आत्मनिर्भर…
जीथे उणीव तीथे जाणीव
१० वी निकालाचा अन्वयार्थ तुला दिसली का सिद्धार्था यशोधरेच्या लख्ख डोळ्यातून निथळणारी अपार त्रष्णा.२००४ : ५९
प्रज्ञा दया पवार यांची माफी मागून आणि त्यांच्या वरील शब्दात थोडा बदल करून लिहावे वाटते,
तुला दिसली आहे. विद्यार्थ्यां आईवडीलांच्या लख्ख डोळ्यातून पाझरणारी अपार गुणवत्ता.
आणि हे परवा लागलेल्या इयत्ता १० वीच्या निकालाने सिद्ध केले आहे.
बदल हा निसर्गाचा नियम आहे. जग बदलत आहे, माणसे बदलत आहेत. सत्तेचा केंद्र बिंदू बदलत आहे. तसं गुणवत्ताही वाढत आहे,ती आणखी वाढावी. कारण या गुणवत्तेमुळेच काही चंद्रमोळया झोपडया लख्ख प्रकाशित होत आहेत. त्या आणखी लख्ख प्रकाशित व्हाव्यात. त्यासाठी मेळ लावावा लागतो, वेळ काढावा लागतो. अभ्यास करावा लागतो.
जीथे कमी तिथे आम्ही, असे एक वाक्य, सर्व सामान्यपणे बऱ्याच जणांच्या व्हाट्सएप स्टेटसला दिसत आहे. पण प्रत्यक्षात काय आहे. मायमराठी जगाच्या पाठीवरील इतर कोणत्याही भाषे एवढीच सशक्त आहे.
वरील स्टेटस स्लोगनला अनुसरून मला म्हणावं वाटतं, जीथे उणीव तिथे जाणीव. जीथे कमी तीथे हमी.हमी बचतीची, काटकसरीची, आहेत त्यात भागवा – भागविची,हमी वाट पाहण्याची, हमी दिवस मागे जाण्याची, हमी स्वतः ला सिद्ध करण्याची, हमी संधी शोधण्याची,कमी आहे तरी काही तरी करून दाखवण्याची, अर्थात जर संधी आणि व्यासपीठ मिळाले तर, हमी स्वप्न सत्यात उतरवण्याची, हमी आणि जाणीव आईवडिलांच्या कष्टाची,त्या कष्टाच्या ऋणातून क्रतज्ञतेने मुक्त होण्याची.उणीव पैसा – अडक्याची,कपड्यालत्याची ,उणीव पुस्तक वह्याची, क्लास – ट्युशनची, गाड्या घोड्याची, प्रवास भाड्याची, सुख सोयीची, शेतीभातीची, घरदाराची,दुध दुप्त्याची.विशेष म्हणजे उणीव शालेय आणि अभ्यासु वातावरणाची.तरीही या सर्व प्रकारच्या अडचणीवर म्हणजे उणीवांवर मात करून, दिवसरात्र अभ्यास करून जे परवा लागलेल्या निकालात जाणीवेवर जाणीवपूर्वक स्वार झालेत ,,केवळ कठोर मेहनत, मनापासून अभ्यास करण्याने यश संपादन केले आहे,अशा सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
एकटया दि. ०४ आँगष्ट २० च्या ,” वाचकमंचचा” विचार केला तर लोहा तालुक्यातील लोंढेसांगवीचे मुळ रहिवासी असलेले अँटोरिक्षा चालक राहुल गोविंद गोमस्कर.हे आपला उदर निर्वाह चालविण्यासाठी, सिडको नांदेड येथे राहतात. स्वतः चे घर नसल्याने दुसऱ्याच्या जागेत लाकडाचा शेड उभारून त्यावर बँनरच्या आडोशाने छत निर्माण करून आपले दिवस काढतात. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात कामधंदा थंडावला.त्यात घरात आठरा विश्व दारिद्रय. अनेक अडचणींचा सामना करत, प्रसंगी उपाशीपोटी राहून राहुल गोमस्कर यांनी आपली मुलगी दिक्षाला मँट्रीक केले.
दिक्षाने कुठलीही खाजगी शिकवणी न लावता मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या १० वीच्या परिक्षेत ९३ % गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले. तीला पुढे कला शाखेत पदवीधर व्हायचे आहे. नंतर जिल्ह्याधिकारी होण्याचे स्वप्न आहे. जिद्दी पुढे परिस्थिती आडवी येणार नाही, असे ती ठणकावून सांगते.दि. १४ आँगष्ट २० रोजी आमचे वडील कै.किशनराव बाबा आमलापुरे यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने मी दिक्षास ११११ रुपये ची नगदी मदत करू इच्छीतो. समाजातील इतरही दानशूरांनी पुढे यावे. ही विनंती. ज्या मदतीने दिक्षा आत्मनीर्भर होइल आणि स्वतः च्या पायावर उभी राहील.
शेजारीच दुसरी बातमी आहे, हालाखीच्या परिस्थितीवर मात करून भीमरावने १० वीत मिळवले ९०:६०% गुण. अर्धापूर तालुक्यातील लोणी बु.येथील भीमराव उद्धव इंगोलेने १० वीत असताना वडिलांचे छत्र हरवल्या नंतरही सुट्टीच्या दिवशी रोज मजुरी करून शिक्षणाचा खर्च जमा करत आपले शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने आईही रोज मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते.परिस्थितीशी दोन हात करत भीमरावने १० वी परिक्षेत ९०:६०% गुण मिळवले. कुटुंबाची, आर्थिक परिस्थिती ची जाण ठेवत आणि आईवडीलांचे शिक्षण कमी असल्याने त्याला स्वतःला प्रतिकूल परिस्थितीवरही मात करून अभ्यासासाठी कठोर मेहनत घ्यावी लागली. म्हणून दोघांचे अभिनंदन. दोघांचाही विचार करता जीथे उणीव तीथे जाणीव ही गोष्ट लक्षात येते.शिवाय जिथे काही कमी नाही ,उणीव नाही, तिथे काही अंशी जाणीव बोथट असते. असे म्हणायला जागा उपलब्ध आहे. कदाचित यातुनच गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात.
गावातील नकाल लक्षात घेतला तर परत हेच लक्षात येते. तेच परगावच्या बातम्या वाचल्यावर लक्षात येते आहे।.फुलवळ गावातून म्हणजे श्री बसवेश्वर विद्यालयातून सर्व त्रतीय आलेला सुमेध वाघमारे हा अल्प भूधारक विद्यार्थी आहे. कालच्या वर्षात वडिलांनी मुलीच्या लग्न कार्यात सर्व जमा पुंजी खर्च करून टाकली. वडील रोज मजुरीचे काम करतात. अभिनंदनासाठी मी फोन केला तेव्हा ते म्हणाले, मी परीक्षा सुरू झाली तेव्हा २०० रुपये रोख दिलो.आणि म्हणालो आता बघ तुझं – तुझं.परत मला पैसे मागू नको. त्यानंतर त्यांने भावजी कडून पैसे मागून घेतले आणि परीक्षा उत्तीर्ण झाला. सर्व त्रतीय आला. सर्व प्रथम आलेल्या कु.शिवकन्याचे वडील जेमतेमच अर्थिक परिस्थितीचे धनी आहेत. मी अभिनंदनासाठी फोन केला तेव्हा ती म्हणाली आणखी अधिक गुण मिळायला हवे होते. तर सर्व द्धीतीय आलेला विद्यार्थी आमचे वर्गमित्र डॉ कासीम बिच्चू यांचा पुतण्या होय.तो मात्र योगायोगाने सुखवस्तू घरातील पण हुशार आणि होतकरू विद्यार्थी आहे. परत एकदा सर्वांचे अभिनंदन.
प्रा.भगवान आमलापुरे
मो.९६८९०३१३२८
द्धारा शं.गु.महाविद्यालय धर्मापूरी,
ता.परळी ( वै. )