शिवछत्रपती शिक्षक सह.पतसंस्था म.कंधारची वार्षिक ऑनलाईन सर्वसाधारण सभा संपन्न.

कंधार—-शिवछत्रपती जि.प.शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सह.पतसंस्था म.कंधारची 23 वी वार्षिक ऑनलाईन सर्वसाधारणसभा दि .30/03/2021 रोजी संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन गोविंद वर्ताळे तर उदघाटक म्हणून माजी चेअरमन , केंद्रप्रमुख तथा शिवछत्रपती पतसंस्थेचे संकल्पक श्री बालाजीराव डफडे, प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख तथा जेष्ठ संचालक श्री सूर्यकांत मंगनाळे ,संस्थेचे सचिव श्री दत्तात्रय मुंडे, संस्थेचे माजी चेअरमन श्री अंबादास कदम, अखिल प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष हानमंत जोगपेठे , पांचाली पतसंस्थेचे संचालक तानाजी कुट्टे, केंद्रप्रमुख श्री माधव कांबळे सभासद विनोद कांबळे आदीजन संस्थेच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित होते यावेळी सभेची सुरुवात कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज याच्या पूजनाने व दीपप्र ज्वलनाने झाली,

सभेच्या प्रथमसत्राच्या सुरुवातीला अहवाल वर्षातील शहिद जवान, दुष्काळाने आत्महत्या ग्रस्त शेतकरी जागतिक कोरोना महामारीत बळी पडलेल्या व्यक्ती व संस्थेचे माजी सभासद कै. श्री मारकवाड सर यांना संस्थेतर्फे भावपुर्ण श्रद्धांजली वाहून श्री जी. पी. वर्ताळे यांच्या अध्यक्षीय मनोगता नंतर द्वितीय सत्रात संस्थेचे सचिव श्री डी. आर. मुंडे यांनी सभेच्या विषयपत्रिकेप्रमाणे खालील विषय सभागृहसमोर मांडले त्यात मागील सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचुन कायम करणे,३१/३/२०२0 अखेरचा नफा वाटपास मान्यता देणे, संचालक मंडळाने नियुक्त केलेल्या प्रमाणित लेखापरीक्षकाच्या नेमणूकीस मान्यता देणे,दिर्घ कर्ज पाच लाखावरुन सात लाख करण्यात यावे,पतसंस्थेच्या कनिष्ठ लिपिक श्रीमती शारदा कुट्टे यांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ देणे ,मानधन तत्वावरील असलेल्या सेवक श्री रामेश्वर निलेवाड यांचे मानधन पाच हजारांहून सात हजार रुपये करणे,DCPS धारक शिक्षक व कर्जदार सभासद यांना विशेष विमा योजना लागू करणे , पतसंस्थेच्या मालकिचे प्लाॅट खरेदीसाठी प्रयत्न करणे, विशेष ठेव योजनेस मान्यता देणे, थकबाकीदार सभासदांकडील थकबाकी भरणे साठी काही सभासद व संचालक यांच्या विनंतीनुसार दोनमहिन्याची अंतिम मुदतवाढ देणे आदी ठराव सर्वानुमते सभासदांशी ऑनलाईन चर्चा करून मंजूर करण्यात आले.यावेळी सभेस ऑनलाईन उपस्थित राहून महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे राजउपाध्यक्ष श्री जी. एस. मंगनाळे यांनी शुभेच्छा दिल्या तर मराठा सेवासंघाचे मा. तालुकाध्यक्ष तथा पांचाळीचे माजी चेअरमन श्री नामदेवराव कुट्टे, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे नेते तथा पांचाळीचे माजी चेअरमन श्री बालाजीराव पांडागळे, शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे श्री ओमप्रकाश नळगे यांनी ऑनलाईन सभा चालू असताना फोन करून संस्थेच्या भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या व संस्थेच्या उत्तम व पारदर्शी कारभाराबद्दल व मागील अनेक वर्षांपासून संस्था “ब” श्रेणित होती ती मागील सतत दोनवर्षांपासून ” A” श्रेणित आल्याबद्दल,व्यवस्थापन खर्च कमी करून, कर्जदार सभासदांना दिलासा देण्यासाठी अर्धा टक्का व्याजदर कमी केल्याबद्दल, व संस्थेच्या कर्मचाऱ्यास वेतनश्रेणी लागू केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सर्व संचालकमंडळ व संस्थेचे सभासद बांधव यांचे भरभरून कौतुक केले.

यावेळी सभेसाठी ऑनलाईन उपस्थित असणारे संचालक तथा संस्थेचे माजी सचिव श्री ए.डी.पंदिलवाड,, सौ. मिनाताई केंद्रे, श्री भगवानराव चिवडे , श्री बी.जी.निर्मले , श्री काशिनाथ पवार,श्री एम.व्ही.गोंटे, श्री जळबाजी बेळकोने आदी संचालकसह संस्थेचे माजी उपाध्यक्ष श्री के. एल.कदम, माजी संचालिका सौ शोभाताई कौन्सले सह सभासद श्री हौसाजी वारगडे, श्री दशरथ वाघमारे, श्री गणेश थोटे,श्री पंडित सर , श्री एम. एस. केंद्रे, श्री शरद नेलवाडे श्री विशाल शिंदे आदी सभासद सभेला ऑनलाईन सक्रिय सहभागी झाले होते वरील सर्वांनी चर्चेत सहभागी होऊन सभेच्या सर्व विषयाला मान्यता दिली व संस्थेच्या लिपिक यांना वेतनश्रेणी लागू करणे व संस्थेच्या सेवकाचे मानधन वाढविणे या विषयांचे जोरदार समर्थन केले.या सभेचे बहारदार असे सूत्रसंचालन अखिल महाराष्ट्र प्रा. शिक्षक संघटनेचे ता. अध्यक्ष श्री हणमंत जोगपेठे यांनी केले तर सभेसाठी तांत्रिक साहाय्य तंत्रस्नेही मित्र श्री गणेश थोटे वरद कॉम्पुटर सेंटर कुरुळा यांनी केले. संस्थेचे सभासद श्री तानाजीराव कुट्टे यांनी सर्व ऑफलाईन, ऑनलाईन उपस्थितांचे आभार मानून राष्ट्रगिता नंतर सभेची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *