सचिन तेंडुलकर आणि सार्वभौमत्व : भाग दोन

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एका जुन्या मुलाखतीमधील सचिनबाबतचे वक्तव्य आता चांगलेच व्हायरल झाले आहे. बाळासाहेबांनी सचिनबद्दल म्हटले होते की, ” जेव्हा कोणी सचिनकडे मदत मागतं तेव्हा तो आपली बॅट किंवा टी-शर्ट अशा गोष्टींचा लिलाव करतो. पण या गोष्टीला मदत म्हणत नाहीत. मदत करायची असेल तर ती वेगळ्या स्वरुपात असायला हवी.

गेल्या दोन महिन्यांपासून भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पॉप स्टार रिहानाने पाठिंबा दिला होता. यावरून देशातील अनेक स्टार लोकांनी सडेतोड उत्तर दिले. भारताच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही, अशा शब्दात रिहानाला अनेकांनी ऐकवले. आता भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने रिहानाला सुनावले आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या प्रकरणी अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. यात काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. रिहानाने दोन फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात आंदोलन करणारे शेतकरी दिसत आहेत. रिहानाने आपण याबद्दल का बोलत नाही असा प्रश्न विचारला होता. सचिनने याबाबत काल ट्विट केले होते. सचिनच्या या ट्विटनंतर मोठेच वादंग निर्माण झाले होते.

सचिन तेंडुलकरने शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत एक ट्विट केले होते. हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले होते. या ट्विटनंतर काही जणांनी सचिनवर टीका करायला सुरुवात केली. त्याचबरोबर ही टीका करताना काही जणांनी पातळी सोडून सचिनचा अपमान केल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र नेटकरी चांगलेच खवळले आहे. सचिनसारख्या महान क्रिकेटटपटूचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवाल आता बरीचं लोकं सोशल मीडियावर विचारत आहेत.

जर परदेशातील व्यक्ती भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत बोलू शकतात, तर तो अधिकार सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळेसारख्या क्रिकेटपटूंनाही आहे. सचिन आणि कुंबळेसारख्या खेळाडूंनी आपली पर्वा न करता ते देशासाठी जीव ओतून खेळले आहेत. त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा अधिकार आहे, पण यासारख्या महान खेळाडूंचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.

देशातील शेतकरी आंदोलनाला  परदेशातील अनेकांनी पाठिंबा दिल्यानंतर भारतातील सिनेस्टार, खेळाडू आणि अन्य प्रसिद्ध व्यक्तींनी यासंदर्भात जाहीरपणे मते मांडली होती. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चा देखील समावेश होता. पण सचिनने देशाच्या सार्वभौमत्वबद्दल मत व्यक्त केल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

राजधानी दिल्लीत आणि परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याला शेतकरी विरोध करत आहेत. या आंदोलनाला पॉप स्टार रिहानासह जगभरातील अन्य काही लोकांनी पाठिंबा दिला होता. भारताच्या अंर्गतग गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही, असे उत्तर अनेकांनी सोशल मीडियावरुन दिले.

सचिनने देशाच्या सार्वभौमत्वाशी कधीच तडजोड मान्य केली जाणार नाही. परदेशातील लोक बघ्याची भूमिका घेऊ शकतात. पण ते हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीय लोकांना या देशाबद्दल अधिक माहिती आहे आणि त्यांनीच निर्णय घ्यायला हवा. देश म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. सचिनच्या या ट्विटवरून अनेकांनी त्याच्यावर टीका केली.

सचिनवर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना एका भारतीय युझरने रशियाची टेनिसपटू मारिया शारापोव्हा (maria sharapova)ची माफी मागितली आहे. आता सचिनच्या ट्वीटचा आणि मारियाचा काय संबंध असा तुम्हाला प्रश्न पडले. मारियाने २०१५ साली एका मुलाखतीत सचिन तेंडुलकरला ओळखत नसल्याचे म्हटले होते. तेव्हा भारतीय लोकांनी तिच्यावर बरीच टीका केली होती.

आता एका भारतीय युझरने तिची त्या घटनेबद्दल माफी मागितली आहे. या युझरच्या मते, तू जेव्हा सचिनला ओळखत नाही असे म्हणाली होतीस तेव्हा आम्ही तुझ्यावर टीका केली होती. पण आता हे सिद्ध झाले आहे की सचिन विषयी एखाद्याला माहिती नसावी. तू बरोबर होतीस, आम्ही तुझी माफी मागतो. आम्ही ज्या पद्धतीने तुझ्याशी वागलो यासाठी… तू बरोबर होती, आम्हाला माहिती नाही की सचिन कोण आहे.

क्रिकेटचा देव आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर भाजप सरकारचा दलाल असल्याची टीका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे. शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तेंडुलकरवर टीका होत आहे.

या बांधावरुन त्या बांधावर शेतकरी रोज हजारो रन्स काढतो. मातीत सोनं पेरुन सोन्यासारखं पीक काढतो. याची कुठे नोंद नाही. सर्वोच्च पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीने शेतकऱ्यांच्या पाठीशी आज खऱ्या खर्थाने उभा राहण्याची गरज असताना तो शेतकरी विरोधी वक्तव्य करत असल्याचं संतोष शिंदे म्हणाले आहेत.

जर शेतकऱ्याने पेरलंच नाही तर ही सेलिब्रेटी मंडळी काय खाणार आहेत, असा सवालही संतोष शिंदेंनी केला आहे. त्यासोबतच त्यांनी सचिनचा भारतरत्न पुरस्कार काढून घेतला पाहिजे, असंही म्हटलं आहे.

रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना जे ट्विट केलं होतं ते ट्विट भारतीय पाहत आहेत. त्यानंतर रिहाना मुसलमान आहे का?, आणि रिहाना पाकिस्तानी आहे का?, हे दोन प्रश्न भारतीयांनी सर्वाधिक सर्च केले आहेत.

रिहानाने शेतकरी आंदोलनासंदर्भातील एक लेख शेअर करत, ‘आपण याबाबत का बोलत नाही आहोत?’, असं ट्विट केंल होतं. यानंतर 3 फेब्रुवारीला रात्री 12 वाजता रिहनाला गुगलवर सर्च करायला लोकांनी सुरूवात केली. दरम्यान, रिहानाबाबत सर्च केलेल्या विषयांमध्ये तिची संपत्ती, तिचं ट्विटर अकाउंट, इन्स्टाग्राम अकाउंट आणि रिहाना इंडिया फार्मर हे विषय होते.

सचिनने देशाची बाजू घेत प्रतुत्तर दिले रिहाना आणि ग्रेटाला, ते टोचले संभाजी ब्रिगेड आणि केरळमधल्या डाव्यांना!!, अशी आजची अवस्था आहे. शेतकरी आंदोलनावरून देशाच्या बाजूने ट्विट करणाऱ्या क्रिकेटस्टार सचिन तेंडूलकर विरोधात काही संघटनांनी ट्रेंड सुरू केला आहे. यात संभाजी ब्रिगेड आणि केरळमधील डाव्या पक्षांच्या केडरची भर पडली असून त्याला प्रदान केलेला भारतरत्न किताब मागे घ्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

इंडिया टुगेदर हॅशटॅग चालवून सचिनसह अनेक सेलिब्रिट्रींनी भारतविरोधी आंतरराष्ट्रीय कारस्थानाला खणखणीत प्रत्युत्तर दिले होते. त्याचा विरोध करत संभाजी ब्रिगेडने सचिनला शेतकरी विरोधी ठरवत त्याला दिलेला भारतरत्न किताब काढून घेण्याची मागणी केली आहे.

गंगांधर ढवळे,

संपादकीय
०५.०२.२१

” ” ”

गंगाधर ढवळे,नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *