कोरोना मुळे पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने केली चिमुकल्यांसह आत्महत्या लोहा येथील घटना.



लोहा ; प्रतिनिधी.शिवराज दाढेल लोहेकर.


हातावर पोट असलेल्या व पोटाची खळगी भरण्यासाठी तेलंगणातून आलेल्या एका कुटुंबाने आपली जीवनयात्रा संपवली त्याचे असे झाले की गांवगा उदरनिर्वाह करणार्या आपल्या कारभार याला कोरोनाची लागण होताच योग्य उपचार मिळाला नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आपला पोशिंदा गेला आता आपण जगायचे कसे या विचाराने त्याच्या पत्नीने आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्यांसह जीव देण्याचा निर्णय घेतला आणि आपली शलो चिनीची यात्रा संपविली.


महाराष्ट्रात नव्हे तर सबंध देशात कोरोना महामारी ने थैमान घातले यातच लोहा शहरातील बालाजी मंदिराच्या पाठीमागे तेलंगणातुन आलेले एक कुटुंब रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते कोरोना महामारी ने या कुटुंबात शिरकाव केला पती हनुमंत शंकर गदम (वय ४५)हे पॉझिटीव्ह आल्यानंतर लोहा येथील कोविड सेंटर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ही बातमी बायकोला कळताच तीन वर्षाच्या मुला सह महिलेने सुनेगाव येथील तलावात उडी मारून आत्महत्या केली. शहरातील बालाजी मंदिराच्या पाठीमागे ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे ही घटना बुधवारी (ता१४) पहाटे घडली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे पद्मा हनुमंत गदम( वय३५) लल्ली (वय०३) असी मूर्त माय लेकराचे नावे आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पद्मा ने नवऱ्याच्या निधनानंतर 3 मुलांना घेऊन संसाराचा गाडा चालवायचा कसा या चिंतेने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले फिर्यादी चिन्नना दुर्गांना गदम वय (३९) रा.संतोषनगर निजामबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री कोल्हे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *