कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील संगुचिवाडी येथील सूर्यकांत हासेन्ना येईलवाड यांच्या कुकुटपालन प्लांटला शॉकसर्किट ने आग लागून झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यात यावी यासाठी आज दिनांक 19 एप्रिल रोजी कंधार चे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.
कंधार तालुक्यातील संगुचिवाडी येथील शेतकरी येईलवाड यांनी आपल्या शेतात कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला होता. हजारो कोंबडी व त्यांचे खाद्य आणि कुकुटपालन साठी आवश्यक असणारे सर्व साहित्य तसेच शेती उपयोगी साहित्य दिनांक 16 एप्रिल रोजी लागलेल्या आगीत जळून खाक झाले होते. सदर घटनेचा पंचनामा करण्यास तलाठी यांनी दिरंगाई केली त्यामुळे वेळेवर नुकसानभरपाईची कारवाई झाली नाही .
.ही बाब लक्षात घेऊन माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी तहसीलदार कंधार यांना सदरील घटनेचा तात्काळ पंचनामा करून संबधीतास मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.