” लोहा पॅटर्न” स्तुत्य उपक्रम ;
लोहा ; प्रतिनिधी
कोरोना चा संसर्ग झपाट्याने वाढत आहे .रेमडिसिव्हर इंजेक्शनचा तुडवडा भासणार नाही . असे सांगून लोह्यात आधार …गरजुना.. हा कोविड रुग्ण व नातेवाईक याना दररोज १००जणांना जेवणाचे डब्बे देण्याचा भाजपा पदाधिकारी व व्यापारी मित्रपरिवार यांनी सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे .या लोहा पॅटर्न ची .जिल्ह्याच्या अन्य भागातही याची गरज आहे तेथेही भाजपा कार्यकर्त्यांनी पुढे यावे .जिल्ह्यात लोहा पॅटर्न राबविण्याची गरज आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
लोहा शहर भाजप व व्यापारी मित्रपरिवार यांच्या वतीने ” आधार ..गरजूंना ..या सामाजिक दायित्व उपक्रमा अंतर्गत
कोविड रुग्ण व नातेवाईक यांच्यासाठी दररोज १००जणांच्या जेवणाचे डब्बे देण्याचा शुभारंभ जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते माणिकराव मुकदम , महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चित्ररेखा गोरे,
माजी नगराध्यक्ष भाजप शहराध्यक्ष किरण वटटतमवार , माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम,
माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, उपसभापती नरेंद्र गायकवाड ,
आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश तेल्लवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नामदेव कटकमवार ,व्यापारी असोसिएशनचे सूर्यकांत (बाळू सावकार) पालिमकर , प्रा डॉ धनंजय पवार, सरस्वती पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण, गंगा साडी सेंटरचे तुकाराम सावकार कोटलवार, विजय कटकमवार , नगरसेवक दता वाले, नगरसेवक भास्कर पवार, रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ प्रशांत जाधव , डॉ मिलिंद धनसडे, डॉ राजेश पवार, डॉ गणेश चव्हाण, डॉ लोहारे, डॉ.दीपक मोटे, डॉ अक्षय तिवाळे, सचिन मुकदम, यासह कोविड सेंटर मधील कर्मचारी, भानू पाटील , अनिल धुतमल, बाळू पवार यासह पदाधिकारी उपस्थित होते..”
खा .चिखलीकर यांनी लसीकरण सर्वांनी करून घ्यावे, रेमडिसिव्हर ची कमी पडणार नाही असे सांगून लोह्यात कोविड रुग्ण व नातेवाईक यांच्या साठी जेवणाची दररोज शंभर जणांची सोय केली हा स्तुत्य उपक्रम असून लोहा पॅटर्न ची व्याप्ती जिल्हाभर झाली पाहिजे .या साठी पुढाकार घेतलेली सर्वांचे खा चिखलीकर यांनी कौतुक केले त्यांच्या कामाची प्रशंसा केली.कोविड सेंटर मधील सर्व डॉक्टर , कर्मचारी यांच्या कामाचा गौरव केला व त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली .कोविड सेंटर व तीन खाजगी रुग्णालयात ड्राय फूड वाटप करण्यात आले
●चौकट●
● प्रतापरावांनी दिला कोविड सेंटरला बोअर ●
कोविड सेंटरला बाजुच्या आयटीआय येथून पाणी आहे ही येथे बोअर ची गरज आहे असे डॉ मोटे यांनी खा प्रतापराव पाटील यांच्याकडे अडचण सांगितली त्याच क्षणी कोणताही विलब न लावता तात्काळ पाणी पाहून बोअर मारा मी स्वतः त्याचे पैसे देती तसेच मोटर टाकून देतो असे प्रतापरावांनी ग्वाही दिली आणि कोविड सेंटरच्या पाणी समस्याची अडचण दूर होणार आहे .प्रतापरावांच्या या निर्णयामुळे कर्मचारी सुखावले.रुग्ण व नातेवाईक याना देण्यात येणाऱ्या जेवण डब्ब्याचा स्वाद खा चिखलीकर यांनी घेतला ..व्वा…! स्वादिष्ट जेवण असा अभिप्राय नोंदविला..