प्रा .डॉ . संगिता गोविंदराव अवचार

आठवणीतील विद्यार्थी ;- (०२)

प्रा .डॉ . संगिता गोविंदराव अवचार

              मी प्रथमच रुजू झालो तेव्हा संगिता अवचार ही बहूधा सहाव्या वर्गात शिकत होती . लहानशी संगिता आनंदाने घरभर हुंदडायची . छोट्या भावांबरोबर खोडया काढायची .आईच्या कामात मदत ही करायची . वेळेवर अभ्यासही करायची . अभ्यासाबरोबर  मैदानी खेळातही संगिताला खूपच आवड होती . लेझीममध्ये ही ती प्रविण होती . शाळेत कोणत्याही शिक्षकांला नभिनारी पण तेवढयाच नम्रतेने वागणारी होती संगिता . ती वर्गात बिनधास्त प्रश्न विचारत असे .             काळाच्या ओघात संगिता दहावी ,बारावी, बी .ए .,एम ए बी एड,एम .फील .नेट व पीएचडी उत्तीर्ण झाली .विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या परीक्षेत ती नंबर एकच राहीली . गणितासारख्या अवघड विषयात ती विद्यापीठातून पहिली आली . पुढे तीने एम ए इंग्रजी करुन त्यातही प्राविन्य मिळविले .आज संगिता एका ख्यातनाम महाविद्यालय परभणी येथे इंग्रजी विषयाची  प्राध्यापिका म्हणून चोख सेवा बजावत आहे .           

  शाळेत असताना संगिताचे बोलणे सडेतोड असायचे .जे खरं आहे त्या खऱ्याचचं ती सात्यत्याने पाठपुरावा करायची . शिक्षकांच काही थोडंफार चुकलं असेल तर ती शिक्षकांना नम्रपणे चूक दाखवून द्यायची . मला संगिताविषयीचा एक प्रसंग चांगलाच आठवतो . संगिता दहावीत होती . बहुधा मार्च महिना असावा . दहावीच्या विद्यार्थांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम चालू होतं .नववीच्या मुलांमुलींनी हा कार्यक्रम आयोजीत केला होता . नवनीच्या कांही मुलांमुलींनी त्यांचा भावना व्यक्त केल्या . काही शिक्षकांनीही निरोपाच्या भाषण करून सर्व विद्यार्थना मार्गदर्शन केले .परीक्षेविषयी माहिती सांगितली .भविष्यात कसे वागावे ?भविष्यातील शिक्षण क्षेत्रात कोणकोणत्या संधी आहेत या विषयी माहिती ही सांगितले . शेवटी दहावीच्या निरोपमुर्ती विद्यार्थांकडून काही विद्यार्थी बोलते झाले . ते बोलत असताना त्यांना शिकविणा-या गुरुजीचे गुणगाण करत होते . सर्व विषयांचा अभ्यासक्रम वेळेवर शिकविल्या बदल सर्व गुरुजनांचे अभार मानत होते . नववीच्या वर्गातीत विद्यार्थीनाही अधूनमधून धन्यवाद देत होते . दोनचार मिनिटात एक एक विद्यार्थी आपल्या भावना बोलून संपवत होतं .       

      आता बारी होती संगिताची . दहावीच्या  निरोपप्रसंगी संगिताही बोलली . ती ही अगोदर बोललेल्या मुलांप्रमाणे बोलत होती . शिक्षकांचे ,मुख्याध्यापक व विद्यार्थी मित्र मैत्रिनिचे  भरभरुन गुणगाण करत होती . न थांबता, न कचरता ती बिनधास्त बोलत होती .वर्षभरात कोणत्या गुरुजीने काय शिकविले याचं थोडक्यात लेखाजोखा मांडत होती .बोलता बोलता संगिता बोलली , ” सर्व गुरुजींनी अभ्यासक्रम संपवलेले आहे . पण एका आदरणीय गुरुजीने अभ्यासक्रम पूर्ण केलेला नाही . ते अभ्यासक्रम पूर्ण न करणारे गुरुजी म्हणजे आपले आदरणीय पर्यवेक्षक मा . के .बी. दासेसर आहेत . त्यांनी भूगोलाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला नाही . आम्हाला साधं नकाशा वाचनही शिकविलेलं नाही . ” हे ऐकून सर्व शिक्षक अचंबीत झाले .पर्यवेक्षक साहेबांचा चेहरा तर रागाणे लालभडक झालं होतं . त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी व रागांचे भाव स्पष्ट जाणवत होते .सर्व शिक्षकांतही कुजबूज सुरू झाली होती , ” आरे ही तर शिक्षकाची मुलगी आहे . ती असी कशी काय बोलू शकते ? ” आमच्यातीलच काही शिक्षक म्हणाले , ” आहो ती मुलगी स्वतःच्या मनाने बोलली नाही . तीला सांगणारा कोणीतरी आपल्यापैकीच आहे . तीला शिकवलंय असं बोल म्हणून . नक्कीच सांगणारा कोणीतरी आपल्यातीलच तीचा गुरू आहे . तीला काय कळते असं बोलायचं .” संगिता हे निष्पापपणे सत्य बोलली होती . तीला कोणी ही असं बोलायला सांगितलं न०हतं पण या संगिताच्या बोलण्यामुळे मला मात्र पर्यवेक्षक साहेबानी बराच काळ हकनाक त्रास दिला . शालेय जीवनापासूनच संगिता अशी स्पष्ट सत्य बोलणारी होती .     

       संगिता दहावी विशेष प्राविण्यासह पास झाली . पुढे बारावी विज्ञान शाखेतूनही ती विशेष प्राविण्य मिळवून पास झाली . बारावी नंतर तीचे विचार काय होते मला माहित नाही . पण बहुधा तीला डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचं होतं .तीने गुरुगोविंदसिंधजी इंजिनिअरींग महाविद्यालयात प्रवेश ही घेतलं होतं . अवचार सर व माझं विचार होतं की तीने बीए एमए करावंं. मला वाटायचं संगिता इंग्रजी विषयात प्राविण्य मिळवावं . कदाचीत अवचार सरांना वाटलं असावं तिनं गणितात प्राविण बनाव . पण संगिता ही लहानपणापासूनच नम्र पण स्वतंत्र विचारधाराची मुलगी आहे . संगिताला अवचार सरांचे म्हणने पटत नव्हते असे नाही पण संगिताला निश्चितच वाटत होतं की माझे बाबा व राठोड गुरुजी हे मला इंजिनिअरींग करु देत नाही . राठोड गुरुजी बाबाला सांगत असावे इंजिनिअरींग नको म्हणून . त्यावेळी संगिता माझ्यावर खूप नाराज होती . माझ्या विषयी तिच्या मनात खूप राग होता . त्या  रागाला वाट करून देण्यासाठी संगिताने एक भलं लांबलचक पत्र माझ्या नावाने लिहून मला अरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलं होतं . त्या पत्रात तीने अगदी ठासून बेडरपणे लिहीलं होतं , ” माझं शैक्षणिक जीवन केवळ तुमच्यामुळे उद्धवस्त होणार आहे . तुम्ही बाबाला काहीही उलट सूलट सांगू नका .” खर तर अवचार सर व मला येवढचं वाटत होतं की , ” ती ज्या विषयात पदवी घेईल त्या विषयात ती प्रविण असली पाहिजे ,तरबेज बनली पाहिजे ” .       

   संगिताने काही दिवस अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतली ही.नंतर मात्र तीने ते सोडून दिले व यशवंत महाविद्यालय नांदेड येथून बीए झाली .एमएचीही पदवीधारण केली . पुढे परभणी येथील महिला महाविद्यालयात इंग्रजी विषयाची प्राध्यापिका झाली पण शिक्षण बंद केली नाही . सेवा बजावत तीने पीएचडी ही पूर्ण केली . संगिता कवियत्री ,लेखीका व इंग्रजी विषयाची एक अत्कृष्ट शिक्षिका म्हणून नावलौकीक मिळविला आहे पण अजून तरी तीला ” ग  व मी ” ची बाधा झालेली नाही .आज ही तिचे पाय जमिणीवरच आहेत .विद्याविनयेन  शोभते . हे सत्यच आहे .तीच्या कडे चांगल्या संस्काराने भरलेली भली मोठी पोतडी आहे . तीचा ती नेहमी उपयोग घेत असते .             लग्नानंतर टॉपच्या मुली कुठं जातात ? बहुधा ‘चूल आणि मूल ‘ याच रहाटगाडग्यात सर्व मुली अडकतात . काही मुलीना संधी मिळूनही ‘ मला कुठे नोकरी करायची ‘ म्हणून शिक्षण घेण्याचं थांबवतात तर काहीजणी नसीबाला दोष देत रडतराऊत म्हणून जीवन जगत असतात . सांगिता मात्र ‘ चूल आणि मूल ‘ या पलीकडेही काहीतरी असते व ते मुलीने प्रत्यक्ष अनुभव घ्यावे असे तीला वाटते . भरारी घेता येते . क्षितीज ओलाडता येते हे तीनं दाखवून दिलेलं आहे .       

      शिक्षक म्हणजे ढग . त्या ढगातून पडणारा प्रत्येक थेंब सारखाचं असते . पण ते थेंब नेमकं कुठ पडतयं यावर त्या थेंबाचे महत्त्व वाढते . गरम तव्यावर पडणारा थेंब पटकण अस्तीत्वहीन होईल  तर गवत किंवा कमळाच्या पानावर पडणारा मोत्यासारखा चमकेल तर समुद्रातील शिंपल्यात पडणारा थेंबाचं रुपांतर सुंदर मोतीत होईल . शेतकरी शेतीत पेरणी करतो पण पुढे काय होईल याचा विचार करत नाही पण तो पिकांची जीवापाड काळजी घेतो  व जपतो . कधी कधी सर्व प्रकारची काळजी घेवूनही पिक हिशाळी जाते . शिक्षक  सर्व विद्यार्थींना समान सारखंच शिक्षण देतो पण ते घेण्याची कुवत ही विद्यार्थांवर अवलंबून असते . यात शिक्षकांचा बहूधा काही दोष नसतोच .

 राठोड एम .आर. ( गुरुजी ) ” 
गोमती सावली “
 काळेश्वरनगर विष्णुपूरी नांदेड

९९२२६५२४०७ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *