धनंजय मुंडे आणि लैंगिक अत्याचार प्रकरण

राज्याच्या राजकारणात सद्या एक चर्चेचा विषय समोर आलाय. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चेला उधाण आलय. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याची बातमी समोर आली. २००६ सालापासून धनंजय मुंडे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते अशी तक्रार ओशिवरा पोलिस ठाण्यात रेणू शर्मा या महिलेने केली आहे.

मात्र, ओशिवरा पोलिसांनी आपली लेखी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोप रेणू शर्मा यांनी केला आहे. रेणू शर्मा यांनी पोलीस आयुक्तांच्या नावे एक पत्र लिहिलं असून त्याची प्रत राज्यपालांनाही पाठवली आहे. या पत्रात त्यांनी मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुंडे यांनी लग्नाचं अमिष दाखवून माझी फसवणूक केली. माझ्यावर बलात्कार करून माझं शारीरिक शोषण केलं. त्यामुळे मला त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा आहे, असं शर्मा यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

बलात्काराचे आरोप करणारी तरूणी हा करूणा शर्मा यांची बहीण आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक झाला असून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मात्र यानंतर आता भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासंदर्भात खापरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. या घटनेमुळे समाजावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे वस्तुस्थितीचं गांभीर्य ओळखून मुंडेंचा राजीनामा घ्यावा, असं खापरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

मुंडेंचा राजीनामा घ्यावा नाहीतर आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल याची आपण नोंद घ्यावी, असं म्हणत खापरेंनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री नबाव मलिक यांनी आणखी एक प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. या प्रकरणात राज्य सरकारवर कोणताही दबाव नाही. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, असं नबाव मलिक यांनी म्हटलं आहे.

मंगळवारीही आरोप झाले तेव्हा मलिक यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, एखादी तक्रार झाली तर चौकशी होतच आहे. पण जी आरोप करतेय ती कुठेतरी त्यांची नातेवाईक आहे.करुणा शर्मांच्या बहिणीशी धनंजय मुंडेंनी लग्न केलेलं आहे, दोन मुलंसुद्धा आहेत. याच्या मागे काय कारण आहे ते आता मुंडे साहेबच सांगू शकतील.

राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेने बलात्काराची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. राज्यातील या घटनेने विरोधकांनी सरकारवर टीका करत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

बॉलीवूडमध्ये संधी देण्याच्या बहाण्याने मुंडे यांनी आपल्यावर वारंवार अत्याचार केल्याचे सदर तरुणीचा दावा आहे. पोलीस आपली तक्रार दाखल करून घेत नसल्याचे ट्विटही तिने केले होते, मात्र त्यानंतर सोमवारी (दि. ११) रात्री ओशिवरा पोलिसांनी तरुणीचा तक्रार अर्ज स्वीकारून अधिक तपास सुरू केला आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप झाल्यानंतर भाजपा महिला आघाडीने त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी महिला कोण? याबाबत सगळीकडे चर्चा सुरू आहे. ही आरोप करणारी महिला रेणू शर्मा ही पार्श्वगायिका आहे.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपानं रेणु शर्मा चर्चेत आल्या, रेणु शर्मा आणि धनंजय मुंडे यांची भेट पहिल्यांदा कधी झाली?, या दोघांचे नाते काय? याबाबत सविस्तर खुलासा खुद्द मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करूणा शर्मा यांची बहिण रेणु शर्मा आहे. ब्लॅकमेलिंगसाठी खोटे आरोप करत असल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केला आहे.

धनंजय मुंडे आणि रेणु शर्मा पहिल्यांदा १९९७ मध्ये इंदूरमध्ये भेटले, या दोघांची भेट मध्य प्रदेशातील बहिण करूण शर्मा यांच्या घरी झाली, त्यावेळी रेणुचं वय १६-१७ वर्ष होतं, १९९८ मध्ये धनंजय मुंडे यांनी करूण शर्मा यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता.

२००६ मध्ये जेव्हा करूण शर्मा प्रसुतीसाठी इंदूरला आल्या होत्या, तेव्हा मी घरी एकटी असल्याचं धनंजय मुंडे यांना माहिती होतं, तेव्हा काहीही न सांगता ते घरी आले आणि माझ्या इच्छेविरोधात शारिरीक संबंध बनवले, प्रत्येक दोन-तीन दिवसांच्या अंतराने ते घरी येत होते, इतकचं नाही तर शारिरीक संबंध बनवताना माझा व्हिडीओही बनवला होता.

त्यानंतर वारंवार धनंजय मुंडे मला फोन करून माझ्यावर खूप प्रेम असल्याचं सांगत होते, जर तुला गायिका बनायचं असेल तर माझी बॉलिवूडमध्ये अनेक बड्या दिग्दर्शक, निर्मात्यांसोबत ओळख आहे. मी तुला लॉन्च करतो असं आमिष मला दाखवत होते.

बॉलिवूडमध्ये गायिका बनवण्याच्या बहाण्याने त्यांनी वारंवार माझं लैंगिक शोषण केले. जेव्हा माझी बहिण करूणा शर्मा कामासाठी बाहेर जात होती, तेव्हा धनंजय मुंडे माझ्याशी जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता असा आरोप तरूणीने केला आहे.

गंगाधर ढवळे ,नांदेड

संपादकीय
१३.०१.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *