कंधार ; प्रतिनिधी
शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन ची अमल बजावणी ग्रामिण भागात होत आहे की नाही हे पाहण्यासाठी आज दि.१६ एप्रिल रोज शुक्रवारी कंधार तहसिलचे तहसिलदार यांनी बारुळ येथे अचानक भेट देवून लॉकडाऊनच्या नियमाचे उलंघन करणाऱ्या २ व्यापा-यांकडून सुमारे ३ हजार दोनशे रुपये दंड वसुल केला आहे.
कोरोना महामारीमुळे नांदेड जिल्हासह राज्यभरात शासनाने लॉकडाऊन लावले आहे.कंधार सह तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.लसीकरण मोहीम राबवली जात आहे तसेच घरोघरी जावून तपासण्या केल्या जात आहेत.
शासनाने ठरवून दिलेल्या लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात राबवले जात आहेत.परंतु काही दुकाने अर्धवट बंद करुन व्यहार चालु ठेवत आहेत.त्यामुळे कोरोनाची साखळी वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे कंधार तालुक्यातील सर्वच गावात अचानक पणे तहसिल व गटविकास अधिकारी यांच्या मार्फत पाहणी केली जाणार आहे व लॉकडाऊनचे नियम मोडणा-यावर कार्यवाही केली जाणार .त्या कार्यवाहीचा एक भाग म्हणून आज दि.१६ एप्रिल रोजी तहसिलदार व्यंकटेश मुंडे ,गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांच्या पथकानी अचानक भेट देवून बारुळ येथिल भांडी दुकान,व कापड दुकानदार यांच्या वर दंडात्मक कारवाई करत ३ हजार दोनशे रुपये दंड वसुल केला आहे.यावेळी ग्रामसेवक अदमपुरकर यांची उपस्थिती होती.