बाबा बुवांच्या चमत्कारांमागील विज्ञान समजून घ्या-प्राचार्य हरिभाऊ पाथोडे

किनवट ; प्रतिनिधी

मौजे कनकी ता.किनवट जि.नांदेड येथे महात्मा फुले नवयुवक मंडळ व संत फुलाजी बाबा ध्यान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 

 ‘चमत्कारामागील विज्ञान’या प्रबोधनपर कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते अभा अंनिस चे  महाराष्ट्र राज्य संघटक  प्राचार्य हरिभाऊ पाथोडे बोलताना म्हणाले.”माणूस कोणताही चमत्कार करू शकत नाही.

बुवा बाबा स्वतःच्या स्वार्थासाठी चमत्कार करतात. त्यामागे विज्ञान आहे. ते विज्ञान  समजून घेतले तर आपली होणारी फसवणूक आपण टाळू शकतो. ग्रामीण भागात भूत, भानामती, जादूटोणा, चमत्कारा सोबत अध्यात्माचा बाजार मोठ्या प्रमाणात प्रभावी दिसते. भारतभर लोक भुतावर विश्वास ठेवतात. भूत हे माणसाच्या मनात निर्माण झालेली कल्पना आहे. जगात कुठेही भुत नाही. ते माणसाच्या अंगात हि नसते. बुवा, बाबा स्वार्थासाठी भोळ्याभाबड्या जनतेची पिळवणूक करतात. म्हणून दिसते तसं नसतं, त्यामुळेच जग फसतं”असे प्रतिपादन चमत्कारांचे अनेक प्रयोग करून त्यामागील विज्ञान अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगून संत विचारातील तत्त्वज्ञान प्राचार्य हरिभाऊ पाथोडे यांनी कानकीवासीयांच्यासमोर मांडले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गजानन कोरतलवार यांनी केले. प्राध्यापक हेमंत मेश्राम यांनी आपले मनोगत या वेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खुशालराव चरडे गुरुजी, संजय वडगुरे,संतोष वाडगुरे, विष्णु गुरुनुले, गंगाधर मोहुरले , किनवट संपर्क प्रमुख गौतम वाहूळे, सचिन भगत , गंगाराम बटूर या ग्राम वासियांनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *