
धनादादा कडे महिला व बालकल्याण मंत्रालय दिले पाहिजे, अनुभव गाठीशी आहे.हे सर्व शक्य झालं पवार साहेबांच्या महिलांविषयक धोरणांमुळे.
राष्ट्रवादी पुन्हा 😂😂
तीन:
सामाजिक न्याय मंत्री,महाराष्ट्र राज्य!
-पहिली बायको लग्नाची!
-दुसरी बाई ‘परस्पर सहमतीची’ ! (लग्न न करता )
-तिसरी हक्काची मेव्हनी
(दुसऱ्या ठेवलेल्या बाईची बहीण )
बीड पॅटर्न नुसार
आणि…
ज्यांना ‘परस्पर संमती’ मिळत नाही त्यांनी विना संमती बलात्कार करावा…औरंगाबाद पॅटर्न नुसार.
…साहेब,इतका पण पुरोगामी महाराष्ट्र नकोय!
चार:
नेते मंडळी ला संविधानात सुट आहे ,, किती ही लग्न करा मुल करा,,
पाच :
राष्ट्र वादी वर संक्रांत, वंदना चव्हाण, महेबुब शेख, नवाब मलिक चा जावई, आणि आता हे भाऊ..
हे समजत कि जाणुन बुजून फसवलेल आहे ते किती बेशरम मुलगी आहे त्याच्या बाजूला जाऊन उगाच झोपुन फोटो घेतला असेल पैसे कमवायचे आहे बाकी काही नाही अगं तु रोडवर उभी राहिली असती तरी तुला भरपूर भेटले असते पैसे देणार
सहा :
शर्मा आणि मुंढे 😎🤔🤔🤔🤔
लय लांब वशिला लावला गड्या,,
सात :
सरकार निवडणूक लढायच्या आधी छोटे कुटुंब हमीपत्र घेतले जाते त्याचे काय
आठ:
सामन्याचा अग्रलेख “माझं लफडं माझी जबाबदारी”😂😂😂😂
नऊ :
आता कुठे गेल्या सगळ्या महिला नेत्या आता एक शब्द कोणाकडून निघत नाही.हेच जर दुसऱ्या पक्षातील कोणी केले असते तर आता पर्यंत घसा बसे पर्यंत ओरडुन ओरडुन तमाशा घातला असता….बहुतेक घरचे समंध असणार दादा बरोबर नाहीतर पगार बंद असे ठरले असणार म्हणून दरवेळी महिला अत्याचार वर बोलणाऱ्या नेत्या आता कुठे तरी लपून बसल्या आहेत हे सगळ्या जनतेला दिसत आहे.आता लपून बसा पण कधी दुसरे असे काही घडले आणि तुम्ही आवाज काढलात तर जनता तुम्हाला तुमच्या भाषेत उतर देईल मग 😅😅😅
दहा :
सामाजिक न्याय मंत्री ? हाच मोठा विनोद आहे खरंतर…
धनंजय मुंडे उत्तर द्या …
१) हिंदू मॅरेज अॅक्ट तुम्हाला लागू होत नाही का ?
२) एक बायको असताना दुसरी बायको असणे व दोन पेक्षा अधिक अपत्य असल्यावर निवडणूक लढवता न येणे, हा नियम राष्ट्रवादीच्या नेत्याला लागू होत नाही का?
३) या बद्दलची माहिती निवडणूक आयोगा पासून का लपवली गेली?
४) नियम फक्त सामान्यांनाच असतात का ?
महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर हवंय!!
अकरा :
काय खोटे खोटे लावले आहे ?
आमचे महान नेते नरेंद्र मोदी यानी ५० वर्षे लग्न लपवून अविवाहित असे खोटे निवडणूक अर्जात शप्पथ पूर्व
लिहून दिले त्यांना 00000००००००शिक्षा दिली !
बारा :
राग तेव्हा येतो जेव्हा लोक ह्यांचा फोटो घरात लावतात आणि कुणा गरीबाची पोरगी पळून गेली तर त्याला आत्महत्या करावी इतके टोचतात.
गंगाधर ढवळे ,नांदेड
संपादकीय
१४.०१.२१