दिनदर्शिकेच्या माध्यमातून घरा घरा पर्यंत संभाजी ब्रिगेडचा विचार पोहचला
– सुभाष पा.कोल्हे जिल्हाध्यक्ष
चुकीचा इतिहास पुसून काढण्याचे काम, संभाजी ब्रिगेडच्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून होणार-डॉ.भारतीताई
कंधार,प्रतिनिधी
दिनदर्शिका २०२१संभाजी ब्रिगेड कंधार आयोजित प्रकाशन सोहळा निवृत्तीनाथ विद्यालय कंधार येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याते डॉ.भारतीताई मंडवइ दिनदर्शिका प्रक्षेपण प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना यांनी सर्व महामानवाचे कार्य पटवून दिले.पुर्वी प्रत्येकाच्या घरोघरी कालनिर्णय असायचे पण या प्रथेला फाटा देत या संभाजी ब्रिगेडच्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्व संत महामानव थोर विचारवंत यांची जयंती त्यांचे स्मृतिदिन व तसेच आवश्यक ती माहिती समजण्यासाठी पूर्ण सखोल यात नमूद केले.
आजतागायत जो काही चुकीचा इतिहास मांडला आहे त्याला पुसून काढण्याचे काम या दिनदर्शिकेच्या माध्यमातून होणार आहे.संभाजी ब्रिगेडची भूमिका ही अतिशय महत्त्वाची राहिली आहे.
संघटनेत कार्य करताना आपसात मतभेद व्हायला नको.शिवरायांनी संघटनात्मक बांधणी करत शिवरायांनी ‘मावळा’या एका शब्दातूनच अठरा पगड जातींना एकत्रित करून आपले राजे यशस्वी चालवले.आपले संघटन केवळ व्हाट्सअप फेसबुक पुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्षात आणायला हवे.संभाजी ब्रिगेडने आपले कार्य विशिष्ट भागापुरते मर्यादित न ठेवता
राजकीय, सामाजिक, धार्मिक,आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व तसेच शेती विषयक क्षेत्रात ही आपण आपले कार्य वाढवायला हवे.आपण आपल्या घरच्या मंडळींना सामील करायला हवे जेणेकरून आपण नेमके काय कार्य करतो याची माहिती पण घरच्यांना माहिती होईल व आपल्या कार्यात ते पण सहभाग नोंदवतील व तसेच संघटनेत काम करताना संघटनेतील पदाधिकारी हे व्यसन मुक्त असायला हवेत.जेणेकरून आपण कार्य करत असताना आपल्या कार्याला कोणीही नाव बोट ठेवू शकणार नाही.
अध्यक्षीय समारोप करतांना सुभाष पाटील कोल्हे यांनी दिनदर्शिका काढताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे असल्याचे सांगून दिनदर्शिकेच्या माध्यमातून घरा घरा पर्यंत संभाजी ब्रिगेडचा विचार पोहचवला.जाहीरनामा जनतेसमोर ठेवला जात नाही.तोपर्यंत आपली भूमिका जनमानसाला समजणार नाही असेही सांगत नांदेड जिल्हा दक्षिण मधील जवळपास 60 ग्रामपंचायतीवर वर्चस्व असल्याचे सांगताना ते पुढील काळात संभाजी ब्रिगेड चा लोहा-कंधारचा भावी आमदार असल्याचेही सांगण्यास विसरले नाहीत.
सदरील कार्यक्रमास उद्धव राव सुर्यवंशी म.से.स.जिल्हाध्यक्ष दक्षिण, बळीराम पा.पवार म.से.सं.जिल्हाउपाध्यक्ष, रमेश पवार सचिव,राम अन्नकाडे जिल्हा उपाध्यक्ष नांदेड, परमेश्वर पाटील जिल्हा सचिव नांदेड, गजानन इंगोले जिल्हा प्रवक्ता नांदेड, संभाजी ब्रिगेड चे लोहा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे,कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेड कंधार तालुकाध्यक्ष नितीन पाटील कोकाटे,जयश्री ताई भायेगावकर प्रदेश संघटक जिजाऊ ब्रिगेड,विद्या पाटील जिल्हाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड नांदेड दक्षिण,नितीन पाटील कोकाटे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष कंधार,विकास पाटील लुंगारे शहराध्यक्ष,कंधार दयानंद पाटील मोरे तालुका उपाध्यक्ष कंधार,माधव पाटील लुंगारे तालुका उपाध्यक्ष कंधार, धनंजय पाटील कौशल्ये तालुका कार्याध्यक्ष कंधार, कृष्णा गोटमवाड तालुका कार्याध्यक्ष,शैलेश पाटील लुंगारे शहर कार्याध्यक्ष, गंगाधर पांचाळ शहर उपाध्यक्ष, जिवन पाटील लुंगारे शहर सचिव,कृष्णा वरपडे,विठ्ठल पाटील वरपडे,गजानन पाटील कल्याणकर,विलास लांबाटे,नितीन कौसल्ये,सोपान पाटील लुंगारे,कैलास पाटील लुंगारे,शंकर पाटील तेलंग,ज्ञानेश्वर पाटील गायकवाड कंधार लोहा तालुक्यातील संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक ..तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शिंदे,यांनी केले.