टंकलेखन इन्स्टिट्यूट व्यवसायीक ,कारकुन पदावरुन आता नायब तहसिलदार असा प्रवास करणाऱ्या राजेश पवळे यांचा कंधार येथे उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या हस्ते सत्कार

कंधार/मो.सिकंदर

कंधार उपविभागीय कार्यालयात अव्वल कारकून पदावर कार्यरत असलेले राजेश एन.पवळे यांची सेवाज्येष्ठतेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे रोजगार हमी योजना विभागात नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती झाली आहे.त्याबद्दल
उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कंधार तालुक्यातील कुरुळा सारख्या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले राजेश पवळे यांनी आपले शिक्षण पूर्ण करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कंधार येथे टंकलेखन इन्स्टिट्यूटचा व्यवसाय सुरू केला. हा टंकलेखनाचा इन्स्टिट्यूट चालवत असतानाच राजेश पवळे यांची प्रथम महसूल विभागात २ फेब्रुवारी २००० मध्ये भोकर तहसील कार्यालयात लिपिक पदावर नियुक्ती झाली.

जून २००९ मध्ये पदोन्नती झाली व ते आपल्या जन्मभूमी ची सेवा करण्यासाठी कंधार तहसील कार्यालय पुरवठा विभागात अव्वल कारकून म्हणुन काम पाहत असतानाच आर्यन पवळे यांची नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य शाखेत दोन ते तीन वर्षे सेवा केले.परत नोव्हेंबर २०१५ ते आजतागायत कंधार येथील उपविभागीय कार्यालयात सेवा बजावत असताना राजेश पवळे यांची जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे रोजगार हमी योजने विभागात नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळाली आहे.

राजेश पवळे यांना पदोन्नतीने मिळाल्याने. उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, ना.तह. विजय चव्हाण, ना तह. राजेश पाठक, ना.तह. सुर्यकांत ताडेवाड,अ.का.आर.के.गित्ते एस.बि.गीते, लिपिक शेख, विलास चव्हाण सह उपविभागीय कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सत्कार केले. राजेश पवळे यांना पदोन्नतीने मिळाल्याने मित्र परिवारासह सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *