कंधार : शहरातील किराणा व भुसार व्यापारी असोसिएशनने व्हाट्सअप द्वारे मीटिंग घेऊन सर्वच किराणा व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूतीने आज दि.१६ शुक्रवार पासूनर दुपारी २ नंतर किराणा दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंधार किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन मुत्तेपवार यांनी सांगितले.
संपूर्ण लॉकडाऊन करा अन्यथा सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली होती. मात्र, या मागणीला डावलून पुन्हा अत्यावश्यक
सेवेच्या नावखाली ४० टक्के व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली. हा अन्य ६० टक्के व्यापाऱ्यांवर अन्याय असून, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एक दा विचार करावा, अशी मागणी व्यापारीवगातून केली जात होती.
परंतु बुधवारी रात्री ८ वाजेपासून १५ दिवसांसा ठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, या काळात अत्यावश्यक सेवेखाली ४० टक्के दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने या उपाययोजनेचा काहीच परिणाम कोरोना संसर्ग रोखण्यावर होणार नाही, अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. संचारबंदी म्हणता आणि सार्वजनिक वाहतूकीसह ४० टक्के दुकाने सुरू ठेवता. असा गोंधळ निर्माण करणारा निर्णय सरकारने घेतला असल्याचे व्यापाऱ्यांना वाटत आहे. जिथे जास्त गर्दी होते ते व्यवसाय सुरू ठेवून जिथे कमी गर्दी असते असे व्यवसाय बंद ठेवण्यात कोणता शहाणपणा, असा संतप्त सवालही कंधार शहरातील सुज्ञ दुकानदारांनी केला.