जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु


कोल्हापूर, 

जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली

.करवीर तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच चिखली ते राष्ट्रीय महामार्ग पाणी आल्याने वाहतूक बंद.  चिखली गावाच्या कमानी जवळ पाण्या आल्याने व  प्रयाग पुल ते वरणगे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद. वरणगे, पाडळी, येवलुक व खुपिरे मार्गे वाहतूक सुरु. बाचणी बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद. कसबा बीड, घानवडे मार्गे वाहतूक सुरु. शिरोली गावाजवळ मोरीवर पाणी आल्याने वाहतूक बंद. शिरोली दुमाला, घानवडे, हसूर दु. सोनाळी ते चाफोडी मार्गे वाहतूक सुरु. महे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद. महे गावापर्यंतची वाहतूक बालिंगा पाडळी व कसबा बीड कुडित्रे फॅ. सांगरुळ मार्गे वाहतूक सुरु. कोगे बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद कुडित्रे करिता गगनबावडा मार्गे व कोगे करिता बालिंगा पाडळी मार्गे वाहतूक सुरु. 

लहान पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद कोल्हापूर परिते मार्गे बालिंगा, पाडळी, महे वाहतूक सुरु. शेळकेवाडी गावाजवळ पाणी आल्याने वाहतूक बंद. चंदगड तालुक्यातील चंदगड पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद. इब्राहिमपूर पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद  कनुर गवसे, इब्राहिमपूर, आडकुर मार्गे वाहतूक सुरु. दाटे गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद आमरोली, सोनारवाडी मार्गे वाहूक सुरु. करंजगाव पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद. मांडेदुर्ग मोरीवर पाणी आल्याने वाहतूक बंद ढोलकरवाडी गौळवाडी मार्गे वाहतूक सुरु. तळगुळी सी. डी. वॅर्कवर पाणी आल्याने  कुदनुर पुलावर पाणी आल्याने, ढोलकरवाडी सी. डी. वॅर्कवर पाणी आल्याने वाहतूक बंद. म्हळेवाडी गावाजवळ, निट्टुर मोरीवर पाणी आल्याने वाहतूक बंद कोवाडा ढोलकरवाडी गौळवाडी मार्गे वाहतूक सुरु. माणगाव के.टी. वीयरवर पाणी आल्याने वाहतूक बंद. पाटणे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद. कोवाड गावाजवळ पाणी आल्याने वाहतूक बंद. काणूर व गवसे गावाजवळ पाणी आल्याने वाहतूक बंद. गडहिंग्लज तालुक्यातील  भडगाव पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद गडहिंग्लज, आजरा, नेसरी मार्गे वाहतूक सुरु. उंबरवाडी कॉजवेवर पाणी आल्याने वाहतूक बंद सुळे, महागाव मार्गे वाहतूक सुरु. निलजी बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद. दुंडगे, जरळी, मुंगळी, नुल मार्गे वाहतूक सुरु.जरळी बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद गडहिंग्लज, आजरा, नेसरी, महागाव मार्गे वाहतूक सुरु. हलकर्णी कॉजवेवर पाणी आल्याने वाहतूक बंद बसरगे, येणेचंवडी, नंदनवाड, हलकर्णी मार्गे वाहतूक सुरु.कानडेवाडी बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद नेसरी अडकूर मार्गे वाहतूक सुरु.भुदरगड तालुक्यातील  हळदी गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद परिते, शेळेवाडी मार्गे वाहतूक सुरु. गगनबावडा तालुक्यातील मांडुकली ओढ्यावर पाणी आल्याने, कोदे फाट्याजवळ पाणी आल्याने, दानेवाडी जवळ पाणी आल्याने वाहतूक बंद.  आंदुर बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद अनदुर, मणदुर, वेतवडे, बालेवाडी मार्गे वाहतूक सुरु. मनवाडा बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद कोल्हापूर चिखली, पाडळी, येवलुज, बाजारभोगाव मार्गे वाहतूक सुरु.हातकणंगले तालुक्यातील ऐतवडे पुलावर पाणी आल्याने एकेरी वाहतूक सुरु. रांगोळी ते इचलकरंजी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद जंगमवाडी, बोरगाव, इचलकरंजी मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.

इचलकरंजी जुन्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद इचलरकंजी नवीन पुलावरुन वाहतूक सुरु. माणकापूर, इचलरकंजी दरम्यान पाणी असल्याने माणकापूर शिवनाकवाडी मार्गे वाहतूक सुरु. निलेवाडी पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद वारणानगर चिकुर्डे मार्ग वाहतूक सुरु.शिरोळ तालुक्यातील शिरढोण पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद नंदणी जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरुराधानगरी तालुक्यातील निढोरी पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद यमगे, निपाणी मार्गे वाहतूक सुरु. शिंदेवाडी गावाजवळ पाणी आल्याने वाहतूक बंद निढोरी ते मुदाळ मार्गे वाहतूक सुरु. शिरगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद तारळे, राशिवडे  मार्गे वाहतूक सुरु. कागल तालुक्यातील चिखली गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद कौलगे, हमीदवाडा, खडकेवाडा मार्गे चिखली वाहतूक सुरु. बस्तवडे बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद अनुर ते बानगे मार्गे वाहतूक सुरु. सर पिराजीराव तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद हासुर बोळावी, ठाणेवाडी मार्गे देवगड, राधानगरी, मुरगुड मार्गे वाहतूक सुरु. कुरकली पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद कोल्हापूर कुरुकली व हासुर करिता हळदी सडोली खालसा मार्गे वाहतूक सुरु आहे. चिखली गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद कौलगे हमीदवाडा खडकेवाडा मार्गे वाहतूक सुरु.

 आजरा तालुक्यातील साळगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद ओडीआर 139 सोहाळे, बाची मार्गे वाहतूक सुरू.पन्हाळा तालुक्यातील करंजफेन गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद मलकापूर यळवण मांजरे अनुस्कुरा मार्गे वाहतूक सुरु. गोठे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद मल्हार पेठे, सुळे, कोदवडे मार्गे वाहतूक सुरु. माजगाव पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद कळे, पुनाळ, दिगवडे मार्गे वाहतूक सुरू. केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने रस्ता बंद. गायमुख वळण रस्त्यावरून मार्गे वाहतूक सुरू. शाहूवाडी तालुक्यातील डोणोली गावाजवळ बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद थेरगाव, सातर्डे सातवे शिंदेवाडी व थेरगाव सावर्डे, सातवे मार्गे वाहतूक सुरू. शिरगांव मठ ते सवतेमध्ये रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद मलकापूर, सावे, बांबवडे, सुरुड मार्गे वाहतूक सुरू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *