स्वातंत्र्याचा खरा अर्थ जिजाऊंनी सांगितला – निवृत्ती लोणे रोडगीकर

नांदेड – राजमाता जिजाऊ ह्यांनी केवळ स्वराज्याची संकल्पना मांडली नाही तर छ. शिवाजी महाराज यांच्या माध्यमातून पूर्णत्वास नेली. स्वराज्य म्हणजे जुलमी राजसत्तेपासून मिळालेले संपूर्ण स्वातंत्र्य. जिजाऊंनी रयतेला अनियंत्रित असलेल्या आणि जनतेचा अनन्वित अन्याय अत्याचार करणाऱ्या राजवटीच्या जोखडातून मुक्त केले आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ सांगितला असे प्रतिपादन येथील शिव-फुले- शाहु-बाबा-अण्णाभाऊ चळवळीचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती लोणे यांनी केले. ते राजममाता जिजाऊ यांच्या ४२३ व्या जयंती निमित्त जवळा देशमुख येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी.एस., माजी सरपंच कैलास गोडबोले, विनोद गोडबोले, रत्नदीप गच्चे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे यांची उपस्थिती होती. 

जिजाऊंच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विनोद गोडबोले यांनी गायलेल्या जिजाऊ वंदन गीताने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.‌ त्यानंतर प्रमुख वक्ते म्हणून बोलत असतांना लोणे म्हणाले की,  जिजाऊंनी सतत सूडसत्र झेलणाऱ्या रयतेला सुखी, समाधानी करण्याचा चंग बांधला. त्यांनी पाहिलेले स्वप्न त्यांच्या हयातीतच पूर्ण झाले. आजच्या काळात स्त्रियांनी जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी. शिवबा दुसऱ्याच्या घरात नाही तर घरोघरी शिवबा घडवला पाहिजे असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी लोणे यांचा ग्रंथभेट देऊन यथोचित सत्कार केला. तसेच जिजाऊंची वेशभूषा धारण केलेल्या संघमित्रा गच्चे हिचा अक्षरा गोडबोले, साक्षी गोडबोले, शुभांगी गोडबोले यांनी पुष्पहार घालून सन्मान केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी केले. तर आभार कैलास गोडबोले यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पंकज गोडबोले, सूरज पंडित, हैदर शेख,  कमलाबाई गच्चे, कावेरी गच्चे, गितांजली गोडबोले, वैभवी शिखरे, कल्याणी शिखरे, कृष्णा शिखरे, योगेश मठपती, रितेश गवारे, अनुष्का झिंझाडे, दीपाली गोडबोले, निशा गोडबोले, अक्षरा शिंदे, लक्ष्मण शिखरे, अक्षरा शिखरे, शादुल शेख, मुस्कान पठाण, रामदास पांचाळ, साक्षी गच्चे, श्रावस्ती गच्चे, कोमल चक्रधर, श्रुती मठपती, संध्या गच्चे, गंगासागर शिखरे, प्रतिक्षा गोडबोले, अंजली झिंझाडे, दिव्या गच्चे, अंजली कदम, संघर्ष गच्चे, सिद्धार्थ पंडित, नितीन झिंझाडे, संघरत्न गोडबोले, पंकज गोडबोले साक्षी गोडबोले आदींनी परिश्रम घेतले. शाळा बंद असतांनाही शिक्षण चालू आहे, त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून सदरील कार्यक्रम घेण्यात आला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *