कंधार ; प्रतिनिधी
तालुक्यात निवडणुकीपूर्वी सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले होते परंतु निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आरक्षण रद्द करण्यात आले होते. निवडणूक नंतर आरक्षणाची बदल होणार नसल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांना सरपंच पदाच्या आरक्षणात बदल झाल्याने भ्रमनिरास झाला आहे. सरपंच उपसरपंच पदाची निवड सुरु झाली आहे.
आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी 48 गावाची तर 12 फेब्रुवारी रोजी 49 दोन टप्प्यात होणार आहे, 97 ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा संपन्न झाल्या अशी माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली आहे.
सरपंच पदाचे आरक्षण सोडत नंतर सरपंच या निवडणुकीच्या कार्याला वेग आला हा कार्यक्रम जाहीर झाला.
** आज गुरुवारी 11 रोजी
उस्माननगर, दहिकळंबा ,पानभोसी, फुलवळ, पेठवडज, पानशेवडी, शिरसी बुद्रुक ,गंगनबीड ,राऊतखेडा,बोरी खुर्द, कंधारेवाडी, लाडका ,देवईची वाडी, भुत्याचीवाडी, रुई, शेल्लाळी, महालिंगी, कारतळा, उमरगा खो.,मसलगा ,सावळेश्वर ,मजरे धर्मापुरी, चौकी महाकाया ,धानोरा ,कवठा, तेलुर, तळ्याचीवाडी, आंबुलगा,गऊळ, पांगरा, बाळंतवाडी ,बहादरपुरा ,रहाटी ,शिरसी खुर्द, नावंद्याचीवाडी ,चिखलभोसी, वा खरड ,जाकापूर ,मंगलसांगवी, भेंडेवाडी, हिप्परगा शहा ,काटकळंबा ,वंजारवाडी, बाबुळगाव ,नंदन शिवनी या गावचे सरपंच निवड होणार आहेत .
तर उद्या दिनांक 12 फेब्रुवारी रोजी
शुक्रवारी दिग्रस बुद्रुक ,कवठा, शेकापूर, कुरूळा ,शिराढोण, हळदा ,मंगनाळी, हरबळ खुर्द, भोजूचीवाडी, बारूळ, बोरी बुद्रुक ,गुट्टेवाडी ,संगुचिवाडी ,मुंडेवाडी, खंडगाव हमीद ,घागरदरा, नागलगाव, हाडोळी, मरशिवणी, दाताळा, खुड्याची वाडी, चिखली, तेलंगवाडी,नवघरवाडी, गुंटूर ,मानसिंगवाडी, वरवंट, औराळ, संगमवाडी, येलूर ,शिरूर, बोळका, बाचोटी ,गुंडा, चिंचोली ,दैठणा, भंडार कुमट्याचीवाडी ,मोहिजा परांडा, नंदनवन,हासुळ,नारनाळी, या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच यांची निवड होणार आहे अशी माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली आहे.